Holi Vastu tips:होळी आणि रंगपंचमीनिमित्त जाणून घेऊया वास्तूच्या दृष्टीने महत्त्वाचे रंग आणि रंगाचे महत्त्व! By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 3:44 PM
1 / 7 पिवळा रंग आरोग्यवर्धक मानला जातो. हा रंग ऊर्जेचे, प्रकाशाचे प्रतीक असल्यामुळे अध्यात्माशीदेखील त्याची सांगड घातली जाते. तुम्ही जर घराला फिकट पिवळा रंग लावलात, तर घर आकर्षक होईल, शिवाय या रंगामुळे घरात परावर्तित होणारा सूर्यप्रकाश सकारात्मक ऊर्जेने व्यापून टाकेल. घरात आनंदी वातावरण राहू शकेल. 2 / 7 हिरवा रंग हा उन्नती, उत्कर्षाचा निदर्शक आहे. तसेच उत्तम आरोग्याचे प्रतीक आहे. गॅलरी किंवा अंगणातील भिंतींना तसेच घरातील भिंतींना हिरवा रंग वापरयचा झाल्यास फिकट हिरवा, पोपटी आणि पिवळा अशी रंगसंगती आकर्षक ठरेल आणि घर प्रसन्न वाटेल. 3 / 7 लाल रंग हा शौर्याचे प्रतीक आहे. आपल्या घरात आणि आयुष्यात शौर्य, तेज, उत्साह आणि आनंद यांचा समावेश व्हावा असे वाटत असेल, तर घरातील किमान एक भिंत लाल रंगाची असावी. नवीन दाम्पत्याच्या खोलीतही लाल रंगाचा वापर करावा. कारण शौर्याप्रमाणेच लाल रंग प्रेमासाठीही ओळखला जातो. रंगाचे पडसाद आपल्या आयुष्यात पडतात. म्हणून लाल रंगाला महत्त्व दिले जाते. 4 / 7 वेलवेट फिनिशिंगचा जांभळा रंग अतिशय आकर्षक दिसतो. अशा रंगांचा वापर केल्यामुळे खोलीची भव्यता जाणवते. ती अधिक लांब आणि रुंद दिसते. हा रंग मन:शांती देणारा आहे. घरातील एखादी छोटीशी खोली जांभळ्या रंगाने रंगवून तिला तुम्ही ध्यानधारणेची खोली बनवू शकता. 5 / 7 श्रीमंत घरात फिकट रंगांचा अधिक वापर केला जातो. त्यातही पांढरा रंग अधिक खुलून दिसतो. पांढऱ्या रंगाच्या भिंतींना साजेसे पांढरे सुती किंवा जाळीदार पडदे घराची शान वाढवतात. पांढऱ्या रंगामुळे घरात उजेडाची कमतरता जाणवत नाही. फक्त पांढरे कपडे आपण जपतो, तितक्याच काळजीने पांढऱ्या भींती जपाव्या लागतात. अन्यथा त्यावर काळपट डाग पडू लागले, की रंगाची आणि घराची रया जाते. 6 / 7 गुलाबी रंग अतिशय सुखदायक आहे. मुलींचा आवडता रंग कोणता, असे विचारल्यावर बहुमान्य एकच उत्तर मिळेल, ते म्हणजे गुलाबी. या रंगाच्या कोणत्याही छटा घराला आकर्षक बनवतात. हा रंग आल्हाददायक आहे. त्यावर केलेली कोणतीही सजावट खुलून दिसते. विशेषत: लहान मुलांच्या खोलीला हा रंग वापरला जातो. 7 / 7 सकारात्मक आणि स्थिरता देणारा रंग म्हणून निळ्या रंगाचा घरासाठी वापर केला जातो. तुमच्या आवडीनुसार निळ्या रंगाची छटा तुम्ही निवडू शकता. परंतु आकाशी रंगाची छटा घराला जास्त मोहक बनवते. अनेक कॅफे किंवा हॉटेलमध्ये आकाशी रंगाचा वापर केला जातो. आणखी वाचा