शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१०० वर्षांनी हनुमान जन्मोत्सवाला गजकेसरीसह ६ राजयोग: ७ राशींना वरदान काळ, अपार लाभच लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 15:43 IST

1 / 10
मराठी नववर्षात रामनवमीनंतर हनुमान जन्मोत्सव देशभरात साजरा केला जातो. चैत्र पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव असतो. सात चिरंजिवांपैकी एक असलेला हनुमान हा प्रभू श्रीरामांचा निस्सीम भक्त असल्याच्या कथा वाल्मिकी रामायणात आढळतात. बुद्धी, शक्ती आणि भक्ती यांचा त्रिवेणी संगम म्हणजे हनुमंत. यंदा, १२ एप्रिल २०२५ रोजी हनुमान जयंती आहे. प्रभू श्रीरामांचे परमभक्त, शक्ती अन् सामर्थ्याचे दैवत मानल्या गेलेल्या हनुमान, बजरंगबलीचे देशभरात पूजन केले जाते.
2 / 10
पंचग्रही, लक्ष्मी नारायण योग, बुधादित्य, शुक्रादित्य, मालव्य राजयोग तयार होत आहेत. यासोबतच चंद्र कन्या राशीत राहील. गुरु ग्रह वृषभ राशीत असल्याने चंद्रावर दृष्टी टाकत आहे. त्यामुळे गजकेसरी राजयोग निर्माण होत आहे. तसेच याच कन्या राशीत असलेल्या केतुशी चंद्राचा युती योग जुळून येत आहे. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी शनिवारही आहे. अशा प्रकारे योग सुमारे १०० वर्षांनी जुळून येत असल्याचा दावा केला जात आहे.
3 / 10
१० एप्रिल २०२५ रोजी गुरु नक्षत्र परिवर्तन करणार आहे. समर्थ रामदास स्वामींनी हनुमानाची उपासना महाराष्ट्रात पोहोचविली. ११ विविध ठिकाणी मारुतीची मंदिरे स्थापन करून उपासनेचे सामर्थ्य आणि सामर्थ्याच्या उपासना याचे महत्त्व प्रस्थापित केले. अशा हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी चैत्र पौर्णिमेला अनेक शुभ योग जुळून येत असून, कोणत्या राशींवर हनुमानाची कृपा होऊ शकते, ते जाणून घेऊया...
4 / 10
मेष: सुख, सोयी आणि सुविधा वाढू शकतील. गुंतवणुकीतून नफा मिळवण्याची संधी मिळेल. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायासोबत वैयक्तिक जीवनात अनुकूल परिणाम मिळतील. जीवनाच्या अनेक क्षेत्रात, विशेषतः काम आणि आर्थिक बाबींमध्ये यश मिळण्याची चिन्हे आहेत. आत्मविश्वास जीवनाला एक नवीन दिशा देईल. इच्छा पूर्ण होतील. पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकाल.
5 / 10
वृषभ: यश मिळेल. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता देखील असेल. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. सामाजिकदृष्ट्या वाढ होऊ शकते. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. बँक बॅलेन्स वाढू शकतो. व्यवसाय निर्यात आणि आयातीशी संबंधित आहे त्यांना लाभ मिळू शकेल.
6 / 10
मिथुन: काम आणि व्यवसायात विशेष यश मिळू शकते. नोकरीत पदोन्नतीची शक्यता राहील. बॉस आणि वरिष्ठ खूश असतील. कामाच्या ठिकाणी आदर मिळेल. सहकारी सहकार्य करू शकतील. धनलाभाचे योग जुळून येऊ शकतात. व्यापारात नवीन सौदे आणि करारांचा फायदा होऊ शकेल. उच्च शिक्षणासंदर्भात विद्यार्थांना अनुकूलता लाभू शकेल.
7 / 10
कर्क: आर्थिक लाभ मिळवण्याची संधी आहे. ते पैसे वाचवू शकता. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. धाडस आणि मेहनत वाढण्याची शक्यता आहे. नवीन काम सुरू करण्यासाठी किंवा मोठे ध्येय साध्य करण्यासाठी हा चांगला काळ असेल. प्रवासातून फायदा होऊ शकतो. हाती घेतलेली कामे पूर्ण होऊ शकतात. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहू शकेल.
8 / 10
तूळ: शत्रूंना पराभूत करण्यात यशस्वी व्हाल. कामाच्या ठिकाणी विविध फायदे मिळतील. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. जीवनात सकारात्मक बदल होतील. मनात एक वेगळाच उत्साह असेल. नोकरी करणाऱ्यांच्या पदोन्नतीबद्दल चर्चा होईल. या काळात इच्छा पूर्ण होतील. पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकाल.
9 / 10
धनु: देशात आणि परदेशात प्रवास करू शकता. बुद्धिमत्तेमुळे विविध क्षेत्रात यश मिळवू शकाल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळेल. तसेच या काळात वाहन आणि मालमत्तेचे सुख मिळू शकते. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. जीवनात सकारात्मक बदल होतील. मनात एक वेगळाच उत्साह असेल. नोकरी करणाऱ्यांच्या पदोन्नतीबद्दल चर्चा होईल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळू शकते.
10 / 10
मीन: दीर्घ काळापासून रखडलेले काम पूर्ण होऊ शकेल. लक्ष्मी देवीची कृपा लाभू शकेल. सुख-सुविधा वाढू शकतात. अडकलेले पैसे किंवा उधारीचे पैसे परत मिळू शकतात. वैवाहिक जीवन आनंदी राहील. जीवनसाथीसोबतचे संबंध दृढ होतील. आदर मिळेल. व्यक्तिमत्वही सुधारेल. करिअरबाबत एक मोठा निर्णय घेऊ शकता. इच्छा पूर्ण होतील. पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकाल. नियोजित योजना यशस्वी होऊ शकतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यspiritualअध्यात्मिकHanuman Jayantiहनुमान जयंती