शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

घरसजावटीत 'या' चित्रांचा समावेश करणे वास्तूसाठी ठरेल लाभदायक!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 5:31 PM

1 / 6
निळ्या आकाशी रंगाचे चित्र किंवा फोटो फ्रेम उत्तर दिशेला लावावे. त्यातही निसर्ग चित्राचा वापर केल्यास उत्तम!
2 / 6
पूर्व दिशेला केशरी रंगाचे चित्र उठून दिसेल. तसेच हिरवळ किंवा रंगीबेरंगी फुलांचे चित्रही उठून दिसेल. पूर्व दिशा ही प्रसन्नतेची असल्याने अशी चित्रे अधिक परिणामकारक ठरतील.
3 / 6
बेडरुमध्ये लाल रंगाच्या फुलांची, लव्ह बर्ड्सची किंवा कृष्ण राधेच्या मिलनाची तसबीर आकर्षक ठरते. अशी तसबीर दाम्पत्य जीवनासाठी अनुकूल ठरते.
4 / 6
मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत किंवा अभ्यासाच्या टेबलाजवळ ध्यान केंद्रित करणारे ओंकाराचे चित्र लावा. अभ्यासातून कंटाळा आल्यास मुलांना विरंगुळा म्हणून त्यावर लक्ष केंद्रित करणे लाभदायक ठरेल.
5 / 6
स्वयंपाकघरात सुंदर निसर्गचित्र, धबधबा, सूर्योदय, नदी, पर्वतरांगा किंवा धुक्यात भिजलेला रस्ता असे निसर्गाशी संबंधित कोणतेही चित्र लावता येईल. ते चित्र गृहिणींना काम करताना डोळ्यांचा थकवा निश्चित दूर करेल आणि ऊर्जा देईल.
6 / 6
घरातील एक भिंत आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या फोटो फ्रेमसाठी अवश्य राखीव ठेवा. दर काही काळाने त्यातील फोटो बदलत राहा. ते फोटो सतत नजरेसमोर राहिल्याने कुटुंबीयांमध्ये चांगला एकोपा राहण्यास मदत होईल.
टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र