गजकेसरी योगात श्री लक्ष्मी पंचमी: १० राशींना शुभ-लाभ; भरभराटीचे योग, सुख-समृद्धी-ऐश्वर्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 13:55 IST
1 / 15Shree Lakshmi Panchami 2025: हिंदू नववर्ष सुरू झाले आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला देवी महालक्ष्मीचे पूजेचे विधान आहे. या दिवशी भक्त संपूर्ण दिवस उपास करून रात्री देवी लक्ष्मीचे विधिपूर्वक पूजन करतात. चैत्र नवरात्रातील पंचमीला श्री पंचमी, लक्ष्मी पंचमी म्हटले जाते. धनाची देवी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मी पंचमी विधिपूर्वक साजरी केली जाते. ०२ एप्रिल २०२५ रोजी श्री पंचमी, लक्ष्मी पंचमी आहे.2 / 15ज्योतिषशास्त्रानुसार या काळात विविध योग जुळून आले आहे. मीन राशीत पंचग्रही योग जुळून आला आहे. आताच्या घडीला मीन राशीत सूर्य, शनि, बुध, शुक्र, राहु आणि नेपच्युन हे ग्रह विराजमान आहेत. मीन राशीतील ग्रहांच्या स्थितीमुळे विविध प्रकारचे ५ राजयोग जुळून आलेले आहेत. याशिवाय ०१ एप्रिल रोजी शुक्र ग्रह पूर्वा भाद्रपदा नक्षत्राच्या पुढील चरणात प्रवेश करत आहे. 3 / 15०१ एप्रिल २०२५ रोजी दुपारनंतर चंद्र ग्रहाने वृषभ राशीत प्रवेश केला आहे. याच राशीत नवग्रहांचा गुरु बृहस्पती म्हणजेच गुरु ग्रह विराजमान आहे. या दोन्ही ग्रहांच्या युतीने गजकेसरी योग जुळून आला आहे. गजकेसरी योग अतिशय शुभ आणि राजयोगाप्रमाणे फले देणारा मानला जातो. त्यामुळे श्री लक्ष्मी पंचमी या दिवशी हा योग जुळून येणे चांगले मानले गेले आहे. कोणत्या राशींवर कसा प्रभाव असेल? कोणत्या राशींवर लक्ष्मीकृपा होऊ शकेल? जाणून घेऊया...4 / 15मेष: अनुकूल वातावरण राहील. अनेक अडचणी दूर होतील. कार्यक्षेत्रातील कामाचा ताण कमी झालेला असेल. घरगुती जबाबदाऱ्या आटोक्यात आणण्यासाठी केलेले प्रयत्न सफल ठरतील. एखाद्या बाबतीतील काळजी दूर होईल. चंद्राचे भ्रमण शुभफळे देईल. चांगल्या बातम्या कानावर पडतील. विवाहासाठी उत्सुक असणाऱ्यांना चांगला काळ आहे.5 / 15वृषभ: उत्साह वाढेल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. मोठ्या योजना आखल्या जातील. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. मात्र, अनावश्यक खर्च करण्याकडे कल राहील. कायद्याची बंधने पाळण्यात हयगय करू नका. गुरुवार, शुक्रवार मालमत्तेच्या व्यवहारात फायदा होईल. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. भेटीगाठी फलद्रूप होतील. नवीन ओळखीचे फायदे होतील. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील.6 / 15मिथुन: कार्यक्षेत्रात महत्त्व वाढेल. अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात यश मिळेल. मात्र, कामे हातावेगळी करण्यासाठी वेळ द्यावा लागेल. त्यासाठी वेळेचे नियोजन नीट केले पाहिजे. घरात उत्साही वातावरण राहील. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. आर्थिक फायदे होतील. मनात आध्यात्मिक विचार राहतील. अडलेली कामे मार्गी लागतील.7 / 15कर्क: हा कालावधी अनुकूल राहील. एखाद्या चांगल्या बातमीमुळे मन आनंदून जाईल. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. कामाची प्रशंसा केली जाईल. