शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Guru Purnima 2022: आषाढ पौर्णिमेला तयार होत आहे लक्ष्मी-नारायण योग, या चार राशींना होणार आर्थिक लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 5:16 PM

1 / 5
दररोज ग्रह आणि नक्षत्रांची चाल काही राशींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरत असते. १३ जुलै रोजी आषाढ महिन्याची पौर्णिमा आहे. आषाढ पौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. त्याच वेळी, या दिवशी शुक्र सकाळी १०:४१ वाजता मिथुन राशीत प्रवेश करेल आणि ७ ऑगस्टपर्यंत या राशीत राहील. त्याच वेळी, २ जुलै रोजी बुध ग्रहाने देखील मिथुन राशीत प्रवेश केला आहे. १३ जुलै रोजी शुक्र मिथुन राशीत प्रवेश करताच, बुध आणि शुक्र यांच्या संयोगाने लक्ष्मी-नारायण योग तयार होईल. अशा परिस्थितीत १३ ते १६ जुलै हा काळ पुढील राशीच्या लोकांसाठी विशेष फायदेशीर असणार आहे.
2 / 5
१३ जुलै रोजी होत असलेल्या शुक्र संक्रमणाचा शुभ प्रभाव सिंह राशीच्या लोकांवर दिसून येईल. या संक्रमणातून पैसे मिळण्याची शक्यता आहे. आपण या काळात उत्तम बचत करू शकाल. शुक्राच्या संक्रमणामुळे सिंह राशीच्या लोकांना परदेश प्रवास करता येईल. नोकरीच्या ठिकाणी लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात.
3 / 5
मिथुन राशीत बुध आणि १३ जुलै रोजी शुक्र प्रवेशामुळे बुध-शुक्र संयोग तयार होत आहे. अशा परिस्थितीत तूळ राशीच्या लोकांसाठी हा योग लाभदायक ठरणार आहे. या काळात त्याला प्रत्येक कामात यश मिळेल. लक्ष्मी नारायणाचा हा योग तूळ राशीच्या लोकांसाठी भाग्यवान ठरणार आहे. करिअरमध्ये नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंब आणि मुलांसोबत आनंदाचे क्षण घालवायला वेळ मिळेल. हा योग तुम्हाला श्रीमंत बनवू शकतो.
4 / 5
या राशीच्या लोकांसाठी बुध आणि शुक्राचा संयोग शुभ राहणार आहे. व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा काळ खास आहे. या दरम्यान या राशीच्या लोकांच्या जीवनात सुख-समृद्धी वाढेल. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. लक्ष्मी नारायण योगाने देवी लक्ष्मीची कृपा राहील आणि अचानक धनलाभ होईल.
5 / 5
आषाढ पौर्णिमेला लक्ष्मी नारायण योगाचा शुभ प्रभाव कुंभ राशीच्या लोकांवरही दिसून येईल. या दरम्यान त्यांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना शुभ परिणाम मिळतील. चांगला नफा होईल. कुठेतरी प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही वेळ अनुकूल आहे. त्याचबरोबर व्यवसाय सुरू करण्यासाठीही हा काळ अनुकूल आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषGuru Purnimaगुरु पौर्णिमा