शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Horoscope 2022 : आगामी वर्ष २०२२ 'या' सहा राशींना नोकरी व्यवसायात देईल गगन भरारीची संधी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 5:53 PM

1 / 7
नवीन वर्ष २०२२ लवकरच येणार आहे. अशा परिस्थितीत नवीन वर्ष आनंदाचे जावो, अशी प्रत्येकाची इच्छा असते. ज्योतिष शास्त्रानुसार नवीन वर्षात यश मिळवण्याच्या अनेक संधी येतील. त्यातही पुढील सहा राशींसाठी परिस्थिती विशेष अनुकूल राहील.
2 / 7
ज्योतिष शास्त्रानुसार २०२२ हे वर्ष तुमच्यासाठी भाग्यकारक ठरणार आहे. नवीन वर्षात जीवनात अनेक सकारात्मक बदल होतील. याशिवाय करिअरमध्ये प्रगती होईल. नवीन वर्ष संपत्ती आणि समृद्धी बाबतीतही फायदेशीर ठरणार आहे. व्यवसायात आर्थिक प्रगती आणि नोकरीच्या ठिकाणी कामाचे वर्चस्व राहील.
3 / 7
२०२२ हे वर्ष तूळ राशीच्या लोकांसाठी खूप आनंदाचे असेल. नवीन वर्षात वैयक्तिक जीवनात प्रेमळ लोकांचा सहवास मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. याशिवाय नवीन वर्षात मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. नवीन आणि चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
4 / 7
सिंह राशीच्या लोकांसाठी २०२२ हे वर्ष शुभ राहील. नवीन वर्षात नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नोकरीत लाभदायक संधी मिळतील. यासोबतच कुटुंबातील सदस्यांकडून आर्थिक लाभ मिळत राहतील. याशिवाय नवीन वर्षात नवनवीन लोकांची साथही मिळेल.
5 / 7
नवीन वर्ष २०२२ मध्ये आर्थिक लाभाच्या अनेक संधी असतील. तथापि, तुम्हाला स्वतःला नफ्याच्या संधींचा फायदा घ्यावा लागेल. नवीन वर्षात तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. याशिवाय नशिबाची पूर्ण साथ मिळेल.
6 / 7
मकर राशीच्या लोकांसाठी येणारे वर्ष २०२२ शुभ ठरणार आहे. नवीन वर्षात यशाचे नवे विक्रम प्रस्थापित कराल. त्यासोबतच नशिबाची पूर्ण साथ मिळेल. व्यवसाय आणि नोकरीत आर्थिक प्रगती होईल. तसेच कौटुंबिक जीवनात आनंदाचे राहील.
7 / 7
येणाऱ्या नवीन वर्षात आयुष्यात खूप प्रगती होईल. २०२१ वर्षाच्या तुलनेत नवीन वर्षात आर्थिक परिस्थिती अधिक चांगली असेल. कठोर परिश्रमाने नशीब उजळून निघेल. वैवाहिक प्रश्न देखील मार्गी लागतील.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषNew Yearनववर्ष