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. पर्यटनाच्या माध्यमातून फिरणे होईल. नोकरीत योग्यतेला साजेशी नवीन जबाबदारी मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना मुलाखतीचे बोलावणे येईल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील.8 / 15सिंह: थोडी दगदग होईल. यशप्राप्तीसाठी हा काळ अनुकूल राहील. कामाचा ताण घेऊ नका. परिस्थिती तुमच्या आटोक्यात येईल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरेल. समाजात मान वाढेल. नोकरीत अचानक मोठी संधी मिळेल. घरातील कामांसाठी वेळ मिळेल. शुक्रवार, शनिवार एखाद्या उलाढालीत मोठा फायदा होईल. नवीन उपक्रम हाती घ्याल.9 / 15कन्या: अनुकूल परिस्थिती राहील. वाहन जपून चालवा. महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. काहींना अचानक धनलाभ होईल. बुधवारपासून अनुकूलता अनुभवायला मिळेल. मौजमजा करण्यासाठी पैसा खर्च कराल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. शुक्रवार, शनिवार कार्यक्षेत्रात महत्त्व वाढेल.10 / 15तूळ: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. योजनांच्या बाबतीत लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल. मात्र, प्रत्येकावर विश्वास ठेवू नका. कुणावर अवलंबून राहून मोठी कामे करू नका. एखादी व्यक्ती धोका देऊ शकते. फार उन्हात फिरणे टाळा. उघड्यावरील पदार्थ खाणे-पिणे टाळा. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. वाहन जपून चालवा. फार घाईघाईत कामे करू नका. 11 / 15वृश्चिक: साधकबाधक अनुभव येतील. नवीन योजना आखल्या जातील. त्यात उत्साह असेल. मात्र, उत्साहाच्या भरात लोकांना सगळी महत्त्वाची माहिती सांगू नका. आरोग्याची काळजी घ्या. बुधवार, गुरुवार व्यवसायात भरभराट होईल. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. शुक्रवार, शनिवार चंद्र भ्रमणामुळे थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. वाहन जपून चालवा. इतरांच्या भानगडीत पडू नका.12 / 15धनु: चांगले अनुभव येतील. बुधवार, गुरुवार थोडे सतर्क राहण्याची गरज आहे. कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. एखाद्या भरवशाच्या व्यक्तीकडून अपेक्षाभंग होईल. सुरुवातीला कार्यक्षेत्रात तुमचे नाव होईल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. मुले प्रगती करतील. शुक्रवार, शनिवार व्यवसायात भरभराट होईल. जीवनसाथीशी सूर जुळतील. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल.13 / 15मकर: महत्त्वाचे व्यावसायिक करारमदार होतील. मनात सकारात्मक विचार राहतील. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी नावाचा विचार केला जाईल. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. जवळच्या सहलीला जाऊन याल. बुधवार, गुरुवार मुलांची प्रगती कळेल. परीक्षांचे निकाल मनासारखे लागतील. समाजात मान वाढेल. शुक्रवार, शनिवार षष्ठ स्थानातील चंद्र भ्रमणामुळे संमिश्र अनुभव येतील.14 / 15कुंभ: चंद्र भ्रमणाची शुभ फळे मिळतील. धनलक्ष्मी प्रसन्न राहील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. खाण्या-पिण्याची लयलूट राहील. अनेक लाभ होतील. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. कार्यक्षेत्रात मोठी संधी मिळेल. त्या दृष्टीने बुधवार, गुरुवार हे दिवस चांगले ठरतील. शुक्रवार, शनिवार स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. सामाजिक मान-सन्मान मिळेल.15 / 15मीन: उत्साहाला उधाण येईल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. मालमत्तेची कामे पूर्ण होतील. बुधवार, गुरुवार व्यवसायात हाती पैसा येईल; मात्र कुणाच्या सांगण्यावरून मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्या. शुक्रवार, शनिवार घरात उत्साही वातावरण राहील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. एकंदरीत सुस्थिती राहील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.