शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शुभ योगांचा फेब्रुवारी: ‘या’ ९ राशींना करिअरमध्ये लाभ; नोकरीची नवी संधी, होईल आर्थिक प्रगती!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2023 7:07 AM

1 / 15
ज्योतिषशास्त्रानुसार, फेब्रुवारी महिना शुभ योगांचा ठरू शकेल, असे सांगितले जाते. जानेवारी महिना ज्योतिषीय दृष्ट्या विशेष ठरला. आता फेब्रुवारी महिना महत्त्वाचा ठरणार आहे. फेब्रुवारी महिन्यात ३ ग्रह आपली रास बदलून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहेत. या ग्रहांच्या राशीपरिवर्तनाचा सर्व १२ राशींसह देश-दुनियेवर प्रभाव पडेल, असे सांगितले जात आहे.
2 / 15
फेब्रुवारीच्या सुरुवातीला नवग्रहांचा राजकुमार बुध ग्रह ७ फेब्रुवारीला मकर राशीत प्रवेश करेल. तर २७ फेब्रुवारीला बुध मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल. १३ फेब्रुवारीला नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य शनीचे स्वामित्व असलेल्या कुंभ राशीत प्रवेश करेल. त्यानंतर १५ फेब्रुवारीला शुक्र ग्रह मीन राशीत प्रवेश करेल.
3 / 15
ग्रहांच्या राशीपरिवर्तनाचा परिणाम सर्व राशी आणि देश-दुनियेवर दिसू शकेल, असे म्हटले जात आहे. नोकरी, करिअर, आर्थिक स्थिती, कुटुंब, व्यापार, उद्योगात कोणत्या राशींना आगामी काळ कसा जाऊ शकेल, कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभ मिळू शकेल, कोणत्या राशींसाठी आगामी काळ संमिश्र ठरू शकेल, ते जाणून घ्या...
4 / 15
मेष राशीच्या व्यक्तींना आगामी काळ फायदेशीर ठरू शकतो. करिअरमध्ये लाभ मिळू शकतात. व्यावसायिक करारातून फायदा मिळू शकतो. नोकरीत पदोन्नतीची अपेक्षा करू शकता. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना सकारात्मक बातमी मिळू शकेल. कुटुंबातील सदस्यांशी संबंध चांगले राहतील. कामे वेळेत पूर्ण होतील. करिअरची उद्दिष्टे पूर्ण करण्याकडे अधिक कल राहील. विद्यार्थी परीक्षेत यशस्वी होऊ शकतील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.
5 / 15
वृषभ राशीच्या व्यक्तींना आगामी काळ चांगला ठरू शकेल. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. करिअरमध्ये लाभ मिळेल. नोकरदारांचे वरिष्ठांशी चांगले संबंध राहतील. सर्व कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. व्यावसायिकांनी जोखमीची गुंतवणूक करणे टाळावे. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू शकाल. कुटुंबातील सदस्यांची वृत्ती सौहार्दपूर्ण असेल. जोडीदार तुमच्या सहनशील वृत्तीची प्रशंसा करेल.
6 / 15
मिथुन राशीच्या व्यक्तींना आगामी काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. व्यावसायिक योजनांवर बारीक लक्ष ठेवणे उपयुक्त ठरू शकेल. सतत प्रयत्न करणे आवश्यक आहे. परिस्थिती हळूहळू सुधारेल. खर्च कमी करण्यासाठी आणि पैसे वाचवण्यासाठी योजना तयार करा. नोकरीत नवीन कामे सोपवली जाऊ शकतात. जोडीदाराशी छोट्या छोट्या गोष्टींवरून अचानक भांडणे होऊ शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात व्यत्ययाचा सामना करावा लागू शकतो.
7 / 15
कर्क राशीच्या व्यक्तींना आगामी काळ नवीन संधींचा ठरू शकेल. नवीन योजना कार्यान्वित करू शकाल. करिअरमध्ये सुधारणा होऊ शकेल. कुटुंब सहकार्य करेल. यश मिळविण्यात मदत करतील. मुलांची काळजी घ्या. त्यांच्यासोबत वेळ घालवा. भावंडांशी संबंध सुधारतील. प्रलंबित कामे पूर्ण करा. कामानिमित्त लांबचा प्रवास घडू शकेल. नवीन ठिकाणे आणि इतर आवडीच्या क्षेत्रांचा विचार करा आणि प्रयत्न करा.
