शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हनुमान जयंती: ४ आहेत प्रिय राशी, हनुमंतांची विशेष कृपा; शनी-मंगलदोषातून मुक्तता, अनेक लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 2:47 PM

1 / 10
मराठी नववर्षात रामनवमीनंतर हनुमान जयंती देशभरात साजरी केली जाते. चैत्र पौर्णिमेला वानर गणांचा मुख्य केसरी आणि त्याची पत्नी अंजनी यांचा हनुमानाचा जन्म झाल्याची मान्यता आहे. हनुमान हा श्रीरामांचा निससीम भक्त असल्याच्या कथा वाल्मिकी रामायणात आढळतात. बुद्धी, शक्ती आणि भक्ती यांचा त्रिवेणी संगम म्हणजे हनुमंत. यंदा, २३ एप्रिल २०२४ रोजी हनुमान जयंती आहे.
2 / 10
समर्थ रामदास स्वामींनी हनुमानाची उपासना महाराष्ट्रात पोहोचविली. ११ विविध ठिकाणी मारुतीची मंदिरे स्थापन केली आणि सामर्थ्याच्या उपासनेचे महत्व प्रस्थापित केले. रामदास स्वामी यांनी रचलेले भीमरूपी महारुद्रा हे मारुती स्तोत्र महाराष्ट्रात उपासनेचे मुख्य स्तोत्र मानले जाते. हनुमंत चिरंजीव मानले गेले आहेत. हनुमंतांचे नुसते नाव घेतले तरी शक्ती संचारल्यासारखे वाटते. प्रभू श्रीरामांचे परमभक्त, शक्ती अन् सामर्थ्याचे दैवत मानल्या गेलेल्या हनुमान, बजरंगबलीचे देशभरात पूजन केले जाते.
3 / 10
उत्तर भारतात हनुमानाची उपासना प्रसिद्ध आहे. तुलसीदास विरचित हनुमान चालिसा उत्तर भारतात विशेष लोकप्रिय आहे. महाराष्ट्र राज्यात सामान्यपणे शनिवार, तर उर्वरित भारतात शनिवार आणि मंगळवार हे मारुतीच्या पूजेचे वार मानले जातात. सन २०२४ मध्ये मंगळवारी हनुमान जयंती येत असल्याचे याचे महत्त्व अत्याधिक वाढल्याचे सांगितले जात आहे.
4 / 10
यंदाच्या वर्षी हनुमान जयंतीला रवियोग, चित्रा नक्षत्र असून, ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी अनेक शुभ योग जुळून येत आहेत. मीन राशीत पंचग्रही योग तयार होत आहे. मेष राशीत बुध आणि सूर्याच्या संयोगामुळे बुधादित्य योग तयार होत आहे. तसेच मीन राशीत मालव्य राजयोग तयार होत आहे. शनी मूलत्रिकोण राशीत आल्याने शश राजयोग तयार होत आहे.
5 / 10
देशभरातील कोट्यवधी घरांमध्ये हनुमंतांचे पूजन, नामस्मरण, आराधना, उपासना केली जाते. मंगळवार, शनिवारी हनुमानाची विशेष पूजा केली जाते. मंगलदोष, शनी साडेसाती, शनीदोषाचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी हनुमंतांचे पूजन केले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, हनुमंतांच्या काही प्रिय राशी सांगितल्या गेल्या आहेत. जाणून घेऊया...
6 / 10
मेष: ही रास हनुमंतांची प्रिय रास असल्याचे मानले जाते. या राशीचा स्वामी मंगळ आहे. हनुमानजींची विशेष कृपा या राशीच्या व्यक्तींवर असते, असे सांगितले जाते. अशा व्यक्तींमध्ये प्रबळ इच्छाशक्ती, लक्ष्य केंद्रित करण्याची क्षमता असते. हनुमान त्यांच्यावर नेहमी प्रसन्न असतात. कौशल्य, ज्ञान आणि चतुराईने पैसे कमवू शकतात, अशी मान्यता आहे. या राशीच्या व्यक्तींनी दर मंगळवारी हनुमानजीची पूजा करावी, असे केल्याने संकटे दूर होण्यास मदत मिळू शकते. सौभाग्य प्राप्त होऊ शकते. कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
7 / 10
सिंह: ही रास हनुमानाची प्रिय रास मानली गेली आहे.या राशीचा स्वामी सूर्य आहे. हनुमानाची विशेष कृपा या राशीच्या व्यक्तींवर असते, असे सांगितले जाते. जीवनातील समस्यांपासून बजरंगबली संरक्षण करतात. हनुमानाच्या कृपेने पैशांचा ओघ सुरू राहतो. कधीही पैशाची कमतरता भासत नाही. या व्यक्ती करिअर आणि व्यवसायात प्रगती करू शकतात. या व्यक्तींना हनुमंतांच्या कृपेने विशेष लाभ होतो. नेतृत्व क्षमता वाढीस लागते, असे म्हटले जाते. हनुमानाची पूजा केल्याने या राशीच्या लोकांच्या समस्या दूर होऊ शकतात, अशी मान्यता आहे.
8 / 10
वृश्चिक: या राशीच्या व्यक्तींनी हनुमंतांची विशेष कृपा असते. या राशीचा स्वामी मंगळ आहे. हनुमानाच्या कृपेने या राशीचे लोक त्यांच्या प्रयत्नांमध्ये यशस्वी होऊ शकतात. हनुमानाच्या कृपेने कामे यशस्वी होऊ शकतात. ती फलदायी ठरू शकतात. या लोकांना हनुमानाची पूजा केल्याने खूप फायदा होतो. तसेच, आर्थिक स्त्रोतांच्या कमतरतेचा फटका बसत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
9 / 10
कुंभ: या राशीच्या लोकांवर विशेष हनुमानांचा आशीर्वाद असतो. या राशीचा स्वामी शनी आहे. आताच्या घडीला कुंभ राशीची साडेसाती सुरू आहे. या राशीच्या व्यक्तींना हनुमान अतिरिक्त लाभ देतात. कामात भरभराट करतात. अडथळ्यांपासून मुक्तता होऊ शकते. आनंदी, समृद्ध जीवन जगतात. आर्थिक स्थितीही अनुकूल असते. या राशीच्या व्यक्तींनी नियमितपणे हनुमानाची पूजा केली तर, शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
10 / 10
सदर कोणत्याही दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यHanuman Jayantiहनुमान जयंती