शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Ganesh Chaturthi 2024: आज बुधवार आणि भाद्रपद महिन्याची सुरुवात; यशप्राप्तीसाठी खास उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2024 11:16 AM

1 / 5
ज्योतिषशास्त्रानुसार बुधवारी देवीची तसेच गणपतीची उपासना फलदायी ठरते. देवीची उपासना करताना दुर्गा सप्तशतीचे पठण करावे. ते मनोभावे केले असता कुटुंबात सुख-शांती राहते. करिअरमधील अडथळे दूर होण्यास मदत होते.
2 / 5
बुधवारी हिरवी मूग डाळ दान करावी. तसेच घरी स्वयंपाकात तसेच देवाला नैवेद्यात मुगाची उसळ करावी आणि ती घरातील सर्व सदस्यांनी सेवन करावी. श्रावणात आपण जशी शिवामूठ वाहतो, तशी बुधवारी शिवलिंगावर हिरव्या मुगाची शिवामूठ वाहणे लाभदायक ठरते. बुध ग्रहाचे पाठबळ लाभेल.
3 / 5
जर तुम्ही आर्थिक अडचणींमुळे तसेच कर्ज घेतल्यामुळे त्रस्त असाल, तर दर बुधवारी गणेश स्तोत्राचे पठण करावे. मंगलमूर्ती बाप्पा आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी तुम्हाला नवे मार्ग दाखवेल. जीवनात प्रगतीचा मार्ग मोकळा होईल.
4 / 5
सांसारिक अडचणी तसेच वैवाहिक जीवनात मतभेद वाढले असतील तर दर बुधवारी गणेशाला शमीची पाने आणि दुर्वा अर्पण कराव्यात. शमीची पाने उपलब्ध नसल्यास दुर्वा अर्पण करू शकता. दुर्वा अर्पण करण्यापूर्वी लक्षात ठेवा की २१ दुर्वांची जुडी अर्पण करावी.
5 / 5
बुधवारी गायीला हिरवे गवत किंवा पालेभाज्या खाऊ घालाव्यात. गोमातेच्या आशीर्वादाने ग्रह दोष दूर होतील. गायीच्या पोटात तेहेतीस कोटी देवांचा अधिवास असतो अशी श्रद्धा आहे. मात्र हा तोडगा किमान तीन महिने दर बुधवारी करावा.
टॅग्स :Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीGanpati Festivalगणेश चतुर्थी २०२४Ganesh Mahotsavगणेशोत्सवAstrologyफलज्योतिषPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३