शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गुरुचा शुक्र नक्षत्रात प्रवेश: ७ राशींना मनासारखा काळ, धनलाभाचे योग; शेअर बाजारात नफा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 10:49 AM

1 / 10
ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रह धन आणि ज्ञानाचा कारक मानला जातो. कुंडलीत गुरु बलवान असेल तर करिअर आणि व्यवसायात यश आणि प्रगतीचे मार्ग प्रशस्त होऊ शकतात. महादशेत गुरूची महादशा, गुरू संक्रमण आणि गुरूच्या अंतरदशामध्ये व्यक्तीला विविध प्रकारचे सुख प्राप्त होते, अशी मान्यता आहे. विद्यमान स्थितीत गुरु ग्रह शुक्राचे स्वामित्व असलेल्या वृषभ राशीत विराजमान आहे.
2 / 10
मे २०२५ पर्यंत गुरु वृषभ राशीत विराजमान असेल. तत्पूर्वी राशींनुसार ग्रह नक्षत्र गोचर करत असतात. १३ जुलै रोजी गुरु रोहिणी नक्षत्रात असून पुढील चरणात प्रवेश करत आहे. काही दिवसांनी गुरु पुन्हा एकदा चरणबदल करणार आहे.
3 / 10
वृषभ राशीसह रोहिणी नक्षत्राचाही स्वामी शुक्र आहे. त्यामुळे शुक्राच्या राशीत आणि नक्षत्रात होत असलेले गुरु गोचर विशेष मानले जात आहे. काही मान्यतांनुसार, गुरु आणि शुक्र शत्रू ग्रह असल्याचे म्हटले जाते. तर काहींच्या मते, या दोन्ही ग्रहांचा संयोग शुभ मानला गेला आहे. गुरुचे होत असलेले नक्षत्र गोचर काही राशींसाठी उत्तम, लाभदायक, फायदेशीर मानले जात आहे. जाणून घेऊया...
4 / 10
मेष: विविध लाभांसह आर्थिक लाभ मिळू शकतो. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर वेळ अनुकूल आहे. मात्र, शहाणपणाने पैसे खर्च करा. महत्त्वाची कामे, कागदपत्रांवर सह्या करताना सावध राहावे, असा सल्ला देण्यात येत आहे.
5 / 10
वृषभ: धनलाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. प्रॉपर्टी किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर काळ चांगला आहे. उत्कृष्ट परतावा मिळण्याची संधी आहे. आदर आणि प्रतिष्ठा मिळेल. मनोकामना पूर्ण होऊ शकतील.
6 / 10
मिथुन: जास्त फायदा होऊ शकतो. चांगले आर्थिक लाभ मिळू शकतील. कामात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन काम सुरू करायचे आहे, त्यांच्यासाठी हा नक्षत्र बदल खूप महत्वाचा असणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. आर्थिक स्थितीत लक्षणीय बदल होऊ शकेल. गुंतवणुकीतून चांगला फायदा होऊ शकेल. बेरोजगारांना नोकरीत यश मिळू शकते.
7 / 10
कर्क: उत्पन्न वाढेल. तसेच, व्यवसायात तेजी येऊ शकते. शेअर मार्केटमध्ये फायदा होऊ शकतो. तसेच प्रलंबित कामे पूर्ण होतील.
8 / 10
सिंह: गुरुचे नक्षत्र गोचर फायदेशीर ठरू शकेल. मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. आर्थिक लाभाच्या संधी वाढतील. समाजात मान-सन्मान वाढेल. आर्थिक स्थितीत पूर्वीच्या तुलनेत लक्षणीय बदल दिसून येऊ शकतात. काम आणि व्यवसायात यश मिळेल. करिअरमध्ये अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे.
9 / 10
तूळ: फायदेशीर सिद्ध होऊ शकेल. कार्यक्षेत्रात यश मिळू शकते. नवीन योजना पूर्ण होतील. आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी वाढू शकतील. नशिबाची साथ मिळू शकेल. करिअर आणि व्यवसायात प्रगती करणे शक्य होऊ शकेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत वाढण्याची शक्यता आहे.
10 / 10
धनु: गुरुचे नक्षत्र गोचर फायदेशीर ठरू शकते. प्रॉपर्टी किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ चांगला आहे. मनोकामना पूर्ण होऊ शकतील. नोकरदारांना प्रमोशन मिळू शकते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य