holi 2021 know about date time shubh muhurat and auspicious yoga and importance of holi
Holi 2021: कधी आहे होळी? 'या' ४ शुभ योगांवर साजरा होणार सण; पाहा, शुभ मुहूर्त आणि महत्त्व By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 1:44 PM1 / 12भारतीय संस्कृतीत सण, उत्सवांची काही कमतरता नाही. आपले विविध सण जितके आनंदी, उत्साही तितकेच अर्थपूर्णही आहेत. शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे 'होळी.' होळी हा वर्षातील शेवटचा सण.2 / 12देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरी करण्याची परंपरा, पद्धत वेगळी आहे. पहिल्या दिवशी होळी दहन केली जाते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते, याला धुलिवंदन असे म्हटले जाते. होळीला शिमगाही म्हटले जाते. भगवान शंकराची लीला, याला शिव-शिमगासुद्धा म्हटले जाते. 3 / 12दृष्ट प्रवृत्ती, वाईट, अमंगल विचार यांचा नाश करुन चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे, हा या सणामागील उद्देश. होळीनिमित्त पुरळपोळी, रंग, धुडवड या सगळ्याचे आकर्षण तर असतेच. धरतीमातेला वंदन करणारा हा सण म्हणूनच आपल्या मातृभूमीवरील प्रेमाचा, आपल्या देशभक्तीचा द्योतक आहे. (Importance of Holi)4 / 12होळीच्या दुसऱ्या दिवसापासून चार दिवसांना धुळवडीचे दिवस असतात आणि फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवसाला रंगपंचमी म्हणून ओळखले जाते. होळीच्या दिवशी धडाडून पेटलेल्या होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. 5 / 12होळीचा अग्नी आपल्या घरी आणून त्या अग्रीवर पाणी तापवून खान करण्याची प्रथा होती. होळी हा जनसामान्यांचा सण आहे आणि त्यात धूलिवंदनाला म्हणजे जमिनीला, मातीला नमस्कार करण्याला विशेष महत्त्व आहे.6 / 12सन २०२१ मध्ये २८ मार्च रोजी फाल्गुन पौर्णिमा आहे. याच दिवशी होळीचा सण साजरा केला जाईल. आपल्याकडे साजऱ्या केल्या सण-उत्सवांची कहाणी असते. होळीचीही एक कहाणी असून, ती सर्वश्रुत आहे. यंदाच्या वर्षी होळी सणाच्या दिवशी चार विशेष योग जुळून येत आहेत. (Holi 2021 Date)7 / 12फाल्गुन पौर्णिमा शनिवार, २७ मार्च २०२१ रोजी उत्तररात्रौ ०३ वाजून २७ मिनिटांनी सुरू होणार असून, रविवार, २८ मार्च २०२१ रोजी उत्तररात्रौ १२ वाजून १८ मिनिटांनी फाल्गुल पौर्णिमा समाप्त होईल. भारतीय परंपरेत सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे. तसेच होळीचा सणाच्या दिवशी रात्री होलिकादहन केले जात असल्यामुळे रविवार, २८ मार्च २०२१ रोजी हा सण साजरा केला जाईल. (Holi 2021 Time) 8 / 12यंदाच्या वर्षी होळीच्या सणाच्या दिवशी अनेक शुभ योग जुळून येत आहेत. २८ मार्च रोजी दुपारी ०१ वाजून ५३ मिनिटांनी भद्रा समाप्त होणार आहे. त्यामुळे प्रदोषकाळी होणारे होलिकादहन शुभ मानले जात आहे. होळीच्या दिवशी केले जाणारे होलिकादहन सायंकाळी ०६ वाजून ३७ मिनिटे ते रात्रौ ०८ वाजून ५६ मिनिटे या कालावधीत करावे, असे सांगितले जात आहे. (holi 2021 shubh muhurat)9 / 12होळी सणाच्या दिवशी वृद्धि योग जुळून येत आहे. नावाप्रमाणे हा योग शुभ कर्म आणि वृद्धी तसेच उन्नतीकारक मानला जातो. वृद्धि योगासह या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग जुळून येत आहेत. (holi 2021 auspicious yoga)10 / 12२८ मार्च रोजी सूर्योदयापासून ते दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत सर्वार्थ सिद्धी योग जुळून येत आहे. या योगात साजरे केले जाणारे सण शुभ फलदायक, कल्याणकारी तसेच मंगलकारी असल्याचे सांगितले जाते. आर्थिक गुंतवणूक आणि उपाय करणे या कालावधी शुभ फलदायी ठरू शकते, अशी मान्यता आहे. मंत्र साधना आणि शुभ कार्यारंभासाठीही सर्वार्थ सिद्धि योग उपयुक्त आणि धनलाभदायक मानला जातो. 11 / 12होळी सणाच्या दिवशी म्हणजे २८ मार्च रोजी सायंकाळी ०५ वाजून ३६ मिनिटांपासून अमृत सिद्धि योग जुळून येत आहे. सर्वार्थ सिद्धि योग आणि अमृत सिद्धि योग एकाच वेळी जुळून येणेही शुभ मानले जाते. अमृत सिद्धि योगात होळीचा सण साजरा होणे लाभदायक असल्याचे मानले जाते. 12 / 12होळीच्या सणाच्या दिवशी ग्रहांची स्थिती उत्तम असल्याचे सांगितले जाते. गुरू आणि शनी एकाच म्हणजेच मकर राशीत विराजमान आहेत. तसेच शुक्र आपल्या उच्च म्हणजेच मीन राशीत असून, सूर्यही मीन राशीत आहे. होळीच्या दिवशी ग्रहांची अशी स्थिती दुर्लभ असल्याचे म्हटले जाते. आणखी वाचा Subscribe to Notifications