Holi: Do this work secretly on Holi day, success in every work, progress will be made
Holi: होळीच्या दिवशी गुपचूप करा हे काम, प्रत्येक कार्यात मिळेल यश, होईल प्रगती By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2023 9:25 AM1 / 6 हिंदू धर्मामध्ये होळीच्या सणाला खास महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये होळीच्या दिवशी करण्यात येणारे उपाय हे खूप परिणामकारक असे सांगण्यात आले आहे. अशी समजूत आहे की, जर तुम्ही जीवनामध्ये कुठल्याही समस्येचा सामना करत असाल तर होळीच्या दिवशी केलेल्या या उपायांमुळे तुम्हाला त्या समस्यांपासून मुक्ती मिळेल. हे उपाय पुढील प्रमाणे. 2 / 6जर तुमचे पैसे कुठे अडकलेले असतील आणि मिळण्याची शक्यता कमी दिसत असेल तर ज्या ठिकाणी होळीचं दहन होत असेल तिथे एक डाळींबाच्या काठीवर त्या व्यक्तीचं नाव लिहून त्यावर हिरव्या रंगाचा गुलाल टाकून ती होळीमध्ये टाका, असं केल्यानं तुमचं अडकलेलं येणं वसूल होईल. 3 / 6जर तुमचा व्यवसाय मंदीत चालू असेल, तर तुम्ही होळीच्या दिवशी पिवळ्या कपड्यामध्ये काळी हळद, ११ गोमती चक्र आणि एक चांदीचं नाणं, काळ्या कपड्यामध्ये बांधून होळीला ११ प्रदक्षिणा घाला. तसेच १०८ वेळा ‘ऊँ महालक्ष्म्यै नमः’ मंत्राचा जप करा. त्यानंतर ते होळीच्या अग्नीत टाका. असं केल्यानं तुमच्या व्यवसायात प्रगती होईल. 4 / 6ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेत यश हवं असेल, त्यांनी होळीच्या अग्नीत पान, नारळ आणि सुपारीची आहुती द्यावी. हा उपाय केल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. 5 / 6होलिका दहनाच्या दिवशी सर्वप्रथम इष्टदेवतेला गुलाल अर्पण करा. तसेच घरामध्ये असलेल्या देवघरात विधि-विधानानुसार पूजा करा. तुमचं देवघर उत्तर-पूर्व दिशेला असलं पाहिजे. असं केल्याने सर्व ग्रह दोषांपासून मुक्ती मिळते. 6 / 6जर तुम्हाला तुमच्या योग्यतेनुसार नोकरी मिळवायची असेल, तर होळीच्या दिवशी ८ लिंबू घेऊन, ते स्वत:वरून २१ वेळा ओवाळून घ्या. त्यानंतर ते होळीच्या आगीत अर्पण करा. तसेच मनामध्ये होलिका देवीकडे मनातील इच्छांच्या पूर्ततेसाठी प्रार्थना करा. हा उपाय ज्या उद्देशाने केला जातो, त्यात अवश्य यश मिळते. ( या लेखामध्ये दिलेली माहिती सर्वसामान्य माहिती आणि विविध रुढींवर आधारित आहे. लोकमत.कॉम त्याला दुजोरा देत नाही) आणखी वाचा Subscribe to Notifications