शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ५ राशींवर कृपा, चौफेर लाभ; पद-पैसा वाढेल, वैभव-समृद्धी काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2024 12:52 PM

1 / 9
ज्योतिषशास्त्रात नवग्रहांतील गुरु आणि शुक्र या दोन ग्रहांना अनेकार्थांनी विशेष महत्त्व आहे. गुरु हा ज्ञान, सुख व स्वराचा कारक आहे. तर शुक्र हा विवाह, सौंदर्य, प्रेमप्रकरण, शयनगृह, जलाशय, काव्य, नृत्य-गायन, तारुण्य, कला-कौशल्य, वाहन, कीर्ती, सुख यांचा कारक आहे. गुरु हा देवांचा गुरु तर शुक्र हा दैत्यांचा गुरु आहे. शुक्राचा रंगेलपणा गुरुता मानवत नाही तर गुरुची गंभीरवृत्ती शुक्राला आवडत नाही.
2 / 9
गुरु आणि शुक्र हे दोन्ही ग्रह एकमेकांचे शत्रू ग्रह मानले जातात. मात्र, आगामी काळात या दोन्ही ग्रहांच्या युतीने गजलक्ष्मी योग जुळून येणार आहे. हा योग राजयोगासमान अतिशय शुभ मानला गेला आहे. विद्यमान स्थितीत गुरु मंगळाचे स्वामित्व असलेल्या मेष राशीत विराजमान आहे. तर शुक्र मार्च महिन्यात दोनवेळा राशीपरिवर्तन करून अनुक्रमे कुंभ आणि मीन राशीत प्रवेश करणार आहे.
3 / 9
कुंभ राशीत शनीसोबत युती योग जुळून येणार असून, ३१ मार्च रोजी मीन राशीत राहु, सूर्य या ग्रहांशी युती होऊन त्रिग्रही योग जुळून येईल. मीन ही शुक्राची उच्च रास मानली जाते. या राशीत शुक्र सर्वोत्तम फले देतो, अशी मान्यता आहे. यानंतर २४ एप्रिल रोजी शुक्र मेष राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी गुरू आणि शुक्राची युती होणार आहे.
4 / 9
तर, ०१ मे रोजी गुरू शुक्राचे स्वामित्व असलेल्या वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. हे गुरु गोचर या वर्षातील सर्वाधिक विशेष मानले गेले आहे. तर १९ मे रोजी शुक्र स्वराशीत म्हणजेच वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. वृषभ राशीतील गुरू आणि शुक्राच्या युतीने गजलक्ष्मी राजयोग जुळून येत असल्याचे मानले जात आहे. या दोन्ही ग्रहांच्या गजलक्ष्मी राजयोग काही राशींना उत्तम फलदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...
5 / 9
मेष: गजलक्ष्मी राजयोगाने नशिबाची आणि भाग्याची उत्तम साथ लाभू शकेल. अनेक चांगल्या बातम्या मिळू शकतील. काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. त्याचा फायदा होऊ शकेल. तसेच जीवनात काही सकारात्मक बदल दिसून येऊ शकतील. जोडीदारासोबत नाते खूप चांगले राहील. पूर्ण सहकार्य मिळेल. मान-सन्मान वाढेल. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे.
6 / 9
कर्क: गजलक्ष्मी राजयोग लाभदायक ठरू शकेल. बँक बॅलन्स वाढू शकेल. उत्पन्नाचे नवे स्रोत मिळू शकतील. जोडीदाराशी असलेले नाते अधिक घट्ट होऊ शकेल. जीवनातील अनेक क्षेत्रात यश, प्रगती साध्य करता येऊ शकेल. आत्मविश्वास वाढू शकेल. एखादा नवीन व्यवसाय सुरू करू शकता. गुंतवणूक करू शकता. भविष्यात फायदा होईल. नवीन नोकरीची ऑफर येऊ शकेल. जोडीदारासोबत प्रेमसंबंध चांगले राहतील. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती करता येऊ शकेल.
7 / 9
सिंह: गजलक्ष्मी राजयोग यशकारक ठरू शकेल. कुटुंबात शांततेचे वातावरण राहील. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आर्थिक स्थितीही सुधारेल. उत्पन्न वाढीचे नवीन मार्ग मिळू शकतील. नफा होऊ शकेल. एखाद्या बड्या कंपनीकडून नोकरीची ऑफर येण्याची शक्यता आहे. तसेच वर्तमान नोकरीच्या ठिकाणी यश-प्रगती साध्य करता येऊ शकेल. पगारवाढ आणि पदोन्नतीची शक्यताही निर्माण होऊ शकेल.
8 / 9
तूळ: गजलक्ष्मी राजयोग प्रगतीकारक ठरू शकेल. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असलेल्यांना काही सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांची सलोख्याचे संबंध राहू शकतील. तसेच कौटुंबिक वातावरण आनंददायी असू शकेल. अनेक संधी मिळतील. जीवनात अनेक निर्णय घेणे सोपे जाईल. विवाहेच्छुकांसाठी नवीन स्थळे येऊ शकतील.
9 / 9
धनु: गजलक्ष्मी राजयोग खास लाभ देणारा ठरू शकेल. बिझनेसमधील एखादी डील फायदेशीर ठरू शकेल. आत्मविश्वास वाढू शकेल. आव्हानांचा सक्षमपणे सामना करू शकाल. व्यापारात लाभ होऊ शकेल. काही समस्या, अडचणी असतील, तर त्या दूर होऊ शकतील. एखादा निर्णय लाभदायक ठरू शकतो. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य