holi 2021 know about these places in india where holi does not celebrate
Holi 2021: अजब घटनांचे गजब वास्तव! 'या' ठिकाणी २०० वर्षांपासून साजरी करत नाहीत होळी By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 10:18 PM1 / 15मराठी वर्षातील शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा सण म्हणजे होळी. भारतीय संस्कृतीत सण, उत्सवांची कमतरता नाही. आपले विविध सण जितके आनंदी, उत्साही तितकेच अर्थपूर्णही आहेत.देशभरात विविध ठिकाणी होळी सण साजरी करण्याची परंपरा, पद्धत वेगळी आहे.2 / 15होळीच्या पहिल्या दिवशी होलिकादहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते, याला धुलिवंदन असे म्हटले जाते. होळीच्या दुसऱ्या दिवसापासून चार दिवसांना धुळवडीचे दिवस असतात आणि फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवसाला रंगपंचमी म्हणून ओळखले जाते.3 / 15दृष्ट प्रवृत्ती, वाईट, अमंगल विचार यांचा नाश करुन चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे, हा या सणामागील उद्देश. होळीच्या दिवशी धडाडून पेटलेल्या होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. मात्र, यंदाच्या होळी सणावर कोरोनाचे सावट असून, विविध ठिकाणी सूचना, मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात आली आहेत.4 / 15भारतीय संस्कृतीतील प्रमुख सण-उत्सवांपैकी एक असलेल्या होळीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि शास्त्रीय महत्त्वही अनन्य साधारण असेच आहे. मात्र, भारतात अशीही काही ठिकाणे आहेत, जेथे होळी खेळली जात नाही. होळी न खेळण्यामागील कारणेही अजब आहेत. जाणून घेऊया... (places in india where holi does not celebrate)5 / 15झारखंडमधील बोकारो येथील कसमार दुर्गापूर भागात गेल्या १०० वर्षांपासून होळी खेळण्यात आलेली नाही. होळी साजरी केल्याने गावात महामारी किंवा मोठी नैसर्गिक आपत्ती येईल, अशी भीती या गावातील लोकांना वाटते. 6 / 15या गावातील स्थानिक एकमेकांना रंगही लावत नाहीत. राजाच्या मुलाचा मृत्यू होळीदिनी झाला होता. यानंतर ज्या ज्या वेळी गावात होळीचे आयोजन करण्यात आले, तेव्हा महामारीने या गावाचे मोठे नुकसान केले. त्यामुळे राजाच्या आज्ञेवरून या गावात होळी साजरी करणे बंद करण्यात आले, असे सांगितले जाते. 7 / 15मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील मुलताई येथे असलेल्या डहुआ गावात गेल्या १२५ वर्षांपासून होळी साजरी करण्याला प्रतिबंध घालण्यात आला आहे. या गावातील प्रमुख व्यक्तीचा मृत्यू होळीदिनी झाला होता.8 / 15प्रमुख व्यक्तीच्या निधनामुळे संपूर्ण गावावर अज्ञान दहशत बसली. यानंतर कधीही या गावात होळी साजरी करण्यात आली नाही. मात्र, आता ही गोष्ट धार्मिक मान्यतेत परावर्तीत झाली आहे, असे सांगितले जाते. 9 / 15हरियाणामधील कैथल परिसरातील गुहल्ला या गावात १५० वर्षांपासून होळी साजरी केली जात नाही. या गावात एक साधूबाबा राहात होते. काही गावकऱ्यांनी होळीच्या दिवशी या बाबांची चेष्टा केली. ही चेष्टा बाबांच्या इतकी जिव्हारी लागली की, साधूबाबांनी होलिकादहनावेळी होळीत उडी घेऊन आत्मदहन केले. 10 / 15यापुढे गावात होळी साजरी करणाऱ्या कुटुंबाचा सर्वनाश होईल, असा शापही दिला. त्या दिवसापासून या गावात होळीची परंपरा स्थगित झाली आहे. गुहल्लातील गावकरी एकमेकांनी होळीच्या शुभेच्छाही देत नाहीत, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 11 / 15छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात असलेल्या खरहरी नामक गावात सुमारे १५० वर्षांपासून होळी खेळली जात नाही. होळीच्या दिवशी हे गाव आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. यानंतर गावात महामारी पसरली. यात गावाचे अतोनात नुकसान झाले. तेव्हापासून या गावात होळी खेळली जात नाही.12 / 15छत्तीसगड राज्यातील धमनागुडी या गावात २०० वर्षांपासून होळी साजरी केली जात नाही. या गावात गुलाल उधळणे आणि होलिकादहन करण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. होळीच्या दिवशी एकही गावकरी आपल्या घराच्या बाहेर पडत नाही.13 / 15उत्तर प्रदेशातील कुंडरा गावात केवळ महिलांना होळी खेळण्याची परवानगी आहे. या गावातील राम-जानकी मंदिरात एकत्र जमून महिला होळीचा सण मोठ्या धूमधडाक्यात साजरा करतात. मात्र, कोणत्याही पुरुषाला किंवा लहानग्यांना होळी खेळण्यास प्रतिबंध आहे.14 / 15सन २०२१ मध्ये २८ मार्च रोजी फाल्गुन पौर्णिमा आहे. याच दिवशी होळीचा सण साजरा केला जाईल. आपल्याकडे साजऱ्या केल्या सण-उत्सवांची कहाणी असते. होळीचीही एक कहाणी असून, ती सर्वश्रुत आहे. यंदाच्या वर्षी होळी सणाच्या दिवशी चार विशेष योग जुळून येत आहेत.15 / 15फाल्गुन पौर्णिमा शनिवार, २७ मार्च २०२१ रोजी उत्तररात्रौ ०३ वाजून २७ मिनिटांनी सुरू होणार असून, रविवार, २८ मार्च २०२१ रोजी उत्तररात्रौ १२ वाजून १८ मिनिटांनी फाल्गुल पौर्णिमा समाप्त होईल. भारतीय परंपरेत सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे. तसेच होळीचा सणाच्या दिवशी रात्री होलिकादहन केले जात असल्यामुळे रविवार, २८ मार्च २०२१ रोजी हा सण साजरा केला जाईल. आणखी वाचा Subscribe to Notifications