शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 11:02 AM

1 / 15
चातुर्मासातील पितृपक्ष सुरू आहे. पितृपक्षातील त्या त्या स्थितीला पितरांचे स्मरण करून श्राद्ध तर्पण विधी केला जात आहे. पितृ पंधरवड्याच्या काळाला विशेष महत्त्व आहे. आगामी काळात चंद्राचे भ्रमण वृषभ, मिथुन, कर्क आणि सिंह राशीतून होईल. बुधवारी अविधवा नवमी, शुक्रवारी एकादशी श्राद्ध, शनिवारी इंदिरा एकादशी आहे.
2 / 15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग जुळून आला आहे. सिंह राशीत असलेला बुध कन्या राशीत प्रवेश करणार आहे. या ठिकाणी सूर्य, केतुशी त्रिग्रही योग जुळून आला आहे. तसेच या तीनही ग्रहांचा मीन राशीतील राहुशी समसप्तक योग जुळून येऊ शकेल.
3 / 15
कालसर्प ग्रहण योगात असलेला यंदाचा पितृपक्ष अनेक राशींसाठी उत्तम ठरणार असल्याचे म्हटले जात आहे. एकंदरीत ग्रहस्थिती पाहता कोणत्या राशींवर लक्ष्मीची अपार कृपा राहू शकेल. कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? ते जाणून घेऊया...
4 / 15
मेष: आपल्याला नवीन कार्यक्षेत्राशी ओळख होईल. नवीन शिकण्यात उत्सुकता राहील. धनलक्ष्मी प्रसन्न राहील. स्थायी स्वरूपाचे व तात्पुरत्या स्वरूपाचे लाभ होतील. व्यवसायात अचानक मोठी संधी चालून येईल. जाणकार मंडळींचा सल्ला घेऊन योग्य तो निर्णय घेण्यास हरकत नाही. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. घरातील सदस्यांशी समन्वय राहील. घरातील कामे आटोक्यात येतील. मनात प्रसन्न विचार राहतील.
5 / 15
वृषभ: उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. मनात नावीन्यपूर्ण कल्पना येतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. भेटवस्तू देण्यास हरकत नाही. प्रेम प्रकरणात थोडे रुसवे फुगवे असतील. थोडे सामोपचाराने वागण्याची गरज आहे. चमचमीत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. मालमत्तेच्या कामात सफलता मिळेल. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. भावंडांच्या भेटीगाठी होतील.
6 / 15
मिथुन: सकारात्मक विचार करावा. एखाद्या कामात अनपेक्षित प्रसंगाला तोंड द्यावे लागू शकते. थोडे संयमाने वागून परिस्थिती आटोक्यात आणू शकाल. प्रवासात सतर्क राहा. अनोळखी लोकांशी जवळीकता वाढवू नका. अचानक एखादी चांगली बातमी कळेल. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. नोकरीत सकारात्मक विचार करण्याची गरज आहे. कलाकार मंडळींना चांगला काळ आहे. काहींना पुरस्कार जाहीर होण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.
7 / 15
कर्क: एखाद्या चांगल्या बातमीमुळे मन आनंदून जाईल. काही अनपेक्षित लाभ होऊ शकतात. धनलक्ष्मीची कृपा राहील. भेटवस्तू प्राप्त होतील. मनात काही शंका बाळगू नका. सगळ्यांकडे एकाच चष्यातून पाहू नका. मदत करणारे अनेक लोक असतात. त्यांना नाराज करू नका. प्रवासात सतर्क राहा. काही कारणाने गैरसमज होऊ शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. सोयी-सुविधा वाढवून मिळतील.
8 / 15
सिंह: एखाद्या उलाढालीत अचानक मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. विविध प्रकारचे लाभ होतील. अनेक प्रश्न सुटण्याच्या बेतात येतील. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी विचार केला जाईल. काम वाढेल. फायदा होणार असल्याने काम करण्यात मन रमेल. धार्मिक स्थळांना भेटी दिल्या जातील. पैसा खर्च करण्याकडे कल राहील. शुभ फळे मिळतील.
9 / 15
कन्या: लाभदायक परिस्थिती राहील. अनेक उत्तम फळे मिळतील. धनलक्ष्मी मोठी कृपा करेल. हाती घेतलेले प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण कराल. अतिशय उत्साह व आत्मविश्वासाने वाटचाल सुरू राहील. भाग्याची चांगली साथ मिळेल. अडचणी दूर होतील. कार्यक्षेत्रात प्रगतीपूरक वातावरण राहील. घरात कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. नवीन घर खरेदी करण्यासाठी अनुकूल काळ आहे.
10 / 15
तूळ: अनपेक्षित लाभदायक फळे मिळतील. काहींना अचानक मोठी संधी मिळेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. थोडे संयमाने वागण्याची गरज आहे. अचाट साहस करणे टाळा. वाहन जपून चालवा. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी विचार केला जाईल. कार्यक्षेत्रात महत्त्व वाढेल. सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.
11 / 15
वृश्चिक: अचानक धनलाभ होऊ शकतो. एखादे लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. एखाद्या उलाढालीत व्यस्त राहाल. फार दगदग होईल, अशी कामे अंगावर ओढवून घेऊ नका. व्यवसायात भरभराट होईल. काही अनपेक्षित लाभ होतील. प्रसिद्धी, मान-सन्मान मिळेल. चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील.
12 / 15
धनु: काहींना गरजेपेक्षा जास्त प्रमाणात कष्ट करावे लागू शकतात. हालचालींवर विरोधक लक्ष ठेवून असतील. त्यामुळे थोडे सावधपणे पावले उचलली पाहिजेत. भागीदारी व्यवसायातून फायदे होतील. अचानक धनलाभ होऊ शकतो. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. नोकरीत पारडे जड राहील.
13 / 15
मकर: पगारवाढ, मान-सन्मान मिळेल. सोयी-सुविधा वाढवून मिळतील. मुलांचे यश सुखावून जाईल. व्यवसायात अनुकूल स्थिती राहील. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. योजनांच्या बाबतीत थोडी गुप्तता बाळगली पाहिजे. एखाद्यावर विश्वास ठेवावा आणि त्याने अपेक्षाभंग करावा असे होऊ शकते.
14 / 15
कुंभ: घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. त्या निमित्ताने घरी पाहुणे मंडळी येतील. काहींना जवळचा प्रवास घडून येईल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. चांगल्या बातम्या कानावर पडतील. कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल. प्रसिद्धी, मान-सन्मान मिळेल. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. नोकरीत नवीन संधी मिळेल. मौजमजा करण्यासाठी पैसा खर्च कराल.
15 / 15
मीन: इतरांना मदत करण्यासाठी पुढाकार घ्याल. सामाजिक महत्त्व वाढेल. नोकरीत अचानक बदली होऊ शकते. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात भरभराट होईल. मालाची विक्री चांगली होईल. गुंतवणूक करताना खबरदारी घ्या. शिक्षणात सफलता मिळेल. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :pitru pakshaपितृपक्षAstrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यspiritualअध्यात्मिकchaturmasचातुर्मास