शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जुलै सांगतेला गजकेसरी योग: ७ राशींना ऑगस्टला अच्छे दिन, उत्तम यश; धनलाभ, महादेवांची कृपा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 1:52 PM

1 / 10
जुलै महिन्याची सांगता होत आहे. ऑगस्ट महिना सुरू होणार आहे. महाराष्ट्रासह लगतच्या भागांमध्ये ५ ऑगस्टपासून श्रावण मास सुरू होत आहे. श्रावण मास महादेवाच्या पूजनासाठी, नामस्मरण, आराधना, उपासनेसाठी उत्तम मानला जातो. तसेच ज्योतिषशास्त्रानुसार, जुलै महिन्याची सांगता होत असताना शुभ योग जुळून येत आहेत.
2 / 10
उत्तर भारतासह अनेक ठिकाणी श्रावण मास सुरू आहे. २९ जुलै रोजी चंद्र वृषभ राशीत प्रवेश करत आहे. वृषभ राशीत विद्यमान घडीला गुरु विराजमान आहे. त्यामुळे गुरु आणि चंद्र यांच्या युतीचा गजकेसरी राजयोग जुळून येत आहे.
3 / 10
गजकेसरी योग अतिशय उत्तम मानला जातो. या योगामुळे काही राशींना उत्तम संधी, यश-प्रगती प्राप्त होऊ शकते. जीवनातील अनेक आघाड्यांवर सकारात्मकता मिळू शकते, महादेवाची विशेष कृपा लाभू शकते, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...
4 / 10
मेष: महादेवाच्या कृपेने समस्या संपुष्टात येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तर त्यातूनही दिलासा मिळू शकेल. कामाचे कौतुक होईल. अशा परिस्थितीत पदोन्नतीसह काही मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. समाजात सन्मान वाढण्यासोबतच यश मिळेल. व्यवसायात भरपूर कमाई करू शकता. खूप दिवसांपासून प्रोजेक्ट किंवा डील मिळत नसेल आणि त्यासाठी खूप मेहनत घेतली असेल, तर मिळवू शकता. अध्यात्माकडे अधिक कल असेल.
5 / 10
वृषभ: गजकेसरी राजयोग फायदेशीर ठरू शकतो. आत्मविश्वास वाढलेला दिसेल. बौद्धिक क्षमता खूप चांगली असेल. व्यावसायिकांना व्यवसायाचा विस्तार करणे चांगले राहील. नोकरदार लोकांना या काळात प्रमोशन आणि पगारवाढ मिळू शकते. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.
6 / 10
सिंह: गजकेसरी राजयोग फायदेशीर ठरू शकतो. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. नवीन वाहन, घर इत्यादी खरेदी करू शकता. बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. व्यावसायिक असाल तर चांगला आर्थिक नफा मिळू शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात.
7 / 10
कन्या: गजकेसरी राजयोग शुभ सिद्ध होऊ शकतो. नशिबाची साथ लाभू शकेल. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील. लाभाच्या अनेक चांगल्या संधी मिळू शकतात. देश-विदेशातही प्रवास करू शकता. धार्मिक आणि शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. विद्यार्थी परीक्षेत यश मिळवू शकतात.
8 / 10
धनु: ऊर्जा आणि वेळेचे योग्य व्यवस्थापन करून कामे वेळेत पूर्ण करण्यात यशस्वी होऊ शकाल. मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायात अपेक्षित प्रगती कराल. कोणत्याही शुभ किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल.
9 / 10
मकर: महादेवांचे अपार आशीर्वाद प्राप्त होऊ शकतील. रखडलेले काम आणि प्रकल्प पुन्हा एकदा सुरू होऊ शकतात. समाजात मान-सन्मान वाढेल. अध्यात्माकडे कल असेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. जोडीदारासोबत कोणत्याही धार्मिक स्थळी जाऊ शकता. जीवनात आनंद आणि शांतता राहू शकेल. कामाच्या आधारावर बढती किंवा अप्रायझल मिळू शकते. व्यवसायात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे
10 / 10
मीन: विशेष कामात मोठे यश मिळू शकते. मुलांशी संबंधित कोणतीही चांगली बातमी संपूर्ण कुटुंबात उत्साह निर्माण करू शकेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. करिअर आणि व्यवसायात अपेक्षित प्रगती दिसेल. कुटुंब आणि मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. नोकरदारांची आर्थिक स्थिती चांगली राहील. उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत मिळू शकेल. कामात प्रगती मंद असली तरी फायदा होईल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यShravan Specialश्रावण स्पेशलchaturmasचातुर्मास