शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गजकेसरी योगावर बुध गोचर: ८ राशींना लाभ, सरकारी कामात यश; नवीन नोकरीची संधी, नफा-फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 3:13 PM

1 / 12
सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच अनेकविध शुभ योग जुळून येत आहेत. एकीकडे श्रावण महिन्याची सांगता होत असली तरी दुसरीकडे वर्षभर ज्याची आतुरतेने वाट पाहिली जाते, त्या गणरायाचे आगमन होत आहे. हरितालिका पूजनानंतर शनिवार, ०७ सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थी आहे. यानंतर पुढील १० दिवस गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे.
2 / 12
ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध मार्गी चलनाने सिंह राशीत प्रवेश करत आहे. विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यात दोनदा बुध राशीपरिवर्तन करणार आहे. महिन्याच्या उत्तरार्धात बुध कन्या राशीत प्रवेश करणार आहे. इतकेच नव्हे, राशीपरिवर्तनासह बुध नक्षत्र गोचर करणार असून, मघा नक्षत्रात प्रवेश करणार आहे.
3 / 12
तसेच सप्टेंबरच्या सुरुवातीलाच गुरू आणि चंद्र यांचा गजकेसरी योग जुळून येत आहे. गुरू आणि चंद्राचा गजकेसरी योग, बुधाचे राशी आणि नक्षत्र गोचर, गणरायाचे होणारे आगमन यांमुळे हा काळ शुभ मानला जात आहे. या सकारात्मक अनुकूलता देणाऱ्या काळाचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव पडू शकेल, ते जाणून घेऊया...
4 / 12
मेष: जीवनात सकारात्मक बदल घडलेला दिसून येईल. कुटुंबातील सदस्यांशी नाते घट्ट राहील. नोकरदारांना हा काळ फायदेशीर ठरेल. या मार्गक्रमणात प्रगतीच्या शक्यता आहेत. कामाच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल असेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतील. जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल. अध्यात्माकडेही अधिक कल असेल. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. मेहनतीचे फळ आता मिळू शकते. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल.
5 / 12
वृषभ: नियोजित कामे वेळेत पूर्ण होऊ शकतील. करिअर आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. नोकरी बदलण्याचा विचार करत होते त्यांना नवीन संधी मिळतील. दीर्घकाळ प्रलंबित असलेली सरकारी कामे पूर्ण होऊ शकतील. जोडीदारासोबत खूप आनंददायी वेळ घालवणार आहात.
6 / 12
मिथुन: खूप दिवसांपासून रखडलेली कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. करिअरच्या क्षेत्रात फायदा होऊ शकेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेले लोक यश मिळवू शकतात. नवीन नोकरीसाठी अनेक पर्याय मिळू शकतात. व्यवसायात भरपूर नफा मिळणार आहे. बनवलेल्या अनेक रणनीती प्रभावी ठरू शकतात. आर्थिक स्थिती चांगली असू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील.
7 / 12
कर्क: आर्थिक आघाडी चांगली राहू शकेल. करिअरमध्ये यशस्वी होऊ शकतील. व्यवसाय जसजसा वाढेल, तसा नफाही वाढू शकेल. कुटुंबात सर्व काही ठीक होईल. प्रेम जीवनात आनंद वाटेल. उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. मान, सन्मान, प्रतिष्ठा वाढू शकेल. कामाचे कौतुक होऊ शकेल. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत मिळण्याची शक्यता आहे.
8 / 12
सिंह: कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ चांगला जाईल. व्यवसायात परदेशातून चांगला नफा मिळू शकतो. अपार संपत्ती मिळू शकते. करिअरच्या क्षेत्रातही बरेच फायदे मिळू शकतात. नोकरीच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. फायदा होणार आहे. बचत करण्यातही यशस्वी व्हाल. जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल.
9 / 12
कन्या: आगामी काळ सौभाग्याचा ठरू शकेल. करियर आणि व्यवसाय फायदेशीर सिद्ध होऊ शकतील. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची मदत मिळेल, ज्यामुळे व्यवसाय पुढे नेण्यात खूप मदत होईल. नोकरदार महिलांना करिअरमध्ये काही मोठे यश मिळू शकते. मुलांशी संबंधित चिंता दूर होऊ शकतील. व्यावसायिकांसाठी हा काळ अतिशय शुभ असणार आहे. कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल.
10 / 12
वृश्चिक: बुद्धी आणि विवेकाच्या मदतीने कामे वेळेत करण्यात यशस्वी होऊ शकाल. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. प्रयत्नात अपेक्षित यश मिळू शकेल. सन्मान वाढेल. कामाच्या ठिकाणी काही विशेष कामासाठी वरिष्ठांकडून कौतुक होऊ शकते. व्यवसाय वाढवण्याचा विचार करत आहेत, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. मित्र आणि कुटुंबीयांचा पूर्ण पाठिंबा मिळेल.
11 / 12
मीन: आगामी काळात लाभ, फायदा होऊ शकेल. जीवनातील समस्या कमी होऊ शकतील. व्यवसायात योग्य निर्णय घेतल्यास आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सर्व काही ठीक राहील. विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना चांगली बातमी आणि संधी मिळू शकते.
12 / 12
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य