शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Holi Astro 2025: होळीला राहू-केतू दाखवणार रंग, 'या' राशींच्या आनंदाचा होणार बेरंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 16:38 IST

1 / 5
यंदा १३ मार्च रोजी होलिकादहन (Holi 2025) आणि १४ मार्च रोजी रंगांची होळी खेळली जाणार आहे. त्यालाच आपण शिमगोत्सव असेही म्हणतो. होळी हा रंगांचा सण लोकांच्या जीवनात आनंद आणतो. पण यंदा होळीनंतर लगेचच असे ग्रह संक्रमण होत आहे, जे काही लोकांसाठी चांगले म्हणता येणार नाही. वास्तविक, होळीच्या अवघ्या २ दिवसांनी राहू-केतू हे पाप ग्रह नक्षत्र बदलत आहेत. १६ मार्चच्या संध्याकाळी राहू-केतू पूर्वाभाद्रपद आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करतील. हा नक्षत्र बदल ४ राशींसाठी चांगला मानला जाणार नाही.
2 / 5
मेष राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. तुम्हाला तुमच्या मेहनतीनुसार फळ मिळणार नाही. या काळात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. तसेच जोडीदाराशी मतभेद झाल्याने वैवाहिक जीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या काळात आर्थिक नुकसान संभवते.
3 / 5
तुमच्या करिअरमध्ये अनपेक्षित बदल घडू शकतात, ज्यामुळे तुमच्यावर ताण येईल. हे शक्य आहे की काही लोकांना नोकरी बदलण्यास भाग पाडले जाऊ शकते किंवा त्यांच्या नोकरीवर गदा येऊ शकते. सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊ शकतात. आर्थिक नुकसान होऊ शकते. शक्यतो सर्वांशी गोडी गुलाबीने वागा आणि रागावर नियंत्रण ठेवा.
4 / 5
औषधांपासून दूर राहा, अन्यथा तुमच्या अडचणी वाढतील. वाहन जपून चालवा. कोणाशीही वाद घालू नका. आर्थिक संकट येऊ शकते. अशा काळात कर्ज घेणे टाळा. अन्यथा कर्ज फेडणे कठीण होईल. मन शांत ठेवणे आवश्यक आहे ही खूणगाठ बांधा.
5 / 5
व्यवसायात अचानक नुकसान होऊ शकते. पैसा कुठेतरी अडकू शकतो. या काळात कोणालाही मोठ्या रकमेचे कर्ज देणे टाळा. गुंतवणूक करू नका. आरोग्याची काळजी घ्या. अनावश्यक खर्च उद्भवतील आणि कर्जबाजारी होणार नाही याची काळजी घ्या.
टॅग्स :Holiहोळी 2024Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य