8 / 15
सिंह राशीच्या व्यक्तींना आगामी काळ समाधानकारक ठरू शकेल. धार्मिक कार्याची आवड वाढेल. यशस्वी आणि स्थिर जीवन जगू शकाल. आर्थिक स्थिती सुधारेल. नवीन गुंतवणुकीसाठी लाभदायक काळ. जोखमीची गुंतवणूक करण्यासाठी अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. तुम्हाला असे काही काम करावे लागेल जे तुम्हाला करावेसे वाटणार नाही.
9 / 15
कन्या राशीच्या व्यक्तींना आगामी काळ खास ठरू शकेल. तुम्हाला अनेक नवीन गोष्टी शिकता येतील. जीवनात स्थिरता येण्यासाठी तुम्ही सकारात्मक राहण्याची खात्री करा. कार्यक्षेत्र संतुलित राहील. सहकारी तुम्हाला प्रोत्साहन देतील. काम पूर्ण करण्यात मदत करतील. वरिष्ठांना प्रभावित करू शकाल. निर्णय घेताना कुटुंबाच्या पाठिंब्याची गरज भासू शकते.
10 / 15
तूळ राशीच्या व्यक्तींना आगामी काळ शानदार ठरू शकेल. खूप काही साध्य करता येऊ शकेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन सुरळीत होऊ शकेल. व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू आयुष्यात पुढे जाण्यास मदत करतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. उत्पन्नात वाढ होऊ शकेल. अधिक बचत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शक्यतो गुंतवणूक करणे टाळणे फायदेशीर ठरू शकेल. जोडीदाराशी मतभेद वाढू शकतात.
11 / 15
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आगामी काळ सावधगिरी बाळगण्याचा आहे. जोखीम पत्करली तर लाभ मिळू शकेल. यश मिळू शकेल. वरिष्ठ तुमचे परिश्रम आणि समर्पण ओळखतील. अतिरिक्त जबाबदाऱ्या मिळतील. कामगिरी आणखी वाढू शकते. धीर धरा. प्रयत्नात यशस्वी व्हाल. कौटुंबिक जीवन आरामदायी असेल. वडीलधाऱ्यांची काळजी घ्या आणि त्यांचा सल्ला ऐका. मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यांच्यासाठी वेळ काढा.
12 / 15
धनु राशीच्या व्यक्तींना आगामी काळ विशेष लाभाचा ठरू शकेल. आर्थिक स्थिती स्थिर असेल. कोणत्याही फायदेशीर क्षेत्रात गुंतवणूक करू शकता. चांगला परतावा मिळू शकेल. विनाकारण खर्च करण्यापेक्षा पैसे वाचवणे हिताचे ठरू शकेल. व्यवसाय गांभीर्याने घ्या. प्रलंबित कामे पूर्ण करा. यशाचा कोणताही शॉर्टकट नाही, हे लक्षात ठेवावे. कंपनीत इंटर्नशिप सुरू करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेळ योग्य आहे.
13 / 15
मकर राशीच्या व्यक्तींना आगामी काळ अनुकूल ठरू शकेल. उद्दिष्टे साध्य करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. व्यावसायिक जबाबदाऱ्या वाढतील. सतत मेहनत करावी लागेल. आध्यात्मिक समाधान मिळेल. कुटुंबाचा प्राधान्यक्रम समजून घेणे आवश्यक आहे. आपल्या नातेवाईकांशी सकारात्मक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा आणि वाद टाळा.
14 / 15
कुंभ राशीच्या व्यक्तींना आगामी काळ सकारात्मक ठरू शकेल. वरिष्ठ तुमच्या कामाने प्रभावित होतील. नवीन पद मिळू शकेल. कामाची प्रशंसा होईल. मेहनत आणि समर्पण सहकाऱ्यांना प्रेरणा देईल. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. गुंतवणूक करू शकता. जीवनातील ध्येयांबद्दल खात्री असणे आवश्यक आहे.
15 / 15
मीन राशीच्या व्यक्तींना आगामी काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. यश मिळवण्यासाठी मेहनत करावी लागेल. आळस झटकून काम करणे आवश्यक आहे. करिअर गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. सर्व प्रलंबित कामे पूर्ण करा. वरिष्ठांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करा. सहकाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवा. त्यांची मदत मोलाची ठरू शकेल. आर्थिक स्थिती स्थिर राहील. नवीन गुंतवणूक करण्यासाठी चांगली वेळ आहे. भविष्यासाठी बचत करण्याचाही विचार केला पाहिजे. कुटुंब आणि नातेवाईकांची साथ मिळेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य