शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Jupiter Retrograde in Capricorn 2021: गुरु मकर राशीत वक्री: ‘या’ ४ राशींच्या व्यक्तींसाठी उन्नतीकारक आणि लाभदायक काळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2021 1:18 PM

1 / 9
ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रह नियमित कालावधीनंतर मार्गी किंवा वक्री चलनाने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात. त्यानुसार, गुरु ग्रह वक्री चलनाने कुंभ राशीतून मकर राशीत विराजमान होणार आहे.
2 / 9
गुरु ग्रह ज्ञान, वैराग्य आणि शुभता यांचा कारक मानला जातो. आताच्या घडीला शनि ग्रह मकर राशीत विराजमान आहे. गुरु ग्रह १४ सप्टेंबर रोजी मकर राशीत वक्री चलनाने प्रवेश करेल. २० नोव्हेंबर पर्यंत गुरु मकर राशीत राहील.
3 / 9
या कालावधीत काही राशीच्या व्यक्तींना काळजी घ्यावी लागेल, तर काही राशीच्या व्यक्तींसाठी गुरुचे हे वक्री चलन उन्नतीकारक आणि लाभदायक ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. नेमक्या कोणत्या चार राशीच्या व्यक्तींना गुरु वक्री होण्याचा कालावधी उत्तम ठरू शकेल? जाणून घेऊया...
4 / 9
गुरु वक्री चलनाने मकर राशीत प्रवेश करत असल्याचा सकारात्मक परिणाम कर्क राशीच्या व्यक्तींवर होऊ शकेल, असे सांगितले जात आहे. दाम्पत्य जीवनातील ताण-तणाव दूर होऊ शकतील. व्यवसाय, व्यापार करणाऱ्यांना नवीन धोरणे, योजना आखण्यासाठी हा कालावधी चांगला ठरेल. प्रलंबित येणी, अडकलेले पैसे प्राप्त होऊ शकतात. मात्र, सामाजिक जीवनात सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.
5 / 9
गुरु वक्री चलनाने मकर राशीत प्रवेश करत असल्याचा कालावधी कन्या राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ यशकारक ठरू शकेल. परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अनुकूल कालावधी ठरू शकेल. दाम्पत्य जीवनात काहीशा कुरबुरी होऊ शकतील. मुलांकडे लक्ष देणे आवश्यक ठरेल, असे सांगितले जात आहे.
6 / 9
गुरुचा वक्री चलनाने मकर राशीत होत असलेला प्रवेश वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. व्यवसाय, व्यापार करणाऱ्यांसाठी हा कालावधी नफा देणारा ठरू शकेल. नवीन कार्य सुरू करण्याचा विचार असेल, तर तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घेणे हिताचे ठरेल. भावंडांशी असलेले नाते सुधारेल, असे सांगितले जात आहे.
7 / 9
गुरुचा वक्री चलनाने मकर राशीत होत असलेला प्रवेश कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. परदेशी कंपन्यांसोबत काम करणारे किंवा परदेशात व्यवसाय, व्यापार करणाऱ्यांना हा कालावधी प्रगतीकारक ठरू शकेल. आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींनाही शुभकारक हा काळ ठरू शकेल. मात्र, कोणतीही गोष्ट घाईने करू नये. अन्यथा नुकसान होऊ शकते, असे सांगितले जात आहे.
8 / 9
गुरु ग्रह सोने धातूशी संबंधित असल्याचे मानले जाते, त्यामुळे गुरुचे वक्री चलन सोन्याच्या किमतीवर परिणामकारक ठरून यामध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळू शकतात, असे सांगितले जात आहे. याशिवाय विवेकशीलता, पारदर्शकता आणि मोठे निर्णय घेण्यासाठी सहाय्यकारक मानला जात असल्यामुळे राजकीय वर्तुळातील व्यक्तींसाठी गुरुचा वक्री चलनाचा कालावधी महत्त्वाचा मानला जात आहे.
9 / 9
याशिवाय काही क्षेत्रांमध्ये अव्यवस्थेची स्थिती पाहायला मिळू शकते. धनु आणि मीन राशीचा स्वामी गुरु असून, या वक्री चलनाच्या कालावधीत या दोन्ही राशीच्या व्यक्तींनी संयम आणि सतर्कता बाळगून कार्यरत राहावे. या कालावधीत श्रीविष्णूंचे नामस्मरण, पूजन करणे लाभदायक ठरू शकते, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य