eat food in this direction east west south north for better health and wealth vastu tips
'या' दिशेला तोंड करून करा आहार; सुदृढ आरोग्यासह व्हाल धनवान... By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 1:55 PM1 / 5आपण रोजच जेवताना कोणत्या दिशेला बसून आपण जेवतो हे आपण फारसं पाहत नाही. आज आपण पाहूया जेवताना कोणत्या दिशेला बसून जेवलं पाहिजं आणि त्याचे कोणते लाभ होणार आहेत. कोणत्या दिशेला बसून अन्न ग्रहण केल्याव तुम्हाला नुकसान होऊ शकतं आणि कोणत्या दिशेला बसून अन्न ग्रहण केल्यावर तुम्हाला लाभ होईल, हे जाणून घेऊ.2 / 5वास्तूमध्ये दक्षिण दिशा ही अन्न ग्रहणासाठी सर्वात वाईट दिशा मानली जाते. असं म्हणतात की या दिशेला तोंड करून अन्न खाल्ल्याने आजारपण येतं आणि घरामध्ये आर्थिक चणचण भासू लागते. ही दिशा पितृपूजेची दिशा मानली जाते. या दिशेकडे बसून खाणं चांगले नाही. 3 / 5पूर्वेकडे तोंड करून अन्न खाणे खूप शुभ मानले जाते असे वास्तूशास्त्रात सांगण्यात आले आहे. या दिशेला बसून खाल्ल्याने तुमचे सर्व आजार दूर होतात. या बाजूला तोंड करून जेवल्याने तुम्हाला सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद मिळतो. त्याचबरोबर तुमची आयुही वाढते.4 / 5उत्तरेला कुबेराचा वास असतो असं म्हटलं जात आणि हीच धनाची दिशाही आहे. या दिशेल तोंड करून जेवणं हे शास्त्रात विषेश मानलं गेलं आहे. कुटुंब प्रमुखानं या दिशेनं तोंड करून अन्न ग्रहण केलं पाहिजे. याशिवाय मुलं आणि नोकरी करणाऱ्या तरूणांनीही या दिशेला तोंड करून जेवलं पाहिजे. यामुळे बुद्धी तीक्ष्ण होते आणि मानसिक तणावही राहत नाही असं म्हटलं जातं. उत्तर दिशेला तोंड करून अन्न ग्रहण केल्यानं लक्ष्मी प्रसन्न होते असंही म्हणतात.5 / 5जर तुम्हाला उत्तम आरोग्य हवं असेल तर पश्चिम दिशेला तोंड करून जेवावं असं असं म्हटलं जातं. जर कुटुंबातील एखादा सदस्य आजारी असेल तर त्यानं रोज पश्चिमेकडे तोंड करून जेवावं असं म्हणतात. असं केल्यानं त्याच्या प्रकृतीत सुधारणा होते आणि घरात आनंदी वातावरण निर्माण होतं असंही म्हटलं जातं. आणखी वाचा Subscribe to Notifications