शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Holi 2021: तब्बल ४९९ वर्षांनंतर होळीला अद्भूत शुभ योग; पाहा, महत्त्व व मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 10:26 PM

1 / 15
भारतीय संस्कृतीत फाल्गुन पौर्णिमा होळी म्हणून साजरी करण्याची प्राचीन परंपरा आहे. हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद यांच्याशी निगडीत होलिकादहनाची कथा सर्वश्रुत आहे. देशभरात विविध ठिकाणी होळी सण साजरी करण्याची परंपरा, पद्धत वेगळी आहे. (amazing auspicious yoga on holi)
2 / 15
भारतीय संस्कृतीत सण, उत्सवांची कमतरता नाही. होळी हा सण मराठी वर्षातील शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा सण. दृष्ट प्रवृत्ती, वाईट, अमंगल विचार यांचा नाश करुन चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे, हा या सणामागील उद्देश.
3 / 15
होळीच्या पहिल्या दिवशी होलिकादहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते, याला धुलिवंदन असे म्हटले जाते. होळीच्या दुसऱ्या दिवसापासून चार दिवसांना धुळवडीचे दिवस असतात आणि फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवसाला रंगपंचमी म्हणून ओळखले जाते. (significance of rare yoga on holi 2021)
4 / 15
होळीच्या दिवशी धडाडून पेटलेल्या होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. मात्र, यंदाच्या होळी सणावर कोरोनाचे सावट असून, विविध ठिकाणी सूचना, मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात आली आहेत. भारतीय संस्कृतीतील प्रमुख सण-उत्सवांपैकी एक असलेल्या होळीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि शास्त्रीय महत्त्वही अनन्य साधारण असेच आहे.
5 / 15
सन २०२१ मध्ये २८ मार्च रोजी फाल्गुन पौर्णिमा आहे. याच दिवशी होळीचा सण साजरा केला जाईल. आपल्याकडे साजऱ्या केल्या सण-उत्सवांची कहाणी असते. होळीचीही एक कहाणी असून, ती सर्वश्रुत आहे. यंदाच्या वर्षी होळी सणाच्या दिवशी अद्भूत शुभ योग जुळून येत आहेत. जाणून घेऊया... (rare yoga come after 499 years on holi)
6 / 15
यंदाच्या होळी सणाला तब्बल ४९९ वर्षांनी अत्यंत दुर्मिळ योग जुळून येत आहे. ज्योतिषशास्त्राच्या जाणकारांच्या यंदाची होळी अगदी विशेष आणि महत्त्वाची ठरणार आहे.
7 / 15
सन २०२१ मधील फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी चंद्र कन्या राशीत प्रवेश करणार असून, तर शनी ग्रह स्वगृही म्हणजेच मकर राशीमध्ये विराजमान असेल. ग्रहांचा असा योगायोग यापूर्वी ०३ मार्च १५२१ रोजी जुळून आला होता. त्यानंतर आता ४९९ वर्षांनंतर असा दुर्मिळ योग जुळून येत आहे.
8 / 15
यंदाच्या होळी सणाच्या दिवशी अमृत योग, सर्वार्थ सिद्धी योग, ध्रुव योगही जुळून येत आहे. चंद्र कन्या राशीत, शनी आणि गुरु मकर राशीत, शुक्र आणि सूर्य मीन राशीत, मंगळ आणि राहु वृषभ राशीत, बुध कुंभ राशीत, केतु वृश्चिक राशीत विराजमान असेल, तेव्हा ध्रुव योग जुळून येतो, असे सांगितले जाते.
9 / 15
२८ मार्च रोजी दुपारी ०१ वाजून ५३ मिनिटांनी भद्रा समाप्त होणार आहे. त्यामुळे प्रदोषकाळी होणारे होलिकादहन शुभ मानले जात आहे. होळीच्या दिवशी केले जाणारे होलिकादहन सायंकाळी ०६ वाजून ३७ मिनिटे ते रात्रौ ०८ वाजून ५६ मिनिटे या कालावधीत करावे, असे सांगितले जात आहे.
10 / 15
होळी सणाच्या दिवशी वृद्धि योग जुळून येत आहे. नावाप्रमाणे हा योग शुभ कर्म आणि वृद्धी तसेच उन्नतीकारक मानला जातो. वृद्धि योगासह या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग जुळून येत आहेत.
11 / 15
२८ मार्च रोजी सूर्योदयापासून ते दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत सर्वार्थ सिद्धी योग जुळून येत आहे. तर, याच दिवशी सायंकाळी ०५ वाजून ३६ मिनिटांपासून अमृत सिद्धि योग जुळून येत आहे. सर्वार्थ सिद्धि योग आणि अमृत सिद्धि योग एकाच वेळी जुळून येणेही शुभ मानले जाते.
12 / 15
फाल्गुन पौर्णिमा शनिवार, २७ मार्च २०२१ रोजी उत्तररात्रौ ०३ वाजून २७ मिनिटांनी सुरू होणार असून, रविवार, २८ मार्च २०२१ रोजी उत्तररात्रौ १२ वाजून १८ मिनिटांनी फाल्गुल पौर्णिमा समाप्त होईल.
13 / 15
भारतीय परंपरेत सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे. तसेच होळीचा सणाच्या दिवशी रात्री होलिकादहन केले जात असल्यामुळे रविवार, २८ मार्च २०२१ रोजी हा सण साजरा केला जाईल.
14 / 15
होलिकादहनाचा मुहूर्त सायंकाळी ०६ वाजून ३७ मिनिटांपासून ते रात्रौ ८ वाजून ५६ वाजेपर्यंत असेल. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच २९ मार्च रोजी धुळवड साजरी करण्यात येणार आहे.
15 / 15
होलिकादहनाचा मुहूर्त सायंकाळी ०६ वाजून ३७ मिनिटांपासून ते रात्रौ ८ वाजून ५६ वाजेपर्यंत असेल. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच २९ मार्च रोजी धुळवड साजरी करण्यात येणार आहे.
टॅग्स :HoliहोळीYogaयोग