शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कर्क संक्रांती, २ राजयोग: ६ राशींना दुप्पट लाभ, सुखाचा काळ; नोकरीत पगारवाढ, ३ ग्रह शुभ करतील

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 11:36 AM

1 / 10
नवग्रहांचा राजा सूर्य १६ जुलै रोजी चंद्राचे स्वामित्व असलेल्या कर्क राशीत प्रवेश करत आहे. सूर्याच्या संक्रमणाचा हा काळ कर्क संक्रांती म्हणून ओळखला जाणार आहे. विद्यमान घडीला शुक्र आणि बुध कर्क राशीत विराजमान आहेत.
2 / 10
सूर्याच्या कर्क प्रवेशानंतर शुक्र आणि बुध यासंह त्रिग्रही योग जुळून येत आहे. तसेच बुधादित्य आणि शुक्रादित्य हे दोन राजयोग जुळून येत आहेत. हे दोन राजयोग उत्तम लाभदायक मानले गेले आहेत. या राजयोगाचा काही राशींना शुभ लाभ मिळू शकेल, असे सांगितले जात आहे.
3 / 10
शुक्र आणि सूर्य यांच्या संयोगाने शुक्रादित्य, तर बुध आणि सूर्य यांच्या संयोगाने बुधादित्य राजयोग जुळून येत आहे. या काळात काही राशींना आर्थिक आघाडी, करिअर, नोकरी, व्यापार, व्यवसाय या आघाड्यांवर यश, प्रगतीची संधी प्राप्त होऊ शकते, असे म्हटले जात आहे. जाणून घेऊया...
4 / 10
मेष: विशेष लाभ मिळू शकतो. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. आयुष्याला एका नव्या टप्प्यावर नेऊ शकतो. करिअरमध्ये नशिबाची पूर्ण साथ मिळू शकेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेले लोक यश मिळवू शकतात. कामाचे कौतुक होईल. वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. व्यवसायात यश मिळेल. रखडलेला प्रकल्प किंवा करार मिळू शकतो. भरपूर नफा मिळणार आहे. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून पैसे कमवाल. जीवनात समाधानी राहू शकता. जोडीदाराशी सुसंवाद राखण्यात यशस्वी होऊ शकता.
5 / 10
मिथुन: समाजात मान-सन्मान वाढू शकेल. भौतिक सुखाची प्राप्ती होईल. नोकरदारांना भविष्याचे नियोजन करण्यात यश मिळेल. कामाचे कौतुक होईल. प्रमोशनसोबत काही मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. व्यवसायात भरपूर फायदा होणार आहे. आर्थिक स्थिती चांगली राहण्याची शक्यता आहे. आउटसोर्सिंगद्वारे पैसे कमवू शकतात. जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. रोमँटिक डेटवर जाऊ शकता.
6 / 10
कर्क: आत्मविश्वास वाढलेला दिसेल. नशिबाची साथ मिळू शकेल. समाजातील मोठ्या आणि प्रभावशाली व्यक्तींना भेटाल, ज्यांचा भविष्यात फायदा होऊ शकतो. बुद्धिमत्ता विकसित होईल. ध्येयांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित कराल. पैसे कमावण्याच्या अनेक उत्तम संधी मिळतील. पैसे वाचवता येऊ शकतील.
7 / 10
सिंह: आगामी काळ आनंद आणणार ठरू शकेल. कामानिमित्त खूप प्रवास करावा लागू शकतो. यश मिळवू शकता. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. परदेशातून चांगले पैसे कमवू शकता. जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल.
8 / 10
कन्या: उत्पन्न, सन्मान वाढू शकेल. नोकरी आणि व्यवसायात सकारात्मक परिणाम दिसून येतील. कामे सहज पूर्ण होण्याची शक्यता आहे. मन प्रसन्न व समाधानी राहील. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होऊ शकेल. जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल कराल. गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकेल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.
9 / 10
तूळ: जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात शुभ परिणाम मिळू शकतील. अपूर्ण काम पूर्ण होतील. कामात आणि व्यवसायात यश मिळू शकेल. उत्पन्नात मोठी वाढ होईल. बँक बॅलन्समध्ये चांगली वाढ होईल. व्यावसायिक म्हणून यश मिळवाल. कुटुंबातील सदस्यांशी संबंध चांगले राहतील. मुलांची प्रगती पाहून तुम्हाला आनंद होईल.
10 / 10
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य