शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गौरी योग: ७ राशींना दिवाळीपूर्वी मोठे लाभ, गुंतवणुकीत नफा; अपार यश, शुभ-सौभाग्याचा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 9:05 AM

1 / 10
अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक म्हणून दीपोत्सव साजरा केला जातो. मराठी वर्षातील एक महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी. चातुर्मासात येणारा हा सण-उत्सव संपूर्ण देशभरात अतिशय उत्साहाने, आनंदाने आणि आपापले कुळाचार, कुळधर्म, परंपरा जपून केला जातो.
2 / 10
२८ ऑक्टोबरपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. परंतु, तत्पूर्वी ग्रह गोचरामुळे जुळून येणाऱ्या काही शुभ योगाचा उत्तम लाभ काही राशीच्या व्यक्तींना प्राप्त होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. चंद्र आणि गुरु यांच्या गजकेसरी योगासह गौरी योग जुळून येत आहे. तसेच काही दिवसांनी गुरुपुष्यामृताचा योगही आहे.
3 / 10
दिवाळी पूर्वी जुळून येत असलेल्या शुभ योगांचा शुभ प्रभाव काही राशींवर पडू शकतो, असे सांगितले जात आहे. कोणत्या आहेत त्या लकी राशी? जाणून घेऊया...
4 / 10
मेष: आगामी काळ शुभ ठरणार आहे. आधीच्या गुंतवणुकीतून मोठे फायदे मिळू शकतात. आर्थिक स्थिती सुधारेल. काही चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायात लाभ होऊ शकेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. एखादी मोठी इच्छा पूर्ण होऊ शकेल.
5 / 10
वृषभ: आगामी काळ आनंदाने भरलेला असेल. जमीन, मालमत्ता इत्यादींमधून लाभ होण्याची शक्यता आहे. एखादी मालमत्ता खरेदी किंवा विक्री करण्याचा विचार करत असाल तर इच्छा पूर्ण होऊ शकते. राजकारणाशी संबंधित लोकांना इच्छित पद किंवा जबाबदारी मिळू शकते. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल.
6 / 10
कर्क: आगामी काळ शुभ ठरू शकतो. ऊर्जा आणि वेळ यांचे उत्तम प्रकारे व्यवस्थापन करू शकाल. कामे योजनेनुसार पूर्ण होतील. आर्थिक लाभ मिळेल. नोकरी करत असाल तर कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. व्यावसायिकांसाठी हा काळ फायदेशीर असेल. धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.
7 / 10
सिंह: आगामी कालावधी शुभ राहू शकेल. नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. कामात यश मिळेल. जोडीदार प्रत्येक प्रसंगात तुमच्या पाठीशी उभा राहील. कुटुंबासोबत कुठेतरी जाण्याचा बेत आखू शकता. विद्यार्थ्यांना करिअरमध्ये यश मिळू शकते.
8 / 10
तूळ: शुभ आणि यशकारक काळ ठरू शकेल. काम वेळेवर पूर्ण झाल्यास मन प्रसन्न राहील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ यांच्यात चांगला समन्वय राहील. मालमत्ता आणि पैशाशी संबंधित बाबींमध्ये विशेष फलदायी काळ आहे. इच्छा पूर्ण होतील. अतिशय हुशारीने निर्णय घ्याल. जोडीदाराच्या अपेक्षांकडे दुर्लक्ष करणे टाळा.
9 / 10
धनु: आनंद आणि सौभाग्यदायक काळ ठरू शकेल. नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. धार्मिक आणि शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. समाजात सन्मान वाढेल. घरात प्रिय व्यक्तीच्या आगमनामुळे आनंदाचे वातावरण असेल. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ शुभ आणि लाभदायक असेल. जोडीदारासोबत आनंददायी वेळ घालवण्याची संधी मिळेल.
10 / 10
कुंभ: आगामी काळ चांगला ठरू शकणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी हा कालावधी शुभ राहू शकेल. आर्थिक स्थिती सुधारेल. जोडीदाराशी चांगला समन्वय राहील. करिअर आणि व्यवसायाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यDiwaliदिवाळी 2024spiritualअध्यात्मिकchaturmasचातुर्मास