शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गुरु गोचर: ४ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ, गुरुबळ वाढेल; पैसाच पैसा अन् लाभच लाभ, शुभ होईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 7:07 AM

1 / 9
सन २०२४ हे वर्ष अनेकार्थाने ज्योतिषशास्त्रानुसार विशेष ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. मेष राशीत असलेला गुरु ३१ डिसेंबर २०२३ रोजी मार्गी झाला होता. यानंतर ०१ मे २०२४ रोजी गुरु वृषभ राशीत प्रवेश करणार आहे.
2 / 9
वृषभ राशीत प्रवेश केल्यानंतर ०६ मे २०२४ रोजी गुरु अस्त होणार आहे. तर, १२ जून २०२४ रोजी गुरु ग्रह रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. ०९ ऑक्टोबर २०२४ रोजी गुरु वक्री होणार आहे. गुरुचे वक्री चलन २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे.
3 / 9
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, २०२४ मध्ये गुरु ग्रह राशीपरिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करणार आहे. याचा देश-दुनियेसह मेष ते मीन पर्यंतच्या सर्व १२ राशींवर परिणाम होईल. मात्र, ४ राशींना गुरु गोचराचा सर्वोत्तम फायदा मिळू शकेल. हा आगामी काळ या राशींसाठी सुवर्णकाळाप्रमाणे ठरू शकतो, असे म्हटले जात आहे. तसेच करिअर, आर्थिक आघाडी, शिक्षण यांमध्ये चांगली फळे मिळू शकतात, असे सांगितले जात आहे.
4 / 9
मेष राशीच्या व्यक्तींना आगामी काळ अनुकूल ठरू शकेल. नशिबाची उत्तम साथ लाभू शकेल. आर्थिक लाभ होईल. अनपेक्षित आर्थिक लाभही मिळतील. गुंतवणुकीचाही फायदा होईल, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होईल. पैशाची बचत करण्यात यशस्वी व्हाल. ज्या कामांमध्ये अडथळे येत होते, त्या कामात यश मिळेल. मान-सन्मान वाढेल. वडिलोपार्जित संपत्तीचा फायदा होईल. काही चांगली बातमी मिळू शकते.
5 / 9
कर्क राशीच्या व्यक्तींना आगामी काळ भाग्योदयकारक ठरू शकेल. उत्पन्न वाढेल. नवीन स्त्रोत तयार होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना प्रगतीच्या चांगल्या संधी मिळतील. नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यावसायिकांच्या सर्व व्यावसायिक योजना यशस्वी होतील. प्रतिष्ठा वाढेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात ज्या अडचणी येत आहेत त्या गुरु प्रभावामुळे दूर होतील. व्यावसायिकांना त्यांच्या इच्छेनुसार यश मिळेल. करिअर आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.
6 / 9
सिंह राशीच्या व्यक्तींना विशेष शुभ परिणाम मिळू शकतात. नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी आगामी काळ फायदेशीर ठरू शकेल. नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. विरोधक नुकसान करण्यात अयशस्वी ठरतील. संशोधनाशी संबंधित असलेल्या या राशीच्या लोकांसाठी हे वर्ष खूप चांगले असणार आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि उमेदवारांना यश मिळू शकते. गुरूच्या प्रभावामुळे वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळेल. अचानक आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत.
7 / 9
कन्या राशीच्या व्यक्तींना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. सर्व इच्छा पूर्ण होतील. बिघडलेले काम पूर्ण होण्यास सुरुवात होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. जमीन आणि वाहन खरेदी करायचे असेल तर इच्छा पूर्ण होईल. कामात आणि योजनांमध्ये यश मिळेल. भाग्य चांगले राहील. परदेशी सहलीला जाण्याची शक्यता आहे. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतात.
8 / 9
०१ मे २०२४ रोजी गुरुने वृषभ राशीत प्रवेश केल्यानंतर नवग्रहांचा राजा सूर्य १४ मे २०२४ रोजी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. तर, शुक्र ग्रह १९ मे २०२४ रोजी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ग्रह ३१ मे २०२४ रोजी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे.
9 / 9
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य