शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Guru Asta 2022: गुरु अस्त: ‘या’ ६ राशीच्या व्यक्तींना धनलाभाचे योग; शेअर्स, करिअरमध्ये फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 3:44 PM

1 / 12
फेब्रुवारी महिना ज्योतिषीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. या एकाच महिन्यात नवग्रहातील ६ ग्रह स्थिती बदल करणार आहेत. नवग्रहातील देवगुरु मानला गेलेला बृहस्पती म्हणजेच गुरु ग्रह फेब्रुवारी महिन्यात अस्त होणार आहे. ही घटना महत्त्वाची मानली गेली आहे. (Guru Asta 2022)
2 / 12
गुरु हा ज्ञान, शिक्षण, संपन्नता, विवाह, वैभव, विवेक, धार्मिक कार्य, दान, पुण्य आणि वृद्धी यांचा कारक ग्रह मानला गेला आहे. गुरु ग्रह धनु आणि मीन राशीचा स्वामी आहे. कर्क ही गुरु ग्रहाची उच्च स्थान असलेली राशी आहे. तर मकर ही गुरुची नीच राशी आहे.
3 / 12
ज्योतिषशास्त्रानुसार, गुरु ग्रहाची कृपा असलेल्या व्यक्तीमध्ये सात्विक गुण विकसित होतात. गुरु प्रभावामुळे माणूस सत्याच्या मार्गावर चालतो आणि या व्यक्तींचा कल अध्यात्माकडे वाढतो, असे सांगितले जाते.
4 / 12
गुरु अस्त होणे ही एक खगोलीय घटना असली, तरी त्याला ज्योतिषशास्त्रातही खूप महत्त्व असल्याचे सांगितले गेले आहे. गुरुचा अस्त होणे म्हणजे गुरु सूर्य ग्रहाच्या अतिशय जवळून मार्गक्रमण करतो. आताच्या घडीला गुरु ग्रह शनीचे स्वामित्व असलेल्या कुंभ राशीत विराजमान आहे.
5 / 12
नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य मकर राशीतून १३ फेब्रुवारी रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे गुरुचा अस्त होणार आहे. मात्र, गुरुचा अस्त फारसा चांगला मानला जात नाही. गुरु ग्रह शनीच्या कुंभ राशीत २३ फेब्रुवारी रोजी अस्त होत आहे.
6 / 12
सुमारे एक महिन्याच्या कालावधीनंतर म्हणजेच २० मार्चच्या दरम्यान गुरु उदय होईल. गुरु अस्तचा कोणत्या राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरू शकेल, धनलाभाचे, करिअरचे उत्तम योग जुळून येऊ शकतील, ते जाणून घेऊया...
7 / 12
गुरुचा अस्त वृषभ राशीच्या व्यक्तींना लाभदायक मानला गेला आहे. या कालावधीत करिअरमध्ये प्रगती करण्याच्या संधी प्राप्त होऊ शकतात. कार्यालयतील सहकाऱ्यांचे चांगले सहकार्य लाभू शकते. आर्थिक आघाडी उत्तम राहू शकेल. व्यापार, व्यवसाय करणाऱ्यांना नफा होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.
8 / 12
गुरुचा अस्त मिथुन राशीच्या व्यक्तींना सकारात्मक ठरू शकतो. कार्यक्षेत्रात यश व प्रगतीचे मार्ग साध्य करता येऊ शकतात. नवीन नोकरीची एखादी चांगली संधी प्राप्त होऊ शकते. एखादा करार भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतो, असे सांगितले जात आहे.
9 / 12
गुरुचा अस्त कन्या राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल ठरू शकतो. परदेशाशी संबंधित व्यवसाय, व्यापार करणाऱ्यांना लाभ मिळू शकतो. रोजगाराच्या शोधात असलेल्यांना शुभवार्ता मिळू शकते. आर्थिक स्थिती चांगली राहू शकते. विद्यार्थांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
10 / 12
गुरुचा अस्त तूळ राशीच्या व्यक्तींना शुभ ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. आर्थिक आघाडी उत्तम राहू शकेल. यश मिळवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. प्रलंबित कामे पुढे सरकू शकतील. नोकरदार वर्गाला आगामी काळ उत्तम ठरू शकतो, असे सांगितले जात आहे.
11 / 12
गुरुचा अस्त धनु राशीच्या व्यक्तींसाठी भाग्यकारक ठरू शकतो. अडकलेली कामे मार्गी लागतील. प्रवास सुखदायक ठरू शकतील. नवीन योजना, काम सुरू करण्यासाठी चांगला कालावधी आहे. मिळकतीचे स्रोत वृद्धिंगत होतील. हाती घेतलेल्या कामात यश मिळू शकेल. कार्यालयात प्रतिमा उंचावेल, असे सांगितले जात आहे.
12 / 12
गुरुचा अस्त मीन राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरू शकतो. प्रलंबित कामे पुढे सरकून मार्गी लागतील. प्रवासाचे योग असून, सुखकर ठरू शकतील. मित्रमंडळींचे उत्तम सहकार्य लाभेल. मेहनतीचे चांगले फळ मिळू शकेल. व्यापार, व्यवसाय करणाऱ्यांना नफा होऊ शकतो. जीवनात शानदार परफॉर्मन्स होऊ शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य