Get started today; The reason is Gurupushyamrit Yoga!
चांगल्या कार्याचा करा आज शुभारंभ; कारण आहे गुरूपुष्यामृत योग! By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: January 28, 2021 4:50 PM1 / 4गुरूवारी पुष्य नक्षत्राचा दिवस आल्यास तो अत्यंत शुभ मानला जातो. हा दिवस व नक्षत्र यांच्या संयोगातून गुरूपुष्यामृत योग निर्माण होतो. कोणत्याही कार्यात यश मिळविण्यासाठी त्याची सुरवात या दिवशी केली जाते. 2 / 4या शुभ मुहूर्ताचा अधिक लाभ व्हावा म्हणून देवी लक्ष्मी, श्रीविष्णू आणि गणपती, शंकराची पूजा करावी. लक्ष्मी आणि लक्ष्मीपती धनप्राप्ती चा आशीर्वाद देणारे आहेत, पण मग शंकर आणि गणपती यांची पूजा आज का, असा प्रश्न आपल्याला पडेल. तर शंकर हे संकटमोचक तर गणपती बुद्धिदाता मानला जातो. लक्ष्मी प्राप्ती झाल्यावर तिचा योग्य तऱ्हेने विनियोग आणि संरक्षण करणेही तितकेच म्हत्ववाचे आहे. म्हणून या निमित्ताने त्या दोहोंचीही पूजा योजली असावी. 3 / 4गुरुपुष्यामृत हा मुहूर्त शुभ असला, तरी विवाह किंवा मंगल कार्यासाठी तो निषिद्ध मानला जातो. कारण, गुरुपुष्यामृत या मुहूर्तावर खुद्द दत्त गुरूंची कृपादृष्टी असते. दत्तगुरु वैराग्याचे प्रतीक मानले जातात. संसारात किंवा मंगल कार्यात वैराग्य येऊन कसे चालेल? म्हणून या मुहूर्तावर खरेदी विक्री करावी पण मंगलकार्य टाळावे. 4 / 4पूर्वी या मुहूर्तावर ज्ञानदानास प्रारंभ केला जात असे. याशिवाय, धर्म, कर्म, मंत्र, अनुष्ठान, इ गोष्टींचा शुभारंभ केला जातो. नशीब बदलणारा, दारिद्रय दूर करणारा आणि इच्छित फळ देणारा असा हा गुरूपुष्यामृत योग आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications