शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

३१ डिसेंबरपर्यंत गुरु वक्री: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? ‘या’ राशींना गुरुबळ, लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2023 7:07 AM

1 / 15
नवग्रहांचा गुरु बृहस्पति म्हणजेच गुरु ग्रह आताच्या घडीला मेष राशीत विराजमान आहे. ०४ सप्टेंबर २०२३ रोजी गुरु याच मेष राशीत वक्री होत आहे. ३१ डिसेंबर २०२३ रोजी गुरु मेष राशीत मार्गी होणार आहे. गुरु ग्रहाचे कुंडलीतील स्थान अतिशय महत्त्वाचे मानले जाते.
2 / 15
गुरुबळ आणि गुरुकृपा लाभल्यास धन-संपत्ती, मान-सन्मान यात वाढ होऊ शकते, असे म्हटले जाते. गुरु ग्रह धनु आणि मीन राशीचा स्वामी असून, आताच्या घडीला मेष राशीत गुरु ग्रहासह छाया आणि क्रूर मानला गेलेला राहु ग्रह विराजमान आहे. बुद्धिमत्ता, धर्म, प्रगती, शिक्षण, संतती, ज्ञान, समृद्धी यांचा गुरु ग्रह कारक मानला जातो. जर कुंडलीत गुरुची स्थिती मजबूत असेल तर आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
3 / 15
कुंडलीत गुरूची स्थिती कमकुवत असेल तर व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीमध्ये गुरूच्या वक्री चलनाचा प्रभाव सर्व राशींसह देश-दुनिया, अर्थव्यवस्था यांवर पडताना पाहायला मिळू शकतो. मेष ते मीन या राशींवर गुरु ग्रहाच्या वक्री चलनाचा कसा प्रभाव पडू शकतो? जाणून घेऊया...
4 / 15
मेष: समस्यांतून दिलासा मिळू शकतो. स्वतःच्या निर्णयावरील आत्मविश्वास वाढू शकेल. ज्यामुळे चांगले फायदे मिळतील. वडिलांशी सुरू असलेला वाद, मतभेद बहुतांशरित्या कमी होऊ शकतील. अनेक कामे या काळात पूर्ण होतील. अनावश्यक खर्चांमुळे त्रास होऊ शकतात. धार्मिक कार्यात व्यस्त राहाल आणि मानसिक शांतता मिळू शकेल.
5 / 15
वृषभ: जबाबदाऱ्या वाढतील, त्या चांगल्या प्रकारे पार पाडू शकाल. भावंडांसोबत तीर्थस्थळी जाण्याचा बेत आखाल. विद्यार्थ्यांना या काळात गुरूंच्या मदतीने शैक्षणिक क्षेत्रातील अडथळे दूर होतील. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते. वैवाहिक जीवनात चढ-उतार येतील, पण नात्यात प्रेम कायम राहील. खर्च आणि खर्च नियंत्रणाबाबत विचार करून काही योजना आखणे उपयुक्त ठरू शकेल.
6 / 15
मिथुन: परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या इच्छा पूर्ण होतील. खाण्यापिण्याबाबत काळजी घ्या, अन्यथा समस्या वाढू शकतात. या काळात केलेल्या गुंतवणुकीचा आणि भौतिक इच्छांचा काळजीपूर्वक विचार करा. सामाजिक वर्तुळ या काळात वाढेल, कोण शत्रू आणि कोण मित्र, हे नेमके ओखळावे लागेल. कौटुंबिक जीवनात झालेल्या चुकांवर विचार करून सुधारण्यासाठी प्रयत्न करावा.
7 / 15
कर्क: भागीदारीत काम करणाऱ्यांनी व्यवसायात काही गोष्टींची काळजी घेणे हिताचे ठरू शकेल. गुंतवणूक किंवा नफ्याबाबत भागीदारांशी मतभेद वाढू शकतात. ज्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. नोकरदारांचा प्रभाव या काळात वाढू शकतो. अधिकार्‍यांचे सहकार्यही मिळेल. वैवाहिक जीवनात झालेल्या चुकांकडे लक्ष द्या. त्या सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. ज्ञान मिळवण्यावर भर राहील. गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होऊ शकतील.
