शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Holi 2022: होळीला करा ‘या’ ६ गोष्टी; लक्ष्मी देवीचे मिळतील शुभाशिर्वाद, पैसे कमी पडणार नाहीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 8:33 AM

1 / 9
मराठी नववर्षातील मोठा शेवटचा सण म्हणजे होळी. होळीला रंगांचा सण म्हणूनही ओळखले जाते. सन २०२२ मध्ये १७ मार्च रोजी होळी साजरी केली जाणार आहे. संपूर्ण देशभरात अनेकविध पद्धतीने होळी साजरी केली जाते. (Holi 2022)
2 / 9
होळी म्हटली की, तरुणाईमध्ये वेगळा उत्साह संचारतो. दुसरीकडे, हिंदू धर्मातील सण-उत्सवांकडे समृद्धी, सौभाग्य, सुख-समाधान, सकारात्मकता यादृष्टीनेही पाहिले जाते. फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी संपूर्ण देशभरात धुलिवंदनाची धूम असते.
3 / 9
भारतीय संस्कृती, परंपरांमध्ये होळीच्या सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. होळीच्या दिवशी काही गोष्टींचे आचरण केल्यास लक्ष्मी देवीचे शुभाशिर्वाद लाभू शकतात. धनलाभाचे योग जुळून येऊ शकतात, असे सांगितले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी नेमके काय करावे? जाणून घ्या...
4 / 9
होळीच्या दिवशी प्रथमेश असलेल्या गणपती बाप्पाचे पूजन करणे शुभ तसेच परमफलदायी मानले जाते. होळीच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा करताना गुलाल, पान आणि दुर्वा अर्पण कराव्यात, असे म्हटले जाते. असे केल्याने घरातील आर्थिक स्थिती सुधारू शकते. तसेच लक्ष्मी देवीचा वास घरात नेहमी राहतो, असे सांगितले जाते.
5 / 9
होळीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणीची एक प्रतिमा घरी आणणे अतिशय शुभ मानले गेल्याचे सांगितले जात आहे. असे केल्याने घरात धन आणि वैभवाचे आगमन होऊ शकते, अशी मान्यता आहे. राधाकृष्णाची प्रतिमा देवघरात किंवा बेडरूममध्ये ठेऊ शकतात. मात्र, प्रतिमा स्थापन करण्यापूर्वी गुलाल आणि फुले अर्पण करावे, असे सांगितले जात आहे.
6 / 9
होळीच्या दिवशी एखादे रोपटे घरात आणून लावणे उपयुक्त मानले गेले आहे. यामुळे अनेक प्रकारचे ग्रहदोष दूर होऊ शकतात. यामध्ये तुळशीचे रोप, मनीप्लांट आणि अन्य गुडलक देणारी रोपे लावणे शुभलाभदायक मानले गेले आहेत.
7 / 9
लक्ष्मी देवीच्या आराधनेतील एक महत्त्वाचा भाग म्हणजे श्रीयंत्र. लक्ष्मी देवीला श्रीयंत्र प्रिय असल्याची मान्यता आहे. ज्या घरात श्रीयंत्र स्थापन केले जाते, त्या घरात लक्ष्मी देवी कायम वास करते, असे म्हटले जाते. असे शुभ मानले जाणारे श्रीयंत्र होळीच्या दिवशी घरातील देवघरात, दुकानात, कारखान्यात किंवा घरातील तिजोरीत ठेवणे लाभदायक मानले जाते. असे केल्याने धनवृद्धी होत राहते, असे म्हटले जाते.
8 / 9
होळीची रात्र सिद्ध रात्र असल्याची मान्यता आहे. या रात्री केलेले प्रयोग यशस्वी होतात, असे म्हटले जाते. होळीच्या रात्री पिंपळाच्या झाडाचे पूजन करावे. यामुळे धन-वैभवाची प्राप्ती होऊ शकते. होलिकादहनावेळी पिंपळाच्या झाडाशी तुपाचा दिवा लावावा. तसेच वृक्षाची सातवेळा प्रदक्षिणा करावी. असे केल्याने आर्थिक तंगी, संकट दूर होऊ शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
9 / 9
कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी होळीच्या दिवशी होलिका दहनावेळी शिवलिंगावर २१ गोमती चक्र अर्पण करावीत, असे सांगितले जाते. याशिवाय दुसऱ्या दिवशी स्नानादी कार्ये उरकल्यानंतर ती गोमती चक्र लॉकर किंवा तिजोरित ठेवावीत. असे केल्याने घरात पैशांची कमतरता कधी राहणार नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
टॅग्स :HoliहोळीAstrologyफलज्योतिष