शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 7:07 AM

1 / 12
मे महिन्यात अनेक प्रकारचे शुभ योग, राजयोग जुळून आले. महिन्याची सांगता होतानाही वृषभ राशीत शुभ योग जुळून आला आहे. आताच्या घडीला वृषभ राशीत गुरु, सूर्य आणि शुक्र हे तीन ग्रह विराजमान असून, ३१ मे रोजी बुध ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे वृषभ राशीत चतुर्ग्रही योग जुळून येणार आहे.
2 / 12
वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि शुक्र स्वराशीत विराजमान असल्याने हा काळ विशेष मानला जात आहे. तर गुरु ग्रहही या राशीत विराजमान आहे. काही मान्यतांनुसार गुरु आणि शुक्र हे शत्रू ग्रह मानले गेले आहेत. असे असले तरी या दोन ग्रहांच्या युतीने गजलक्ष्मी नामक राजयोग जुळून आल्याचे सांगितले जात आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हा योग विशेष लाभदायी मानला जातो.
3 / 12
वृषभ राशीत गजलक्ष्मी राजयोग सुमारे १२ वर्षांनी जुळून आल्याचे सांगितले जात आहे. या योगात लक्ष्मी देवीची अपार कृपा काही राशींवर राहू शकते. आर्थिक आघाडी, करिअर, नोकरी, व्यवसाय, व्यापार, कुटुंब या आघाड्यांवर विविध प्रकारचे लाभ, यश-प्रगतीच्या उत्तम संधी प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जाते. कोणत्या आहेत, त्या भाग्यवान लकी राशी, ते जाणून घेऊया...
4 / 12
मेष:गजलक्ष्मी राजयोग चांगला ठरू शकेल. देवी लक्ष्मीची कृपा असेल. या राजयोगाच्या शुभ प्रभावामुळे धनप्राप्तीचे योग जुळून येऊ शकतील. कार्यक्षेत्रात प्रगतीची संधी मिळू शकेल. सकारात्मक परिणाम मिळतील. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. गुरूच्या कृपेने मान-सन्मान वाढेल, तर शुक्र कृपा होऊन सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकेल. बढती होण्याची शक्यता आहे.
5 / 12
कर्क: शुभ परिणाम मिळू शकतील. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. करिअरमध्ये यशाच्या नवीन संधी मिळतील. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील. अनपेक्षित आर्थिक लाभाचे योग जुळून येऊ शकतील. करिअरमध्ये मेहनतीचे पूर्ण फळ मिळू शकेल. ऑफिसमध्ये मोठी जबाबदारी मिळू शकते.प्रेम जीवन खूप चांगले राहील. कुटुंबात समृद्धी येऊ शकेल. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते.
6 / 12
सिंह: वैवाहिक जीवनात आनंद राहील. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. व्यवसायात विस्तार योजना यशस्वी होऊ शकतील. देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशाशी संबंधित समस्यांपासून दिलासा मिळू शकेल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.
7 / 12
कन्या: शुभ प्रभाव दिसून येऊ शकेल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर काही चांगल्या ऑफर मिळू शकतात. नोकरी बदलण्यासाठी वेळ चांगली ठरू शकेल. पगार चांगला असेल. कोणताही निर्णय घ्याल तर आनंद वाटेल. सर्वकाही चांगले होऊ शकेल.
8 / 12
वृश्चिक: गजलक्ष्मी योगाचा चांगला लाभ मिळू शकेल. व्यक्तिमत्व सुधारेल. आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात काहीतरी नवीन करण्याचा विचार करत असाल तर यशस्वी होऊ शकाल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. आयुष्यात प्रगती करण्याची हीच वेळ आहे. करिअर आणि व्यवसायात अनेक उत्तम संधी मिळतील.
9 / 12
धनु: गजलक्ष्मी राजयोगामुळे सौभाग्य वाढू शकेल. यशाकडे वाटचाल करू शकाल. जुने वाद मिटण्याची शक्यता आहे. लक्ष्मी देवीच्या कृपेने आर्थिक संकट दूर होऊ शकेल. व्यापार क्षेत्रात फायदा शक्य आहे. काही नवीन काम सुरू कराल. अनुकूल परिणाम मिळतील. बढती मिळू शकते. जोडीदाराशी तुमचे नाते अधिक घट्ट होईल. समाजात मान-सन्मान वाढेल.
10 / 12
मकर: प्रेमसंबंधात गोडवा राहील. बोलण्यात सौम्यता राहील. नोकरी आणि व्यवसायात खूप प्रगती करू शकाल. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळतील. तब्येत सुधारेल. दिलासा मिळेल. भौतिक सुखसोयी वाढू शकतील.
11 / 12
मीन: गजलक्ष्मी योगाचा चांगला लाभ मिळू शकेल. उत्पन्नात वाढ होऊ शकेल. व्यवसायाचा विस्तार करण्याची संधी मिळेल. करिअरमध्ये मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतील. आर्थिक समृद्धी वाढू शकेल. नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. गुंतवणुकीत चांगला परतावा मिळेल.
12 / 12
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य