शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Dhanteras 2024 ५०० वर्षांनी गुरु-शनी दुर्मिळ योग: ७ राशींना दिवाळीत लॉटरीत लाभ, व्यापारात नफा; नोकरीत फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 10:20 AM

1 / 10
दिवाळीचा सण सुरू आहे. वसुबारस साजरी झाल्यानंतर आता पुढे धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज साजरी होत आहे. दिवाळीचा सण हा उत्साह, चैतन्य, सुख-समृद्धी, धन-वैभव आणि ऐश्वर्याचा मानला जातो. दिवाळीला केवळ सांस्कृतिक नाही, तर आरोग्याच्या दृष्टिनेही वेगळे महत्त्व असलेला सण आहे. दिवाळी हा चातुर्मासातील शेवटचा मोठा सण असल्याचे म्हटले जाते.
2 / 10
ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही दिवाळीला अनेक शुभ योग जुळून येत आहेत. त्यामुळे दिवाळी महत्त्व वाढले आहे. अनेक राशींना याचा लाभ मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. दीपोत्सवाच्या काळात गुरु आणि शनी यांचा एक दुर्मिळ योग जुळून येत असल्याचे सांगितले जात आहे. काही दाव्यांनुसार, ५०० वर्षांनी असा योग जुळून येत आहे.
3 / 10
आताच्या घडीला शनी स्वराशीत म्हणजेच स्वतःचे स्वामित्व असलेल्या कुंभ राशीत विराजमान असून, वक्री आहे. शनी कुंभ राशीत असल्यामुळे शश नामाचा राजयोग निर्माण झाला आहे. गुरु ग्रह वृषभ राशीत विराजमान असून, गुरु ग्रहही वक्री आहे. त्यामुळे शनी आणि गुरु ग्रहांचे वक्री असणे काही राशींना अतिशय लाभदायी, फलदायी, दिवाळी समृद्धी करणारे ठरू शकते, असे सांगितले जात आहे.
4 / 10
मेष: दिवाळीत गुरु आणि शनी वक्री असणे शुभ सिद्ध होऊ शकते. बोलण्याचा प्रभाव वाढेल. लोक प्रभावित होतील. अनपेक्षित पैसे मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. उत्पन्न वाढू शकते. या काळात गुंतवणुकीचा लाभ मिळेल. या काळात शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये नफा मिळण्याची शक्यता आहे.
5 / 10
वृषभ: दिवाळीत गुरु आणि शनी वक्री असणे अनुकूल ठरू शकते. या काळात कामात प्रगती होऊ शकते. कार्यशैली सुधारेल. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी कनिष्ठ आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकते. नोकरदारांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. विवाहितांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील.
6 / 10
सिंह: दिवाळीत गुरु आणि शनी वक्री असणे शुभ सिद्ध होऊ शकते. काम आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नोकरी मिळू शकते. या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन छान राहील. जोडीदाराची प्रगती होऊ शकते. या काळात व्यावसायिकांना चांगला नफा होऊ शकतो.
7 / 10
वृश्चिक: दिवाळीत गुरु आणि शनी वक्री असणे अनुकूल ठरू शकते. या काळात तुम्हाला भौतिक सुख मिळू शकते. वाहन किंवा मालमत्ता करू शकता. या काळात सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. जीवनसाथीसोबत मधुरता वाढेल. तसेच या काळात भागीदारीच्या कामातून फायदा होऊ शकतो.
8 / 10
धनु: दिवाळीत गुरु आणि शनी वक्री असणे खूप शुभ ठरण्याची शक्यता आहे. या काळात प्रत्येक कामात प्रगती आणि यश मिळेल. नोकरीत बढती, व्यवसायात वाढ आणि धार्मिक कार्यात रुची वाढेल. हा काळ चांगला राहील.
9 / 10
मकर: दिवाळीत गुरु आणि शनी वक्री असणे फायदेशीर ठरू शकते. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. अचानक धनलाभासह वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक नफा मिळू शकतो. कीर्ती वाढेल. व्यवसायात नवीन ऊर्जा संचारेल. नवीन व्यावसायिक करार होतील, ज्यामुळे उत्पन्न वाढेल. नोकरीत बढतीची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारेल.
10 / 10
कुंभ: दिवाळीत गुरु आणि शनी वक्री असणे फायदेशीर ठरू शकते. आत्मविश्वास वाढेल. नवीन लोकांशी नाते निर्माण होईल. भविष्यात फायदा होईल. सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. वाहन आणि मालमत्तेचे सुख मिळेल. विशेष लाभ मिळू शकतो. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Diwaliदिवाळी 2024Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यchaturmasचातुर्मास