शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Bappi Lahiri: सोनं खूपच लकी मानायचे बप्पीदा; ‘या’ ४ राशीच्या व्यक्तींचं पालटतं नशीब, होतो लाभच लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 12:39 PM

1 / 10
ज्येष्ठ संगीतकार-गायक बप्पी लाहिरी यांच्या निधनाने संगीत क्षेत्र आणि चित्रपटसृष्टीला पुन्हा एक मोठा धक्का बसला. लता मंगेशकरांच्या निधनाच्या धक्यातून अंशात्मक प्रमाणात अवघ जग सावरत असताना बप्पी लाहिरी यांच्या निधनाची वार्ता आली. (Bappi Lahiri)
2 / 10
मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ संगीतकार बापी लाहिरी यांना भारतातील गोल्ड-मॅन म्हणूनही ओळखले जाते. एका मुलाखतीमध्ये बप्पी लाहिरी यांनी स्वत: याबाबत सांगितले होते.
3 / 10
भरपूर सोने परिधान करणे हे त्यांच्यासाठी लकी आहे. बप्पीदांच्या गळ्यामध्ये सोन्याच्या चेन, हातात अंगठ्या, ब्रेसलेट्स असे मोठ्या प्रमाणावर दागिने त्यांनी कायम परिधान केलेले असे. सोनं माझ्यासाठी लकी आहे असे मला वाटते, असे कारण बप्पीदांनी सांगितले होते.
4 / 10
सुरुवातीला माझ्या गळ्यात दोन चेन होत्या. त्यानंतर सोनं माझ्यासाठी लकी आहे, असे मला जाणवू लागले. हिरे मात्र माझ्यासाठी लकी नाहीत, सोने माझ्यासाठी लकी आहे, हे मला माहिती होते, असे बप्पीदा म्हणाले होते. वयाच्या चौथ्या वर्षी लता मंगेशकर यांच्या एका गाण्याला तबल्याची साथ करून बप्पीदा प्रसिद्ध झाले होते. ८० च्या दशकात बप्पी लाहिरी यांच्या डिस्कोच्या तालावर संपूर्ण देश थिरकत होता. त्यामुळे त्यांना डिस्को किंग असे म्हटले जात होते.
5 / 10
बप्पीदा यांनी ९० हिंदी आणि ४० अन्य भाषांमधील चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. तत्कालीन सर्वात लोकप्रिय संगीतकार अशी त्यांची ओळख निर्माण झाली. १९८३ ते ८५ या दोन वर्षांत त्यांनी संगीतबद्ध केलेल्या १२ चित्रपटांनी चित्रगृहांमध्ये रौप्य महोत्सव साजरे केले. १९८६ मध्ये ३३ चित्रपटांसाठी १८० गीते स्वरबद्ध करण्याचा त्यांचा विक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंदला गेला.
6 / 10
बप्पी लाहिरी यांचे सोन्याप्रती असलेले प्रेम नेहमीच कुतूहलाचा विषय ठरला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, काही राशीच्या लोकांसाठी सोने परिधान करणे खूप शुभ असते. सोन्याचे दागिने परिधान केल्याने या लोकांचे नशीब बदलू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार चार राशीच्या व्यक्तींना सोने परिधान करणे अत्यंत शुभलाभदायक ठरू शकते. नेमक्या कोणत्या आहेत त्या राशी? जाणून घेऊया... (Gold Astrology)
7 / 10
मेष राशीच्या व्यक्तींना सोने खूप शुभ मानले जाते. सोन्याची अंगठी घातल्याने या व्यक्तींचे साहस आणि पराक्रम वाढू शकते. भाग्याची उत्तम साथ लाभू शकते. तसेच, नातीही मजबूत होण्यास मदत मिळू शकते. तुमच्यावर कर्जाचा बोजा असेल, तर काही दिवसात तुमची त्यातून सुटका होऊ शकते. इतकेच नाही, तर उत्पन्न वाढीच्या चांगल्या संधी प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जाते.
8 / 10
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी सोने परिधान करणे भाग्यकारक मानले जाते. या राशीच्या लोकांनी सोन्याचे दागिने, विशेषतः सोन्याची अंगठी परिधान करावी. असे केल्याने नोकरी, व्यापार, उद्योग व्यवसायात प्रगती होऊ शकते. धनलाभाचे उत्तमोत्तम योग जुळून येऊ शकतात. ऊर्जा आणि उत्साह वाढल्याने अनेकविध गोष्टीत यश मिळू शकते, असे सांगितले जाते.
9 / 10
कन्या राशीच्या व्यक्तींनाही सोने परिधान करणे लाभदायक ठरू शकते. सोन्याच्या अंगठी व्यतिरिक्त कन्या राशीच्या लोकांनी सोन्याची चेन किंवा ब्रेसलेट घालणे उपयुक्त ठरू शकते. यामुळे जीवनातील समस्या एक एक करून कमी होऊ शकतात. समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग दिसू शकतो. हाती घेतलेल्या कामात यश मिळू शकते. जीवनात धन आणि ऐश्वर्य वाढू शकते, असे म्हटले जाते.
10 / 10
धनु राशीच्या व्यक्तींसाठी सोने परिधान करणे अत्यंत शुभफलदायी मानले जाते. यामुळे त्यांना हाती घेतलेल्या कामात यश मिळते. राशीस्वामी गुरु ग्रह शुभ फल देतो. या व्यक्तींना खूप लोकप्रियता, प्रसिद्धी मिळते. या व्यक्ती अपार धन संपत्तीचे मालक बनू शकतात. तसेच ते आयुष्यात उच्च दर्जा आणि आनंद प्राप्त करतात. आयुष्यात कधीही कशाचीच कमतरता नसते, असे सांगितले जाते. बप्पी लाहिरी म्हणजेच बप्पीदांची रासही धनू होती.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यGoldसोनंBappi Lahiriबप्पी लाहिरी