ganesh chaturthi 2021 these things and rules should keep in mind before buying ganesh murti
Ganesh Chaturthi 2021: गणेश चतुर्थीला बाप्पाची स्थापना करताना ‘या’ गोष्टींचे भान आवश्यक; पाहा, मान्यता आणि नियम By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2021 3:47 PM1 / 12चातुर्मासातील दुसरा महिना भाद्रपद. भाद्रपद महिना हा मुख्यत्वे करून गणपती पूजनासाठी ओळखला जातो. भाद्रपद चतुर्थीपासून ते चतुर्दशीपर्यंत घरोघरी श्रीगणेशाचे पार्थिव पूजन करण्याची प्राचीन परंपरा आहे. कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात आपण गणपती पूजनाने करतो. 2 / 12गणेशाचे बालरुप जितके मोहक आहे, तितकीच त्याची शक्ती, युक्ती, विवेकबुद्धीही चाणाक्ष आहे. गणपती केवळ विघ्नहर्ता नाही, तर तो बुद्धीदाता आणि समृद्धीकारकही आहे. (Ganesh Chaturthi 2021) 3 / 12बुद्धिदाता, गणांचा अधिपती, सुखकर्ता, दुःखहर्ता, विघ्नहर्ता, संकटनाशक अशा कितीतरी बिरुदांनी प्रसिद्ध असलेल्या गणेशाची घरोघरी उपासना, नामस्मरण, पूजन केले जाते. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध आणि वद्य पक्षात येणाऱ्या चतुर्थीला गणपतीचे पूजन केले जाते. यापैकी वद्य पक्षातील संकष्ट चतुर्थी अधिक महत्त्वाची मानली जाते. तर शुद्ध पक्षातील चतुर्थींमध्ये श्रीगणेश चतुर्थी आणि श्रीगणेश जयंती या दोन तिथी सर्वोच्च मानल्या गेल्या आहेत.4 / 12यंदाच्या वर्षी शुक्रवार, १० सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा केला जात आहे. देश-विदेशात लाखों घरांमध्ये आणि हजारो मंडळांमध्ये गणपती बाप्पाची स्थापना केली जाते. प्रत्येक जण आपापल्या आवडीनुसार, मनमोहक गणपतीची मूर्ती आणली जाते. मात्र, केवळ मोहात न पडता गणपती बाप्पाच्या स्थापनेसाठी काही गोष्टींचे भान ठेवणे अत्यंत आवश्यक असते, असे सांगितले जाते. जाणून घेऊया... (rules should keep in mind before buying ganesh murti)5 / 12दरवर्षी हजारो गणेशमूर्ती घडत असतात. गणपती मूर्ती घडवण्यात सर्वाधिक अभिव्यक्ती स्वातंत्र्य घेतलेले दिसते. मात्र, बसलेल्या स्वरुपातील गणपतीची मूर्ती अत्यंत शुभ फलदायी मानली जाते. बसलेल्या स्वरुपातील गणपती पूजनामुळे घरामध्ये समृद्धी येते. पैसा टिकतो. शाश्वत धनलाभाचे योग जुळून येतात, असे सांगितले जाते. 6 / 12उभे राहून आशीर्वाद देत असलेली गणपतीची मूर्तीही उत्तम असते. ती यश आणि प्रगतीची सूचक मानली गेली आहे, असे सांगितले जाते. गणपतीची मूर्ती घरात स्थापन करताना गणेशाची सोंड कोणत्या दिशेला आहे, हे पाहावे. गणपतीची सोंड डाव्या बाजूला असेल, तर त्याला वक्रतुंड मानले जाते. मात्र, ती सोंड जर उजव्या बाजूला असेल, तर त्याला सिद्धिविनायक मानले जाते.7 / 12सिद्धिविनायकाचे व्रत, सोवळे, पूजन कडक असते, असे सांगितले जाते. सिद्धिविनायक स्वरुपातील गणपती पूजन करताना अनेक गोष्टींचे भान, व्यवधान बाळगावे, असे सांगितले जाते. मात्र, याबाबत वेगवेगळे मतप्रवाह असल्याचे पाहायला मिळतात. गणेश चतुर्थीला गणपतीची मूर्ती घरात स्थापन करताना काही गोष्टी या आवश्यक मानल्या गेल्या आहेत. गणपतीच्या मूर्ती ही मूषकाविना नसावी. मूषक गणपतीचे वाहन असल्यामुळे त्याचा समावेश हा असायलाच हवा. 8 / 12यानंतर गणपतीच्या हातामध्ये शस्त्रे असावीत. तसेच गणपतीचा एक हात आशीर्वाद देतानाच्या स्थितीत आणि दुसरा मोदक स्वीकारण्याच्या स्थितीत असावा, असे सांगितले जाते. साधारणपणे सर्व देवतांचे आवाहन अशाच स्वरुपात करण्याची परंपरा आहे. आपल्या गणपतीचे जे रुप मोहून जाते, त्याची स्थापना करावी. 9 / 12गणेश चतुर्थीला आराम करत असलेल्या गणेश स्वरुपाची स्थापना केल्यास घरात सुख, शांतता, आनंद वाढीस लागतो. अशा गणेशाची पूजा केल्यास कष्ट, समस्या दूर होतात. मानसिक शांतता लाभते. शेंदूर रंगातील गणपतीच्या मूर्तीचे केलेले पूजन समृद्धीदायक मानले जाते. व्यापार, व्यवसाय, उद्योग क्षेत्रातील व्यक्तींनी शेंदूर रंगातील गणपतीच्या मूर्तीची स्थापना करून पूजन करावे, असे सांगितले जाते.10 / 12शाडूच्या मातीची मूर्तीच घरात आणून स्थापन करावी. शाडूच्या मातीची मूर्ती नसेल, तर धातूची मूर्ती स्थापन करावी. मात्र, केमिकलयुक्त गणपतीची मूर्ती स्थापन करू नये, असे सांगितले जाते. संतानप्राप्तीची इच्छा असणाऱ्यांनी बालरुपातील गणपतीची स्थापना करावी, असे सांगितले जाते.11 / 12बालरुपी गणपतीची स्थापना शुभ मानली जाते. बालरुपातील गणपतीची पूजा केवळ गणेश चतुर्थीपूर्ती मर्यादित न ठेवता, ती वर्षभर करावी. अशाने संतानप्राप्तीची इच्छा पूर्ण होऊ शकते, असे सांगितले जाते. तसेच नटराज रुपी गणेशाची स्थापना शुभ मानली जाते. 12 / 12यामुळे घरात आनंद, उत्साह वाढून अशा गणेशाचे पूजन प्रगतीकारक मानले गेले आहे. विद्यार्थ्यांनी गणेशाच्या या स्वरुपाचे नियमितपणे पूजन करावे, असा सल्ला दिला जातो. गणपतीची मूर्ती स्थापन करताना त्या शेजारी अन्य कोणतीही मूर्ती असू नये. गणेशाची सोंड उत्तर दिशेला येईल, अशा पद्धतीने गणेशाची मूर्ती स्थापन करावी, असे सांगितले जाते. आणखी वाचा Subscribe to Notifications