शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यकाळ पूर्ण करू शकतील का?; ग्रह देत आहेत वेगळे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2022 10:48 AM

1 / 15
शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावरही राजकीय घडामोडींचा वेग कमी झालेला दिसत नाही.
2 / 15
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ३९ आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्रिपद गमावण्याची नामुष्की ओढवली. गेल्या अनेक दिवसांमधील या घटनाक्रमांमुळे शिवसेनेला जबर धक्का बसला आहे.
3 / 15
विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. शिंदे सरकारच्या बाजूने १६४ मते पडली. तर विरोधक शंभरीही गाठू शकले नाही. नव्या सरकारच्या विरोधात ९९ मते पडली.
4 / 15
मात्र, नव्याने स्थापन झालेले हे सरकार आपला अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकणार का, यावरून आता तर्क-वितर्क लावले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुका लागतील, असा दावा केला आहे.
5 / 15
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही शरद पवार यांची री ओढत, गुजरातबरोबर महाराष्ट्रात निवडणुका घेण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंमत असेल, तर मध्यावधी निवडणुका घेऊन दाखवा, असे आव्हान केले आहे.
6 / 15
अत्यंत पराकोटीला केलेल्या सत्ता संघर्षानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले. मात्र, हे सरकार नेमका किती काळ टिकू शकेल, यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
7 / 15
ज्योतिषीय दृष्टिकोनातून पाहिल्यास एकनाथ शिंदे यांनी ३० जून २०२२ रोजी मुंबईत महाराष्ट्राचे २० वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तेव्हा सूर्यास्तानंतर काही वेळाने धनु राशीचा उदय होत होता, जो त्यांच्या चंद्र राशीशी जुळतो. याचाच अर्थ एकनाथ शिंदे यांची रास धनु असून, या राशीचा स्वामी गुरू आहे.
8 / 15
आताच्या घडीला एकनाथ शिंदे यांची साडेसाती संपली आहे. मात्र, पुढील काही काळासाठी ती पुन्हा लागू शकेल. जानेवारी २०२३ नंतर पूर्णपणे धनु राशीची साडेसाती संपुष्टात येईल.
9 / 15
गुरुवारी, ३० जून रोजी शपथविधीवेळी शुक्ल द्वितीया तिथी आणि गुरूचे नक्षत्र पुनर्वसु हे दर्शविते की, राज्याच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी नवीन सरकार लवकरच नवीन धोरणे आणण्याची घोषणा करू शकते. पण एकनाथ शिंदे यांच्या कुंडलीत कर्क राशीतील चंद्र ज्योतिषाच्या दृष्टिकोनातून सरकारच्या स्थिरतेवर काही प्रश्नचिन्ह दाखवत आहे.
10 / 15
कुंडलीतील आठव्या स्थानी चंद्रावर बसलेला नैसर्गिक क्रूर ग्रह मंगळाची चौथी दृष्टी आहे, त्यामुळे या सरकारवर 'बालारिष्ट योग'चा प्रभाव आहे, त्यामुळे शिंदे सरकारला अडचणीचा सामना करावा लागणार आहे. पहिल्या वर्षीच काही मोठ्या संकटांचा सामना करावा लागू शकतो, असे सांगितले जात आहे.
11 / 15
लग्न चंद्र चतुर्थ भावात म्हणजेच चौथ्या स्थानी शनी आणि मंगळ कमकुवत असल्याने अशा स्थितीत या सरकारला कार्यकाळ पूर्ण करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागणार आहे किंवा सरकारला आपला कार्यकाळ पूर्ण करताना एकामागून एक संकटांना सामोरे जावे लागू शकेल.
12 / 15
दशम घराचा अधिपती बुध, या शपथग्रहण कुंडलीच्या सहाव्या घरात स्वामी शुक्राच्या संयोगामुळे दीर्घ आणि वादग्रस्त न्यायिक प्रक्रियेचे ज्योतिषशास्त्रीय संकेत देत आहे, जे एकनाथ शिंदे यांच्यासाठी अत्यंत कठीण असू शकते.
13 / 15
शिवसेनेचे दोन तृतियांश आमदार फोडून एकनाथ शिंदे यांनी आता मुख्यमंत्री होण्यासोबतच शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, शिवसेनेच्या ५६ पैकी दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदार त्यांच्यासोबत आहेत, त्यामुळे त्यांचा वारसा वाचवण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे.
14 / 15
२७ जुलै १९६० रोजी सकाळी १०.१४ वाजता मुंबई येथे जन्मलेले, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जन्म कन्या राशी असून त्यांचा चंद्र राशी आहे. गुरु ग्रहातील शुक्राच्या परिवर्तनकारी दशेत धावणाऱ्या उद्धव ठाकरेंसाठी १४ जुलैपर्यंत अत्यंत कठीण काळ आहे. गुरु-शुक्र-गुरुंच्या विमशोत्तरी दशेत धावणाऱ्या उद्धव ठाकरेंना पक्ष वाचवण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे.
15 / 15
कन्या राशीत मंगळाच्या अष्टम स्थानामुळे, सिंहासनाच्या चौथ्या घरात असलेल्या गुरू आणि शनि, हा काळ त्यांच्यासाठी खूप आव्हानात्मक आहे. येत्या काही दिवसांत पक्षाच्या दाव्याच्या वादाबाबत निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाकडे जाणार आहेत, हे चिन्ह त्यांच्या कुंडलीत दशनाथ गुरूच्या सहाव्या (न्यायालयीन प्रकरणे) स्थानातील शनी संयोगावरून स्पष्टपणे दिसत आहे. त्यावर मंगळाची दृष्टी आहे. उद्धव ठाकरेंच्या कुंडलीत दशमात स्वामी बुध असल्याने त्यांना त्यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह आणि नाव या दोन्हींवर अधिकार मिळेल, हे ज्योतिषाच्या दृष्टिकोनातून दिसून येत आहे.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAstrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