8 / 15
सिंह: वडिलांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे परंतु परिस्थिती लवकरच निवळेल. इच्छा पूर्ण होऊ शकते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात सुरू असलेल्या समस्यांपासून दिलासा मिळेल. चांगली बातमी मिळू शकेल. गुरूच्या प्रभावाने शांतता लाभू शकेल.
9 / 15
कन्या: नोकरदारांचे वरिष्ठांशी काही मुद्द्यावर वाद होऊ शकतात. रागावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवा. अन्यथा अडचणींना सामोरे जावे लागू शकते. वैवाहिक जीवनात काही अडचण असेल तर या काळात घरातील वडीलधाऱ्यांच्या मदतीने तो अडथळा दूर होईल. मन प्रसन्न राहील. भावंडांचे सहकार्य लाभेल. अनेक कामे पूर्ण होतील.
10 / 15
तूळ: लव्ह लाइफबाबत फार गंभीर आणि बेजबाबदार न राहिल्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. विद्यार्थ्यांना या काळात काहीतरी नवीन शिकायला मिळेल. अभ्यासात रस निर्माण होईल. सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या लोकांसाठी गुरुचे वक्री चलन शुभ आणि फलदायी सिद्ध होऊ शकेल. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. आर्थिक स्थिती मजबूत असेल.
11 / 15
वृश्चिक: वैवाहिक जीवन चांगले राहील. या काळात जोडीदाराचे सहकार्य मिळेल. अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकेल. या काळात प्रेम जीवनात असलेल्यांना लग्न करायचे असेल तर त्यांनी एकदा त्यांच्या निर्णयांचा विचार करावा. तब्येतीची पूर्ण काळजी घ्या. घरातील कामांची जबाबदारी घ्या. सासरच्यांशी संबंध दृढ राहतील आणि मदतही करू शकतील.
12 / 15
धनु: कुठेही मोठी गुंतवणूक करणे टाळावे, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. या काळात गुंतवणूक करायची असेल तर तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. घर घेण्याचा किंवा बांधण्याचा विचार करत असाल तर एकदा बजेटकडे लक्ष द्या. नोकरदारांचा आत्मविश्वास या काळात वाढेल. कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करतील. अधिकाऱ्यांचे सहकार्यही मिळेल. संपूर्ण कुटुंबासह बाहेर फिरायला जाण्याचे बेत आखू शकाल.
13 / 15
मकर: जोडीदारासोबत काही मुद्द्यावरून मतभेद होऊ शकतात. या काळात आपल्या कामावर विशेष लक्ष द्यावे. विद्यार्थांसाठी गुरुचे वक्री चलन शुभ राहील. त्यांना परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्यात यश मिळेल.
14 / 15
कुंभ: आरोग्याच्या बाबतीत गाफील राहू नका. आरोग्याची पूर्ण काळजी घ्या. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी काळजीपूर्वक विचार करून निर्णय घ्यावा. मन धर्म आणि उपासनेच्या कार्यात गुंतले जाईल. प्रार्थना केल्याने मानसिक शांतीही मिळेल. व्यवसायात या काळात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या काळात कुटुंबासोबत वेळ घालवल्याने तुम्हाला आराम मिळेल. पुढे जाण्याचा आत्मविश्वास मिळेल.
15 / 15
मीन: बचतीवर पूर्ण लक्ष द्या. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात जबाबदाऱ्या समजून घेण्याचा प्रयत्न करा. तरच यश मिळेल. भावंडांसोबत काही बाबींवर मतभेद वाढू शकतात. वाटाघाटीने प्रकरण मिटवा. अन्यथा नात्यात तीव्र दुरावा येऊ शकतो. जी कामे पैशांमुळे अडकली होती ती या काळात पूर्ण होऊ शकतील. मन प्रसन्न राहील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य