शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Holi 2022: होळीला तुमच्या राशीनुसार करा रंगांची उधळण; भाग्याची साथ लाभेल, नशीब उजळेल, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 7:09 AM

1 / 12
भारतीय प्राचीन परंपरांमध्ये सण आणि उत्सवांना अनन्य साधारण महत्त्व आहे. मराठी वर्षभरात नाना प्रकारचे सण आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. मराठी वर्षातील शेवटचा मोठा सण म्हणून होळी साजरी केली जाते. (Holi 2022)
2 / 12
होळी हा रंगांचा सण मानला जातो. रंगांचा मानवी जीवनावर विशेष प्रभाव पडत असतो. होळीला योग्य रंगांचा वापर केल्यास आपल्या कुंडलीतील ग्रहदोष दूर होऊ शकतात, असे ज्योतिषशास्त्रात मानले जाते. आपापसातील वैरभाव विसरून आनंद साजरा करण्यासाठी होळी साजरी केली जाते. (Holi 2022 Astrology)
3 / 12
यंदाच्या वर्षी १७ मार्च रोजी होलिकादहन असून, १८ मार्च रोजी धुलिवंदन साजरे केले जाणार आहे. या होळी दोन विशेष दिवशी रंगांची मोठ्या प्रमाणात उधळण केली जाते. बाजारात नानाविध आकर्षक रंग उपलब्ध असतात. (Holi 2022 Colors As Per Zodiac Signs)
4 / 12
रंगांचे स्वतःचे असे एक महत्त्व असते. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी तुमच्या राशीप्रमाणे रंगांचा वापर केल्यास तुमचे भाग्य चमकू शकते. जीवनात आनंद, सुख-समृद्धी यांची वृद्धी होऊ शकते. जाणून घ्या...
5 / 12
होळीला मेष आणि वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी लाल, गुलाबी तसेच पिवळ्या रंगांचा वापर करणे उपयुक्त ठरू शकते. या दोन्ही राशीचा स्वामी मंगळ आहे.
6 / 12
वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. होळीला वृषभ आणि तूळ राशीच्या व्यक्ती पांढरा, गुलाबी आणि करडा या रंगांचा वापर करणे लाभदायक ठरू शकते. तसेच निळा, हिरवा या रंगांनीही होळी खेळली जाऊ शकते.
7 / 12
मिथुन आणि कन्या या राशीचा स्वामी बुध आहे. या दोन राशीच्या व्यक्तींनी होळीला हिरव्या रंगाचा प्रयोग करणे शुभ मानले गेले आहे.
8 / 12
कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. या राशीच्या व्यक्तींनी पांढरा किंवा करडा रंग होळीला वापरणे शुभलाभदायक ठरू शकते. याशिवाय पिवळा रंगही आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतो, असे सांगितले जात आहे.
9 / 12
सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. या राशीच्या व्यक्तींनी होळीला नारंगी, पिवळ्या रंगांनी होळी खेळावी, असे सांगितले जात आहे. असे केल्याने जीवनात मधुरता येऊ शकते. आनंद द्विगुणित होऊ शकतो.
10 / 12
धनु आणि मीन राशीचा स्वामी गुरु आहे. या राशीच्या व्यक्तींनी होळीच्या दिवशी पिवळ्या, लाल आणि नारंगी रंगाचा वापर करणे शुभ मानले गेले आहे.
11 / 12
मकर आणि कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. या राशीच्या व्यक्तींनी होळीला निळा, वांगी रंगाचा वापर करणे लाभदायक ठरू शकते, असे सांगितले जात आहे.
12 / 12
होळी म्हटली की, तरुणाईमध्ये वेगळा उत्साह संचारतो. दुसरीकडे, हिंदू धर्मातील सण-उत्सवांकडे समृद्धी, सौभाग्य, सुख-समाधान, सकारात्मकता यादृष्टीनेही पाहिले जाते. फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी संपूर्ण देशभरात धुलिवंदनाची धूम असते.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यHoliहोळी 2022