शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gayatri Mantra: सर्वांनी रोज तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायलाच हवा; पण सूर्यास्तानंतर अजिबात नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2024 3:07 PM

1 / 11
ॐ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं, भर्गो देवस्य धीमहि। धियो यो न: प्रचोदयात्।। हा मंत्र आपल्याला माहीत आहेच, त्याच्या जपासंदर्भात काही खास गोष्टी जाणून घेऊया-
2 / 11
1. एकूण वेदांची संख्या चार आहे आणि चारही वेदांमध्ये गायत्री मंत्रांचा उल्लेख आहे. या मंत्राचे ऋषी विश्वामित्र आणि देवता सावित्री आहे.
3 / 11
२. या मंत्रात इतकी शक्ती आहे की जो नियमितपणे तीन वेळा नामस्मरण करतो त्याच्याभोवती सकारात्मक शक्तीचे वलय तयार होते.
4 / 11
३. गायत्री मंत्राचा नित्य जप केल्यास सदैव सन्मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळत राहते.
5 / 11
४. या मंत्राचा जप केल्याने बौद्धिक क्षमतेत वाढ होते. अडचणीतून मार्ग काढण्यास मदत होते.
6 / 11
५. सूर्यास्ताच्या सुमारास गायत्री मंत्राचा जप केल्यास त्या मंत्राचा प्रभाव अधिक पडतो.
7 / 11
६. सूर्यास्ताच्या वेळेस शक्य नसल्यास दिवसभरात जेव्हा शांत वेळ मिळेल तेव्हा हा जप करावा, परंतु रात्री हा जप करू नये.
8 / 11
७. गायत्री मंत्रात चोवीस अक्षरे असतात. ही चोवीस अक्षरे चोवीस शक्ती आणि कर्तृत्त्वाचे प्रतीक आहेत. यामुळेच ऋषीमुनींनी भौतिक जगातील सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करण्याचा मंत्र म्हणून गायत्री मंत्राचे वर्णन केले आहे.
9 / 11
८. आर्थिक बाबतीत अडचण असल्यास गायत्री मंत्राचा जप करा असे ज्योतिष शास्त्रात सुचवले जाते.
10 / 11
९. हा मंत्र विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. स्वामी विवेकानंद म्हणाले होते, की गायत्री हा बुद्धीचा मंत्र आहे, म्हणूनच त्याला मंत्रांचा मुकुट रत्न म्हटले गेले.
11 / 11
१०. नियमितपणे १० वेळा गायत्री मंत्राचा जप केल्याने बुद्धी तीव्र होते आणि दीर्घकाळ कोणत्याही विषयाची आठवण ठेवण्याची क्षमता वाढते. हा मंत्र व्यक्तीची बुद्धी आणि विवेक सुधारण्यासाठी देखील कार्य करतो.