गुरुवारी गुरुप्रतिपदा: ९ राशींवर गुरुकृपा, धनलक्ष्मी प्रसन्न; भरघोस शुभ-लाभ, भाग्योदय-भरभराट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 11:56 IST
1 / 15guru pratipada 2025: माघ महिना अनेकार्थाने महत्त्वाचा मानला जातो. माघ वद्य प्रतिपदेला गुरुप्रतिपदा असते. हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. गुरुवारी गुरुप्रतिपदा येणे हे अत्यंत शुभ मानले जाते. तसेच या दिवशी गुरुचे नामस्मरण केल्यास गुरुची असीम कृपा, पुण्यफलाची प्राप्ती होऊ शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 2 / 15यंदा गुरुवार, १३ फेब्रुवारी २०२५ रोजी गुरुप्रतिपदा आहे. गुरु प्रतिपदा या दिवशी श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळीवनात गुप्त झाले. श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे प्रत्यक्ष दत्तगुरूंचे अवतार आहेत. त्यामुळे या दिवशी श्रीनृसिंह सरस्वती महाराजांचे स्मरण करणे, त्यांची सेवा करणे शुभ, पुण्याचे मानले गेले आहे. केवळ श्रीनृसिंह सरस्वती महाराज नाही, तर यासोबतच दत्तगुरू आणि त्यांच्या विविध अवताररुपाची सेवा, पूजन, उपासना महत्त्वाची मानली जाते. 3 / 15गुरुवारी लाखो लोक स्वामी समर्थ महाराज, शंकर महाराज, साई बाबा आणि दत्तगुरुंच्या अन्य अवतारांचे आवर्जून पूजन, स्मरण करतात. गुरुवारी दत्तगुरुंचे पूजन, सेवा करणेही पुण्याचे मानले गेले आहे. आताची एकूणच ग्रहस्थिती पाहता, गुरुवारी आलेल्या गुरुप्रतिदेच्या दिवशी कोणत्या राशींवर गुरुकृपा होऊ शकते. हा कालावधी कोणत्या राशींसाठी राजयोग वरदानासारखा ठरू शकतो, सर्वोत्तम लाभ, सुवर्ण संधींचा ठरू शकतो? जाणून घेऊया...4 / 15मेष: मनात उत्साह राहील. मौजमजा करण्यासाठी प्रवास कराल. भावंडांशी मधुर संबंध राहतील. व्यवसायवाढीसाठी आवश्यक ते प्रयत्न कराल. नोकरीत अनुकूल बदल होतील. जवळच्या लोकांच्या सहवासात याल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. योजनांना चालना मिळेल. अधिकारी वर्गाचे चांगले सहकार्य मिळेल. वडीलधाऱ्या मंडळींकडून सहकार्य मिळेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. 5 / 15वृषभ: एखाद्या उलाढालीत मोठा फायदा होईल. जे-जे ठरवाल ते सिद्धीस जाईल. धनलक्ष्मी प्रसन्न राहील. एखादी चांगली घटना घडेल. आवडत्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. नोकरीत वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. विविध प्रकारच्या सोयी-सुविधा वाढवून मिळतील. भेटवस्तू प्राप्त होतील. एखाद्या कटकटीतून दिलासा मिळेल.6 / 15मिथुन: महत्त्वाकांक्षेला नशिबाची साथ मिळेल. हाती घेतलेल्या कामात अनेकांचे सहकार्य मिळेल. थोरामोठ्यांच्या सहवासात याल. ओळखीचे फायदे होतील. धनलक्ष्मीची कृपा राहील. प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. जीवनसाथीचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी. भेटवस्तू देण्यास हरकत नाही. मालमत्तेच्या व्यवहारात फायदा होईल. सामाजिक मान-सन्मान मिळेल.7 / 15कर्क: काही अडचणी असतील. मात्र, थोडे सबुरीने वागल्यास त्यातून मार्ग निघेल. नोकरीत कामे वेळच्या वेळी करा. महत्त्वाच्या वेळी घोडे पुढे दामटणे शक्य होईल. फायदा कशात आहे हे ओळखा. आर्थिक आवक चांगली राहील. