kartik purnima november 2024 know about these 6 zodiac signs get benefits fulfill desire and profit
कार्तिकी पौर्णिमेला ४ शुभ योग: ६ राशींना इच्छापूर्तीचा काळ, धनलाभ संधी; उत्पन्नात वाढ, नफा! By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 2:40 PM1 / 9कार्तिक महिना अनेकार्थाने शुभ मानला जातो. कार्तिकी एकादशीला चातुर्मास समाप्ती झाल्यानंतर तुलसी विवाहारंभ होतो. कार्तिकी पौर्णिमेला तुलसी विवाह समाप्ती होते. कार्तिक पौर्णिमेलाच त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हटले जाते. भारतीय संस्कृती, परंपरा यांमध्ये त्रिपुरारी पौर्णिमेला अनन्य साधारण महत्त्व असल्याचे म्हटले जाते. 2 / 9ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी अनेकविध योग जुळून येत आहेत. मंगळ आणि चंद्र यांचा परिवर्तन योग, धन योग जुळून येत आहे. तसेच चंद्र आणि गुरु यांचा सुनफा जुळून येत आहे. शनी स्वराशीत विराजमान असल्यामुळे शश नामक राजयोग जुळून येत आहे. हे सर्व योग शुभ परिणाम कारक असल्याचे म्हटले जाते.3 / 9त्रिपुरारी पौर्णिमेला जुळून येणाऱ्या शुभ योगांमुळे काही राशींना उत्तम लाभ, नफा, संधी, यश, प्रगती प्राप्त होऊ शकते, असे सांगितले जाते. कोणत्या आहेत त्या लकी राशी? जाणून घेऊया...4 / 9मेष: सकारात्मक बदल दिसून येतील. स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. समस्यांपासून दिलासा मिळू शकतो. धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात काही शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. 5 / 9वृषभ: वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सुरू असलेल्या तणावातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. विद्यार्थी सरकारी नोकरीची तयारी करत आहेत, त्यांना सकारात्मक बातमी मिळू शकेल. कुटुंबीय आनंदी दिसतील. नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो चांगला नफा देऊ शकेल. नाती अधिक घट्ट होतील.6 / 9सिंह: अनेक सकारात्मक बदल दिसून येऊ शकतील. व्यवसायाशी संबंधित लोकांना नफा मिळू शकेल. नवीन व्यवसायात त्यांचे स्थान सुरक्षित करू शकतील. नवीन वर्षांत शुभ योगाचा प्रभाव राहील. कुटुंबातील सदस्यांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यात सक्षम होऊ शकाल.7 / 9कन्या: पैसे कमवण्याचे नवीन मार्ग सापडू शकतील. घर आणि वाहन खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकेल. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळू शकेल. उत्पन्नात वाढ होऊ शकते. गुंतवणूक करायची असेल, तर हा कालावधी शुभ असू शकेल. भविष्यात चांगला परतावा मिळू शकेल. 8 / 9तूळ: कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आयुष्यात आनंददायी घटना घडू शकतात. नवीन सुरुवात करून करिअरमध्ये यशस्वी होऊ शकता. संपत्तीत वाढ होऊ शकते. देवी लक्ष्मी आणि श्रीविष्णू यांची कृपा होऊ शकेल. 9 / 9मीन: कार्तिक पौर्णिमेला काहीतरी नवीन घडू शकेल. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक चणचणीतून दिलासा मिळू शकतो. संपत्ती वाढू शकेल. करिअरमध्ये यशाच्या नवीन संधी मिळतील. नोकरदारांसाठी काळ चांगला राहील. व्यापाऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications