शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आठवड्याचे राशीभविष्य : २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२३; 'या' राशीच्या लोकांची आर्थिक प्रगती होणार, व्यापारासाठी उत्तम वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 10:17 AM

1 / 12
मेष - ह्या आठवड्यात आपणास नशिबाची साथ मिळेल. एखादे मोठे काम होण्याची संभावना आहे. आपण ईश्वरास शरण गेल्यामुळे आपणास मानसिक शांतता लाभेल. कामात यश प्राप्त होईल. नशीब बलवान होईल. नोकरीच्या ठिकाणी आपली स्थिती चांगली होईल. आपणास आपल्या प्रयत्नांचे सुखद परिणाम पाहावयास मिळतील. असे असले तरी अति आत्मविश्वासाने काम करू नये, अन्यथा त्रास होऊ शकतो. व्यापारात उत्तम यश संभवते. आपले परिश्रम आपणास पुढे घेऊन जातील. बाजारात आपणास चांगली प्रसिद्धी मिळेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनातील तणाव बहुतांशी दूर होतील. एकमेकांना समजून घेतल्याने आपल्यातील जवळीक वाढेल व जीवनाप्रती आपली जवाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण कराल. प्रणयी जीवनातील समस्या कमी होतील. गैरसमज दूर होऊन एकमेकांशी जवळीक वाढेल. विद्यार्थी अभ्यासात मग्न राहतील. ते खूप मेहनत करतील. त्यांच्या परिश्रमाचे यथोचित फळ त्यांना प्राप्त होऊन अभ्यासात चांगले परिणाम सुद्धा मिळतील.
2 / 12
वृषभ - आठवड्याची सुरवात आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. एखाद्या गोष्टीने आपण अत्यंत चिंतीत झाल्यामुळे आपली प्रकृती बिघडू शकते. तेव्हा सावध राहावे. आठवड्याचे मधले दिवस उत्तम आहेत. नोकरी करणाऱ्यांना आत्मसन्मानाने काम करण्यात यश प्राप्त होईल. असे असले तरी आपला अहंकार सोडून द्यावा, अन्यथा त्रास संभवतो. वरिष्ठांशी आपले संबंध बिघडू शकतात. तेव्हा सतर्क राहा. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे. व्यापाऱ्यांसाठी आठवडा उन्नतीदायक आहे. त्यांच्या व्यापाराची वृद्धी होऊन प्राप्तीत सुद्धा वाढ होईल. हा आठवडा आपली आर्थिक प्रगती करणारा आहे. घरात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जोडीदाराशी उत्तम समन्वय साधला जाईल. प्रणयी जीवनासाठी आठवडा प्रतिकूल आहे.
3 / 12
मिथुन - हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी काही नवीन सौदे घेऊन येण्याची संभावना आहे. आपणास लोकांशी संवाद साधण्याची संधी मळेल. आपण जर भागीदारीत व्यवसाय करत असाल तर आपण उत्तम स्थितीत याल व आपला व्यापार तीव्र गतीने प्रगती साधेल. व्यापारातील प्रगतीने आपण खुश व्हाल. जमीन - जुमल्याशी संबंधित बाबीत यशस्वी व्हाल. नोकरी करणाऱ्यांना आपल्या कामावर लक्ष द्यावे लागेल. आपल्या बेपर्वाईमुळे आपण अडचणीत येऊ शकता. नशिबाची साथ मिळाल्याने बरीचशी कामे सहजपणे होतील. प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे दिसेल. आठवड्याचा पहिला दिवस व अखेरचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांसाठी आठवडा सामान्यच आहे. त्यांनी फक्त आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. गरज भासल्यास अभ्यासासाठी ते मित्रांची मदत घेऊ शकतात.
4 / 12
कर्क - हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपण निव्वळ आपल्या मेहनतीनेच नव्हे तर आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने आपली कामे वेळेवर पूर्ण कराल. त्यामुळे आपल्यात उत्तम समन्वय साधला जाईल. ते आपल्या पाठीशी असल्याचे दिसून येईल. नोकरीत आपण मजबूत स्थितीत असाल. व्यापाऱ्यांना थोडे सावध राहावे लागेल. काही चुका आपल्यासाठी डोकेदुखी ठरू शकतात. तेव्हा सावध राहावे. ह्या आठवड्यात आपली प्राप्ती काहीशी कमी होईल. कौटुंबिक जीवनात काही समानता दिसून येईल. कुटुंबीयात समन्वयाचा काहीसा अभाव असल्याचे जाणवेल. त्यात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. वैवाहिक जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे. ह्या आठवड्यात आपण बाहेर फिरण्यास किंवा जोडीदारासह खरेदी करण्यास जाऊ शकाल. प्रणयी जीवनासाठी सुद्धा आठवडा अनुकूल आहे. आपण आपल्या प्रेमिकेसाठी काहीही करण्यास तयार राहाल.
