शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

५ महिने शुभ! गुरुचा भरणी नक्षत्रात प्रवेश: ५ राशींना गुरुकृपा, अपार लाभ; उत्तम संधींचा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 7:27 AM

1 / 9
नवग्रहांचा गुरु बृहस्पति म्हणजेच गुरु ग्रह आताच्या घडीला मेष राशीत विराजमान आहे. सर्व राशींसह नवग्रह वेळोवेळी नक्षत्रात प्रवेश करत असतात. गुरु ग्रहाने भरणी नक्षत्रात प्रवेश केला आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत गुरु भरणी नक्षत्रात असेल.
2 / 9
ज्योतिषशास्त्रानुसार, व्यक्तीच्या जीवनावर ग्रहांचा विशेष प्रभाव पडतो. कोणता ग्रह कोणता फळ देईल, हे नक्षत्रावर अवलंबून असते. गुरु ग्रह भरणी नक्षत्रात विराजमान होत आहे. नक्षत्रांची संख्या २७ आहे. भरणी नक्षत्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.
3 / 9
गुरु ग्रहाच्या भरणी प्रवेशाचा काही राशीच्या व्यक्तींना अपार लाभ, धनलाभाचे योग, करिअर-नोकरीत यश-प्रगती, उत्तम संधी प्राप्त होऊ शकतात. कोणत्या आहेत त्या ५ लकी राशी? कोणत्या राशींना भरपूर लाभ मिळू शकतील, ते जाणून घेऊया...
4 / 9
मेष राशीत गुरु विराजमान आहे. गुरुचा भरणी नक्षत्रातील प्रवेश या राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकेल. यश मिळेल. करियर वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना या दिशेने यश मिळेल. व्यावसायिकांनाही त्यांच्या कामाच्या संदर्भात शुभ परिणाम मिळू शकतील. भरपूर पैसे मिळू शकतात. लव्ह लाईफही खूप छान असू शकेल.
5 / 9
सिंह राशीच्या व्यक्तींना गुरुचा भरणी नक्षत्रातील प्रवेश अनुकूल ठरू शकेल. करिअरमध्ये नशिबाची पूर्ण साथ मिळेल. जे सरकारी नोकरीत आहेत त्यांना भरपूर पैसे मिळू शकतील.
6 / 9
तूळ राशीच्या व्यक्तींना गुरुचा भरणी नक्षत्रातील प्रवेश सकारात्मक ठरू शकेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होऊ शकेल. चांगल्या संधी मिळू शकेल. नोकरदारांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. कामाचा आणि कंपनीचा विस्तार करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल.
7 / 9
धनु राशीच्या व्यक्तींना गुरुचा भरणी नक्षत्रातील प्रवेश महत्त्वाचा ठरू शकेल. अनेक शुभ परिणाम मिळतील. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढू शकेल. नवीन बिझनेस सुरु करायचा असेल तर अनेक चांगल्या संधी मिळतील. नवीन योजनांवर काम सुरू करण्यासाठी हा कालावधी चांगला राहू शकेल.
8 / 9
मकर राशीच्या व्यक्तींना गुरुचा भरणी नक्षत्रातील प्रवेश नोकरीच्या ठिकाणी मान-प्रतिष्ठा मिळेल. जे शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत आहेत त्यांना शुभ परिणाम मिळतील. सरकारी नोकरी करणाऱ्यांनाही लाभाच्या अनेक संधी मिळतील, सोबत प्रमोशन मिळू शकेल. कामाने प्रभावित करू शकाल.
9 / 9
गुरुचा भरणी नक्षत्रातील प्रवेश अनेकार्थाने महत्त्वाचा मानला जात आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य