४ शुभ योगांत होळी: ७ राशींना दुप्पट लाभ, व्हाल मालामाल; सुख-समृद्धी, पद-पैसा वृद्धी! By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 7:07 AM
1 / 10 मराठी वर्षातील शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा असलेला होळी सण देशभरात साजरा केला जातो. देशात होळीचे विविध रंग असल्याचे दिसते. होळीला धार्मिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक महत्त्व असल्याचे सांगितले जाते. यंदाची होळी अनेकार्थाने विशेष मानली जात आहे. यंदाच्या होळीला चंद्रग्रहण आहे. 2 / 10 यंदाच्या होळीला ४ शुभ योग जुळून येत आहे. शनी स्वराशीत कुंभ राशीत आहे. त्यामुळे शश नामक शुभ योग जुळून आला आहे. तर मीन राशीत सूर्य, बुध आणि राहु यांचा त्रिग्रही योग, ग्रहण योग आणि बुधादित्य योग जुळून आला आहे. तसेच वृद्धी योग आणि धनयोगही जुळून आला आहे. या योगांमध्ये ही होळी विशेष ठरणारी सिद्ध होऊ शकते, असे म्हटले जात आहे. 3 / 10 होळी हा सण सकारात्मकता देणारा मानला जातो. होळीपासून वातावरणातही बदल होतो. एकूणच शुभ योगांतील होळीचा सण कोणत्या राशींना चांगला, सकारात्मक आणि धन-धान्य वृद्धी करणारा ठरू शकेल? जाणून घेऊया... 4 / 10 मेष: होळीचा सण उत्तम लाभदायक ठरू शकेल. होळीला चंद्रग्रहण असले तरी शुभ योगांमुळे यशकारक काळ ठरू शकेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगती करण्याच्या अनेक संधी मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराशी असलेले नाते अधिक मजबूत होऊ शकेल. 5 / 10 वृषभ: आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात सावध राहावे लागेल पण दुप्पट फायदा होऊ शकेल. नोकरीत प्रगती होईल. करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसू लागतील. नोकरीत बढती वगैरेची बातमी मिळू शकते. आर्थिक लाभ मिळतील. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. 6 / 10 सिंह: सुखाची प्राप्ती होईल. वर्तन योग्य ठेवले नाही तर संमिश्र परिणाम मिळतील. कामाचे कौतुक होईल. मुलांशी संबंधित काळजी त्रास्त करू शकते. वादांपासून दूर राहा. दानधर्म करा. नोकरी आणि व्यवसायात चांगली कामगिरी करू शकाल. जी गुंतवणूक कराल, तुम्हाला नफा मिळण्याची शक्यता आहे. मालमत्ता खरेदी करू शकता. 7 / 10 धनु: कामात यश मिळेल. विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होणारे सकारात्मक परिणाम प्राप्त करतील. परंतु त्यांना कठोर परिश्रम करावे लागतील. नोकरीत अनुकूल परिणाम मिळतील. 8 / 10 मकर: आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वाहन खरेदी करायचे असल्यास त्या दृष्टीने अनुकूल राहील. नोकरीत सकारात्मक परिणाम दिसून येतील. नात्याबाबत काही वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 9 / 10 कुंभ: आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल दिसू शकतील. कौटुंबिक जीवनातही सुख आणि समृद्धी मिळेल. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. एकामागून एक अनेक नवीन डील फायनल करू शकता. 10 / 10 मीन: ग्रहण योग, बुधादित्य राजयोगामुळे व्यवसायात नफा मिळेल. शेअर्समध्ये गुंतवणूक करून नफा मिळेल. गुंतवणुकीशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक विचार करूनच घ्या. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. कौटुंबिक जीवन खूप आनंददायी असणार आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. आणखी वाचा