5 / 12
सिंह - हा आठवडा आपणास अनुकूल आहे. मनात प्रेमाचे नवनवीन फुले उमलतील व त्यामुळे आपण आपले प्रणयी जीवन अधिक सुखावह करू शकाल. आपल्या मनातील भावना सर्जनात्मक पद्धतीने आपल्या प्रेमिके समोर व्यक्त करू शकाल. त्यामुळे तिच्या चेहेऱ्यावर सुद्धा आनंद पसरेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन काहीसे तणावग्रस्त असू शकते. असे असून सुद्धा आपण आपल्या स्वभावामुळे जोडीदारास खुश करू शकाल. त्यामुळे नात्यात सुधारणा होईल. असे झाल्याने आपला वेळ मजेत जाईल. आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी. जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. काही हलके फुलके पदार्थ खावेत, कि ज्यामुळे आपणास फायदा होऊ शकेल. व्यापारासाठी आठवडा अनुकूल असला तरी सरकारी कर वेळेवर भरावा. करचोरी करू नका. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. आपण आपल्या कामासाठी दुसऱ्या ठिकाणी बदली घेऊ शकता.
6 / 12
कन्या - हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपली प्रॉपर्टीची इच्छा पूर्ण होईल. दीर्घ कालावधी पासून जो सौदा करू इच्छित होता तो ह्या आठवड्यात पूर्णत्वास गेल्याने आपणास फायदा होऊ शकतो व त्यामुळे आपल्या हाती एखादी मोठी प्रॉपर्टी लागू शकते. प्रॉपर्टीशी संबंधित सौदा सुद्धा पूर्ण होऊ शकतो. कौटुंबिक जीवनात थोडी शांतता राहू शकते. खर्चात वाढ होईल. परंतु, खर्चां सहित एखादी मोठी गुंतवणूक करण्याची योजना सुद्धा केल्याने आगामी कालखंडात आपणास लाभ होईल. विरोधकांवर आपण मात कराल. नोकरीच्या ठिकाणी वातावरण आपणास अनुकूल राहील. त्याचा आपणास आनंद होईल. व्यापारातील स्थितीत हळूहळू सुधारणा होऊ लागेल. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात स्वतःच्या रागास बळी पडू शकतात. तेव्हा सावध राहावे. विनाकारण रागावू नका. प्रणयी जीवनासाठी आठवडा चांगला आहे. ह्या अनुकूलतेचा लाभ घ्यावा.
7 / 12
तूळ - हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपल्या खर्चात वाढ होईल. असे असून सुद्धा जास्त काळजी करण्याचे कारण नाही. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती आपणास अनुकूल राहील. आपला आत्मविश्वास उंचावेल. काही कारणाने लोक आपणास समजून घेऊ शकणार नाहीत. मात्र, मित्र आपल्या पाठीशी राहतील. व्यापारात यश प्राप्ती होईल. व्यापारात मित्रांच्या मदतीमुळे काही फायदा होऊ शकतो. विवाहितांना वैवाहिक जीवन सुखद असल्याची जाणीव होईल. ते जोडीदाराशी खास विषयावर बोलणी करतील, त्यामुळे त्यांचे नाते अधिक मधुर होईल. प्रणयी जीवनासाठी आठवडा मध्यम फलदायी आहे. प्रेमिकेशी विचारपूर्वक बोलावे लागेल.
