शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Holi 2022 : आयुष्यातील अनंत अडचणी होलिकादहनात नष्ट व्हाव्यात यासाठी राशीप्रमाणे दिलेले उपाय करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2022 11:31 AM

1 / 13
१७ मार्च २०२२ रोजी गुरुवारी होलिका दहन होणार असून दुसऱ्या दिवशी १८ मार्च रोजी रंगपंचमी साजरी करण्यात येणार आहे. होळी हा सण आयुष्यातील संकटे, लग्न, पैशाची चणचण, नोकरी-व्यवसाय, रोगराई इत्यादी समस्यांचे दहन आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्याचाही सण आहे. यासाठी होलिका दहनाच्या दिवशी होळीचे दर्शन घ्यावे आणि मनातील वाईट विचारांचे दहन करावे. त्याचबरोबर ज्योतिष शास्त्रानुसार होलिका दहनाच्या दिवशी काही खास उपाय केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होऊ शकतात. अडचणी किंवा संकटांची तीव्रता कमी होईपर्यंत हे उपाय करावेत आणि नंतर देवदर्शन घेऊन उपायांची पूर्तता करावी. ते उपाय कोणते हे जाणून घेऊया.
2 / 13
होळीच्या दिवशी मेष राशीच्या लोकांनी काळी मिरी आणि बेलाची पाने लाल कपड्यात बांधून देवघरात ठेवावीत. तसेच घरात गुलाबाचे रोप लावावे.
3 / 13
छोटी वेलची, आंब्याची पाने आणि भीमसेनी कापूर पांढऱ्या कपड्यात बांधून देवघरात ठेवावा. घरामध्ये पांढऱ्या फुलांची लागवड केल्यानेही खूप फायदा होतो.
4 / 13
होळीच्या दिवशी मिथुन राशीच्या लोकांनी चांदीचे २ शिक्के, अक्षता हिरव्या कपड्यात बांधून देवघरात ठेवाव्यात. सर्व अडचणी दूर होतील.
5 / 13
पांढर्‍या रंगाच्या कपड्यात शंख, चंदन किंवा नारळ बांधून देवघरात ठेवा, काही दिवसांत दिवस बदल घडू लागतील.
6 / 13
सिंह राशीच्या लोकांनी सुपारी, तांब्याच्या ५ अंगठ्या किंवा लाल कुंकू, केशरी कपड्यात बांधून देवघरात ठेवल्याने लाभ होईल.
7 / 13
शंख, सोन्याचे नाणे, अक्षता हळदीसह हिरव्या कपड्यात बांधून देवघरात गंगाजलाच्या शेजारी ठेवल्यास फायदा होईल.
8 / 13
कमळाच्या बिया, कापूर आणि चांदीच्या ७ अंगठ्या पांढऱ्या रंगाच्या कपड्यात बांधून देवघरात ठेवा. याशिवाय बागेमध्ये, खिडकीतल्या कुंडीत शक्य असल्यास पांढरी फुले लावा. प्रत्येक कामात यश मिळेल.
9 / 13
वृश्चिक राशीच्या लोकांनी बेलपत्र आणि बेलफळ तांबड्या रंगाच्या कापडात बांधून देवघरात ठेवावे.
10 / 13
होळीच्या दिवशी धनु राशीच्या लोकांनी पिंपळाचे लाकूड, हळकुंडाच्या गाठी, पिवळ्या अक्षता, पिवळ्या कपड्यात बांधून देवघरात ठेवाव्यात. विष्णूंची कृपा होईल.
11 / 13
होळीच्या दिवशी मकर राशीच्या लोकांनी काळे तीळ, काळे उडीद, गुग्गुळ, निळ्या रंगाच्या कापडात बांधून देवघरात ठेवावे. शनिदेवाच्या कृपेने सर्व कामे मार्गी लागतील.
12 / 13
कुंभ राशीच्या लोकांनी निळ्या कपड्यात नारळ बांधून मनोकामना पूर्ती होईपर्यंत देवघरात ठेवावा. तसेच पपईचे झाड लावल्यास खूप फायदा होईल.
13 / 13
मीन राशीच्या लोकांनी पिवळी मोहरी, अक्षता तपकिरी रंगाच्या कापडात बांधून देवघरात ठेवावे. बाजूला गंगाजल ठेवावे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषHoliहोळी