शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गुरुपुष्यामृत योग: १० राशींना वरदान काळ, मोठी संधी; धनलक्ष्मीची अपार कृपा, अचानक धनलाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 2:17 PM

1 / 15
Gurupushyamrut Yoga November 2024: नोव्हेंबर महिन्याचा उत्तरार्ध सुरू झालेला आहे. आगामी काळात गुरुपुष्यामृत योग जुळून येत आहे. गुरुपुष्यामृत योग वारंवार येत नाही. नोव्हेंबर महिन्यात गुरुवार, २१ नोव्हेंबर २०२४ रोजी गुरुपुष्यामृत योग आहे. गुरुपुष्यामृताचा मुहूर्त सकाळी ०६ वाजून ५२ मिनिटांपासून ते दुपारी ०३ वाजून ३४ मिनिटांपर्यंत आहे.
2 / 15
पुष्य नक्षत्र सर्व प्रकारांच्या कार्यांसाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे. गुरुपुष्य योगदिनी गुरुमंत्र घेणे उत्तम असते. गुंतवणुकीसाठी हा योग फायदेशीर मानला गेला आहे. या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते. या दिवशी केलेले लक्ष्मी पूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते.
3 / 15
गुरुपुष्यामृतावेळी असलेल्या ग्रहमानाचा कोणत्या राशींवर सकारात्मक प्रभाव असू शकेल? कोणत्या राशींवर गुरु ग्रह, दत्तगुरु आणि लक्ष्मी देवीचा वरदहस्त राहू शकतो? जाणून घेऊया...
4 / 15
मेष: परिस्थिती बाजूने राहू शकेल. हाती घेतलेले काम यशस्वीपणे पूर्ण कराल. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. लोकांच्या भेटीगाठी होतील. भावंडांशी मधुर संबंध राहतील. जवळचा प्रवास घडून येतील. व्यवसायात बरकत राहील. नोकरीत अचानक मोठी संधी मिळेल. अनेक दिवसांपासूनच्या इच्छा सिद्धीस जाऊ शकतील. समाजात गौरव होईल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. पर्यटनाच्या निमित्ताने फिरणे होईल.
5 / 15
वृषभ: धनलक्ष्मीची कृपा राहील. व्यवसायात भरभराट होईल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने नीट लक्ष द्या. पैसे मिळतील. या काळात बाजारपेठेचा अभ्यास नीट करा. काहींना अचानक प्रवास करावा लागेल. प्रवासात सतर्क राहा. भेटवस्तू प्राप्त होतील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. नोकरीत कामाचा ताण राहील. कामाचे स्वरूप बदलेल. थोडे संयमाने वागण्याची गरज आहे.
6 / 15
मिथुन: आर्थिक देवाणघेवाण करताना खबरदारी घ्या. आध्यात्मिक उपासनेकडे मनाचा कल राहील. परिस्थिती आटोक्यात येईल. सगळ्या अडचणी दूर होतील. विवाहेच्छूचा विवाह ठरेल. जीवनसाथीकडून भेटवस्तू मिळतील. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. मोठे आर्थिक फायदे होतील.
7 / 15
कर्क: अफलातून फायदे होतील. महत्त्वाची कामे होतील. धनलक्ष्मीची कृपा राहील. एखाद्या उलाढालीत मोठा फायदा होईल. पैशाचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्या. गोपनीय माहिती इतरांना सांगू नका. परिस्थिती तुमच्या आटोक्यात येईल. विविध प्रकारचे लाभ होतील. प्रेमात सफलता मिळेल, वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद मिळेल.
8 / 15
सिंह: योजनांना चालना मिळेल. नवीन करारमदार होतील. फायदा होईल. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी विचार केला जाईल. उच्च पदावर काम करण्याची संधी मिळेल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. आर्थिक आवक चांगली राहील. संयमाने वागण्याची गरज आहे. मोठे निर्णय घेताना जाणकार मंडळींशी चर्चा करा. अचाट साहस करणे टाळा.
9 / 15
कन्या: नशिबाचा कॉल तुमच्या बाजूने राहील. चांगले अनुभव येतील. उत्तम फळे मिळतील. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. महत्त्वाचे निरोप येतील. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. मानसन्मानात वाढ होईल. नोकरीत कामाचा ताण कमी होईल. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. काहींना हवी तशी बदली मिळेल. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. संयमाने वागण्याची गरज आहे.
10 / 15
तूळ: संपूर्ण काळ चांगला राहील. संयमाने वागा. घाईघाईत कामे करू नका. वाहने हळू चालवा. मनात सकारात्मक विचार ठेवा. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. समाजात तुमचा मान वाढेल. चंद्र-मंगळ युतीची शुभ फळे मिळतील. नोकरीत वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. पगारवाढ होईल. घरात मंगल कार्याचे आयोजन केले जाईल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील.
11 / 15
वृश्चिक: प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. सगळीकडे प्रभाव पडेल. बोलण्याला किंमत दिली जाईल. प्रेमात असणाऱ्यांसाठी अनुकूल वातावरण राहील. भेटवस्तू व विविध प्रकारची फळे मिळतील. थोडे सबुरीने वागा. परिस्थिती आटोक्यात येईल. मोठी संधी मिळेल. ओळखीचे फायदे होतील. समाजात मान वाढेल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. धनलक्ष्मी प्रसन्न राहील.
12 / 15
धनु: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येऊ शकेल. काही अडचणी असतील. शांतपणे राहा. लोकांचे म्हणणे ऐकून घ्या. त्यावर विचार करून निर्णय घ्या. भेटवस्तू प्राप्त होतील. व्यवसायात भरभराट होईल, मनात प्रसन्न विचार राहतील. अचानक धनलाभ होऊ शकतो. एखादे लॉटरीचे तिकीट घेऊन पाहू शकता. महत्त्वाचे निरोप येतील.
13 / 15
मकर: काही कटू तर काही गोड अनुभव येतील. सकारात्मक परिणाम दिसून येतील. शैक्षणिक प्रगतिपुस्तक झळकते राहील. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. विरोधकांच्या कारवाया जाणवतील. विविध शुभ फळे मिळतील.
14 / 15
कुंभ: ग्रहमानाची अनुकूलता बाजूने राहील. उत्तम फळे मिळतील. नोकरीत महत्त्व वाढेल. पगारवाढ, बढतीवर बदली असे योग येतील. घरी एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. भेटीगाठी होतील. मुले प्रगती करतील. आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात भरभराट होईल. हाती पैसा खेळता राहील.
15 / 15
मीन: लाभदायक ग्रहमान राहील. व्यवसायात अनुकूल वातावरण राहील, नवीन प्रयोग करून पाहिले जातील. ग्राहकांचा प्रतिसाद चांगला राहील. जवळच्या प्रवासाचा योग येईल. कार्यक्षेत्र गाजवाल. सहकारी वर्गाची साथ राहील. सोयी-सुविधा वाढवून मिळतील. पगारवाढ मिळेल. समाजात प्रतिष्ठा वाढेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य