8 / 12
वृश्चिक - हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. नोकरी करणाऱ्यांना चांगल्या कामगिरीसाठी प्रोत्साहित केले जाऊ शकते. त्यांच्या कामाची प्रशंसा होईल. त्यांचे विरोधक सुद्धा त्यांची प्रशंसा करू लागतील. त्यामुळे त्यांना एकीकडे आश्चर्य वाटेल, तर दुसरीकडे आनंद होईल. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. खर्च नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. कौटुंबिक जीवनात चढ - उतार येतील. एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीची प्रकृती बिघडू शकते. व्यापाऱ्यांना यश प्राप्त होईल. त्यांच्या कष्टांचे चीज होईल. त्यांच्यासाठी आठवडा अनुकूल आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रेमीजनांना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
9 / 12
धनु - हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपला स्वतःवर विश्वास असल्यास आपली सर्व कामे होऊ लागतील. थोडासा जरी आळस केलात तरी कामात अडचणी येऊ शकतात. इंजिनीयरिंगच्या विद्यार्थ्यांना खूपच चांगले परिणाम मिळतील. इतर विद्यार्थी सुद्धा खूप मेहनत करतील. नशिबाची साथ मिळाल्याने उच्च शिक्षणात चांगले परिणाम मिळतील. कामा निमित्त परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. व्यापाऱ्यांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळू शकते. आपल्या हाती काही संधी येतील. आपण जर त्या वेळेत पूर्ण केल्या तर यश प्राप्ती होईल. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात समाधानी असल्याचे दिसून येईल. आपल्या चेहेऱ्यावर जरी तणावाची खूण असली तरी वास्तविकतः आपण खुश असाल.
10 / 12
मकर - हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस शासनाशी संबंधित एखादी समस्या समोर येऊ शकते. आपण जर कर चोरी केली असेल किंवा कर भरला नसेल तर आपणास प्राप्तिकर खात्याकडून नोटीस येण्याची शक्यता आहे, व त्यामुळे मानसिक तणाव वाढेल. व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यापारात चांगला फायदा होऊ शकतो. त्यांच्या योजना फलद्रुप होतील. त्याचे त्यांना यथायोग्य परिणाम मिळतील. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे.आपले परिश्रम यशस्वी होतील. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात रोमांस व आकर्षण अनुभवतील. जोडीदाराशी जवळीक वाढेल. परंतु, आपल्यापैकी काहीजण विवाहबाह्य संबंधांकडे वळण्याची संभावना आहे. प्रणयी जीवनासाठी आठवडा खूपच चांगला आहे. आपण आपल्या प्रेमिकेस जर विवाहासाठी मागणी घातलीत तर ती त्यास नाकारू शकणार नाही.
11 / 12
कुंभ - हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. ह्या आठवड्यात आपणास आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कोणत्याही प्रकारच्या दुर्घटने पासून बचाव करण्याचा प्रयत्न करा. वाहन जपून चालवावे. आठवड्याचा सुरवातीचा व अखेरचा दिवस प्रवासास अनुकूल आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष दिल्यासच त्यांना यश प्राप्त होईल. अन्यथा त्रासासहित अभ्यासात सुद्धा अडथळे येऊ शकतात. विवाहित व्यक्ती आपले वैवाहिक जीवन सुखद करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येईल. त्यासाठी ते आपल्या जोडीदाराशी सुद्धा बोलणी करतील. प्रेमीजनांसाठी आठवडा अनुकूल आहे. ते आपल्या मनातील भावना प्रेमिके समोर व्यक्त करू शकतील. विवाह ठरण्याची सुद्धा संभावना आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चढ - उतारांचा आहे.
12 / 12
मीन - हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. मानसिक चिंता दूर सारून स्वतःवर विश्वास ठेवा. त्याच्यातच आपले भले असून कामात यशस्वी होता येईल. स्वतःवर विश्वास असणे सर्वात मोठी यशाची गुरुकिल्ली असते हे लक्षात ठेवावे. प्राप्तीत वाढ होईल. एखादा अवांछित प्रवास संभवतो, तो टाळण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा विनाकारण आपला ताण वाढेल. ह्या आठवड्यात आपली प्रकृती बिघडण्याची संभावना आहे. तेव्हा काळजी घ्यावी. नोकरी करणाऱ्यांना ह्या आठवड्यात आपल्या कामात कौशल्य दाखवावे लागेल. त्यामुळे आपली ओळख निर्माण होऊन वरिष्ठ सुद्धा प्रभावित होतील. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना थोडे सावध होऊन कामे करावी लागतील. त्यांच्या काही चुका त्यांचे नुकसान करू शकतात. महिला कर्मचाऱ्यांशी केलेली चांगली वर्तणूक यशदायी होऊ शकेल. आपण विरोधकांवर मात करू शकाल. प्रेमीजनांना ह्या आठवड्यात थोडे सावध राहावे लागेल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य