शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१२ वर्षांनी गुरु-शुक्र युती: ४ राशींना यश काळ, प्रगतीची संधी; धनलाभ, शत्रू ग्रह शुभ करतील

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 11:24 AM

1 / 9
नवग्रहांचा गुरू मानला गेलेला बृहस्पति म्हणजेच गुरु ग्रह मेष राशीत विराजमान आहे. मेष राशीत वक्री चलनाने मार्गक्रमण करत असलेला गुरू ३१ डिसेंबर रोजी मार्गी झाला. गुरूचे मार्गी होणे शुभ मानले गेले आहे. यातच आता गुरू आणि शुक्राचा युती योग मेष राशीत जुळून येणार आहे.
2 / 9
१२ वर्षांनी गुरू आणि शुक्राचा युती योग मेष राशीत जुळून येणार असल्याचे सांगितले जात आहे. गुरू आणि शुक्र हे दोन शत्रू ग्रह मानले गेले असून, मेष राशीत हे दोन्ही ग्रह असणे महत्त्वाचे मानले गेले आहे. दोन्ही ग्रहांची शुभ दृष्टी काही राशींवर पडू शकते, असे म्हटले जात आहे.
3 / 9
सन २०२४ च्या मे महिन्यात गुरू वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. गुरूचे हे राशीपरिवर्तन महत्त्वाचे मानले जाते. कारण एका राशीत गुरू सुमारे वर्षभर विराजमान असतो. मेष राशीनंतर वृषभ राशीतही गुरू आणि शुक्राचा युती योग पाहायला मिळू शकेल.
4 / 9
तत्पूर्वी गुरू आणि शुक्राचा २४ एप्रिल रोजी मेष राशीत युती योग जुळून येत आहे. त्यापुढील काळ काही राशींना अत्यंत फायदेशीर, लाभदायक तसेच जीवनातील विविध आघाड्यांवर उन्नतीदायक ठरू शकेल असे सांगितले जात आहे. कोणत्या आहेत त्या लकी ४ राशी? जाणून घेऊया...
5 / 9
शुक्र आणि गुरुचा युती योग मेष राशीतच होणार आहे. अशा परिस्थितीत मेष राशीच्या व्यक्तींना हा युती योग लाभाचा ठरू शकेल. भेटवस्तू मिळू शकतील. यशामुळे जीवनातील प्रत्येक पैलू सुशोभित होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि आर्थिक लाभही मिळेल. व्यावसायिकांसाठी हा काळ खूप चांगला असणार आहे. व्यवसाय पूर्वीपेक्षा खूप चांगला होणार आहे. व्यवसायात भरभराट होईल. करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून मान्यता आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याची शक्यता अपेक्षित आहे.
6 / 9
मिथुन राशीच्या व्यक्तींना गुरु-शुक्राचा युती योग अनुकूल परिणाम देणारा ठरू शकेल. आर्थिक स्थितीही पूर्वीपेक्षा मजबूत होईल. आर्थिक स्थैर्य लाभू शकेल. करिअरच्या शक्यता उज्ज्वल दिसत आहेत. प्रदीर्घ प्रलंबित प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकतील. उच्च अधिकाऱ्यांकडून प्रशंसा होईल. प्रेम जीवन पूर्वीपेक्षा चांगले होईल. जोडीदारासोबत संबंध खूप चांगले राहतील.
7 / 9
कर्क राशीच्या व्यक्तींना यशाचे मार्ग खुले होतील. एकामागून एक अनेक यश मिळतील. विविध क्षेत्रात चांगल्या संधी मिळतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढलेली दिसेल. समाजात वेगळी छाप दिसेल. कामाच्या ठिकाणी पूर्ण सहकार्य मिळेल. काही चांगली बातमी मिळू शकते. जवळच्या मित्राकडून प्रत्येक कामात पूर्ण सहकार्य मिळेल.
8 / 9
तूळ राशीच्या व्यक्तींना गुरू आणि शुक्राचा युती योग लाभदायक ठरू शकेल. शिक्षण, करिअर, पैसा, व्यवसाय आणि वैवाहिक जीवनासाठी आनंददायी ठरेल. या काळात पती-पत्नीमध्ये प्रेम वाढेल. नवीन नोकरीच्या शोधात असतील तर त्यांना या काळात नवीन नोकरी मिळू शकते. नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही बाबतीत हा काळ फायदेशीर असेल.
9 / 9
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य