शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

‘या’ राशींनी कधीही धारण करू नये नीलम रत्न, शनीदेवाची अवकृपा संभव; वाढू शकते समस्या, नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 7:19 AM

1 / 9
Neelam Ratna: ज्योतिषशास्त्राच्या अनेक शाखा आहेत. पैकी रत्नशास्त्रात नवग्रहांशी निगडीत रत्न सांगितली गेली आहेत. नवग्रहांपैकी ज्या ग्रहांचा प्रतिकूल प्रभाव पडत असेल किंवा कुंडलीत तो ग्रह कमकुवत असेल, तर त्या ग्रहाशी निगडीत रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो. हे रत्न विधीपूर्वक धारण करावे, असे सांगितले जाते.
2 / 9
सर्व राशीच्या व्यक्तींना सर्व रत्न लाभतात, असे नाही. काही रत्नांचा अतिशय शुभ प्रभाव पडू शकतो, तर काही रत्न धारण केल्यामुळे समस्या, अडचणी वाढू शकतात, असे म्हटले जाते. नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनीदेव अतिशय महत्त्वाचा ग्रह मानला जातो. शनी कर्मकारक, न्यायाधीश ग्रह आहे. तुमची कर्म चांगली असतील, तर शनी नक्कीच चांगले फळ देतो, असे सांगितले जाते. नीलम हे शनीचे रत्न मानले जाते.
3 / 9
जीवनात येणाऱ्या अडचणी, समस्या, आव्हाने यांवरील उपाय म्हणून अनेकदा काही रत्ने धारण करण्याचा सल्ला दिला जातो. त्या जातकाच्या कुंडलीचा अभ्यास करून कोणते रत्न शुभ ठरू शकते, ते सांगितले जाते. शत्रू ग्रहांची रत्ने एकावेळी धारण करू नये, असे म्हटले जाते. रंकाला राजा बनवण्याची क्षमता या रत्नामध्ये आहे, असे मानले जाते.
4 / 9
मात्र योग्य सल्ल्याशिवाय रत्न धारण केल्यास राजाचा रंकही होऊ शकतो, असे म्हटले जाते. नीलम रत्न हे शनीचे रत्न आहे, शनी हा मकर आणि कुंभ या राशींचा स्वामी आहे. त्यामुळे मकर आणि कुंभ या दोन राशींसाठी हे रत्न शुभ मानले गेले आहे. यासह शनीचा मित्र ग्रह शुक्राचे स्वामित्व असलेल्या वृषभ आणि तूळ राशीच्या लोकांसाठी हे नीलम रत्न खूप शुभ आणि फलदायी मानले गेले आहे.
5 / 9
शनीचे नीलम रत्न धारण केले तर आयुष्यातील मोठ्या समस्याही दूर होऊ शकतात, अशी मान्यता आहे. असे असले तरी हे रत्न धारण करण्यापूर्वी ज्योतिषांचा योग्य सल्ला घेणे आवश्यक आहे. मकर, कुंभ, वृषभ किंवा तूळ राशीच्या व्यक्तींनी त्यांच्या कुंडलीतील शनीची स्थिती जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे ठरते. कुंडलीत शनी नीच राशीत किंवा दुर्बल स्थितीत असेल तर नीलम धारण केल्याचा काही फायदा होऊ शकत नाही, उलट अडचणी येऊ शकतात, असे म्हटले जाते.
6 / 9
शनी आणि शुक्र वगळता सर्व राशींसाठी नीलम धारण करणे शुभ मानले जात नाही. मेष, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, वृश्चिक, धनु आणि मीन राशीच्या लोकांनी नीलम धारण करणे टाळावे, असे म्हटले जाते. शनी साडेसाती, शनी ढिय्या प्रभाव, शनी महादशा यांचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी नीलम रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो.
7 / 9
मात्र, काही विशिष्ट परिस्थितीत या राशीचे लोक नीलम रत्न धारण करू शकतात. जर तुमच्या कुंडलीत शनी शुभ असेल तर ज्योतिषाचा सल्ला घेतल्यानंतर तुम्ही नीलम रत्न धारण करू शकता. अशी मान्यता आहे की, नीलम रत्न धारण केल्यावर तुमच्यासाठी अनुकूल असेल तर २४ तासांत त्याचा प्रभाव दिसू शकतो. त्याच्या प्रभावाने काही समस्यांपासून दिलासा मिळू शकतो. आरोग्याची समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते.
8 / 9
नीलम धारण केल्याने नोकरी आणि व्यवसायात लाभ होऊ शकतो. पैशाशी संबंधित बाबींमध्येही तुम्ही यशस्वी होऊ शकता. पैसा वाढू शकतो. सामाजिक स्तरावरही शुभ परिणाम मिळू शकतात. नीलम रत्न धारण करायचे असेल तर त्याआधी योग्य ज्योतिषाचा सल्ला घ्यावा, असे सांगितले जाते.
9 / 9
नीलम रत्न तुम्हाला अनुकूल असेल तर हे रत्न तुमचे जीवन बदलू शकते आणि जीवनात आनंद आणू शकतो, असे म्हटले जाते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य