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्याशी गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी.8 / 15सिंह: मनात सकारात्मक विचार राहतील. एखाद्या उलाढालीत मोठा फायदा होऊ शकतो. एखादे महत्त्वाचे काम हातावेगळे होईल. त्यामुळे मनावरील ताण निघून जाईल. एखाद्या उपक्रमात गरजेपेक्षा जास्त प्रमाणात वेळ द्यावा लागेल. झेपतील तेवढीच जबाबदारी स्वीकारली पाहिजे. गुरुवारपासून शुभ फळे मिळणे सुरू होईल. आवडत्या लोकांच्या सहवासात याल. प्रवासाचे नियोजन नीट करा.9 / 15कन्या: कार्यक्षेत्रात दबदबा राहील. एखादी मोठी संधी मिळेल. त्या संधीचे सोने करून दाखवाल. पगारवाढ व इतर अनेक लाभ होतील. प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू राहील. मित्र-मैत्रिणींच्या भेटी होतील. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. भेटवस्तू प्राप्त होतील. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. गुरुवार, शुक्रवार एखाद्या अनावश्यक खर्चात पडणे टाळा.10 / 15तूळ: गेल्या काही दिवसांपासून रेंगाळत पडलेले एखादे काम चुटकीसरशी होऊन जाईल. अनेक अडचणी दूर होतील. विविध क्षेत्रात तुमच्या हातून उल्लेखनीय कामगिरी होईल. भाग्याची चांगली साथ मिळेल. एखादी चांगली बातमी कळेल. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना मान-सन्मान मिळेल. गुरुवार, शुक्रवार हे दिवस आर्थिक लाभाचे ठरू शकतील.11 / 15वृश्चिक: नोकरी, व्यवसाय, सामाजिक मान-सन्मान, प्रवास, आर्थिक प्राप्ती, आदी बाबतीत अनुकूल फळे मिळतील. अचानक धनलाभ होऊ शकतो. एखादे लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. लोकांना मदत करण्याच्या नादात फार दगदग करू नका. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. कलाकारांना प्रोत्साहन मिळेल.12 / 15धनु: प्रयत्नांना यश येईल. मनात उत्साह राहील. व्यवसाय वाढीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. लोकांची चांगली साथ राहील. विवाहोत्सुकांसाठी अनुकूल काळ आहे. चांगल्या स्थळांचे प्रस्ताव समोर येतील. प्रेमात असणाऱ्यांना भेटवस्तू मिळतील. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. गुरुवारपासून भाग्य स्थानातील चंद्रामुळे चांगल्या बातम्या कळतील. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. लोक मान देतील. भावंडांशी सख्य राहील.13 / 15मकर: थोडे सावधपणे वागण्याची गरज आहे. आरोग्याच्या बाबतीत हेळसांड करू नका. वाहन जपून चालवा. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. महत्त्वाच्या योजनांच्या बाबतीत थोडी गुप्तता पाळा. दिलासा देणाऱ्या घटना घडतील. प्रेमात सफलता मिळेल. गुरुवार, शुक्रवार संयमाची परीक्षा पाहिली जाईल. अचानक धनलाभ होऊ शकतो.14 / 15कुंभ: एखादे महत्त्वाचे काम हातावेगळे कराल. उत्साह वाढेल. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. चांगले अनुभव येतील. संमिश्र फळे मिळतील. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. मात्र त्यांना पुरून उराल. आरोग्याच्या किरकोळ स्वरूपाच्या तक्रारी असतील. थोडा आराम करण्याची गरज आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. जीवनसाथीचा चांगला सहयोग राहील.15 / 15मीन: अनुकूल ग्रहमानाचा अनुभव येईल. व्यवसाय वाढीसाठी केलेले प्रयत्न सफल होतील. हाती पैसा खेळता राहील. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. नोकरीत महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. कर्तबगारीला वाव मिळेल. चांगली संधी मिळेल. नवीन माहिती कळेल. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. भेटवस्तू मिळतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.