शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

… म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या हातून निसटलं मुख्यमंत्रिपद, शिंदेंनी मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2022 2:10 PM

1 / 6
अनेक दिवसांच्या सत्तासंघर्षानंतर अखेर भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे शिंदे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत.
2 / 6
एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले असले तरी पहिल्यांदा ते मुख्यमंत्री बनतील अशाच चर्चा सुरू होत्या. परंतु एकनाथ शिंदे यांचे ग्रह अनुकूल असल्यामुळेच ते मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. परंतु आता एकनाथ शिंदे यांनी बाजी कशी मारली आणि ते कसे पुढे गेले हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. पाहुया या प्रश्नाचं उत्तर.
3 / 6
देवेंद्र फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी सकाळी ६ वाजता नागपूर येथे झाला. त्यांचं जन्म लग्न कर्क आणि राशी कुंभ आहे. सध्या कुंभ राशीची साडेसाती सुरू आहे. आताच्या घडीला त्यांची छायाग्रह केतूची विशोत्तरी दशा सुरू आहे. अशा स्थितीत केंद्रीय नेतृत्व एका विशिष्ट योजनेवर काम करत असून त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपद मिळणार नाही, हे खुद्द फडणवीस यांनाच शेवटच्या क्षणापर्यंत माहीत नसण्याची दाट शक्यता आहे.
4 / 6
सध्या १२ जुलैला शनी मकर राशीत जात आहे, त्यानंतर पुढच्या वर्षी जानेवारीत शनी कुंभ राशीत परत येईल. तेव्हा सध्या असलेल्या युतीमध्ये काही समस्या समस्या निर्माण होण्याचची शक्यता आहे. तसंच हा काळ युतीसाठी चांगला नसण्याचीही शक्यता आहे.
5 / 6
कर्क लग्न असलेल्या त्यांच्या कुंडलीत अष्टम स्थानी असलेला चंद्र ग्रहावर नवमेश गुरू, दशमेश मंगळ आणि एकादशेश शुक्राच्या दृष्टीनं तयार झालेल्या राजयोगामुळे २०१४ नोव्हेंबरमध्ये फडणवीसांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली. परंतु २०१९ मध्ये बुध शनीच्या दशेमुळे त्यांना काही दिवसांचंच मुख्यमंत्रीपद मिळालं आणि त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला.
6 / 6
कर्क लग्न असलेल्या फडणवीस यांच्या कुंडलीत शनी अष्टम स्थानाचा स्वामी होऊन सत्तेच्या असलेल्या दशम स्थानात बसला आहे. त्यामुळे २०१९ मध्ये बुध शनीच्या दशेमुळे ते मुख्यमंत्रिपदापासून दूर राहिले. आता केतु दशा आणि साडेसातीच्या प्रभावामुळे सत्तेच्या शीर्ष स्थानी पोहोचण्यापासून ते दूर राहिले. परंतु राजकाराणातील त्यांचं स्थान दीर्घ कालावाधीसाठी भक्कमच राहणार आहेत.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे