Ketu Gochar 2023: Transit of Ketu will affect five signs; Neglecting minor details can be costly!
Ketu Gochar 2023: केतूच्या संक्रमणाचा पाच राशींना होणार त्रास; किरकोळ बाबींकडे दुर्लक्ष करणे पडू शकते महाग! By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 5:32 PM1 / 5केतूचे हे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांच्या प्रेम जीवनावर खूप प्रभाव टाकू शकते. या दरम्यान तुमच्या प्रेम जीवनात अनेक समस्या निर्माण होणार आहेत. तसेच, विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे देखील कठीण होऊ शकते. यासोबतच तुम्हाला मुलांबाबत अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. या काळात मुलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तब्येतीची काळजी घ्या. 2 / 5कर्क राशीच्या लोकांसाठी या काळात केतू चतुर्थ भावात स्थित आहे. या काळात तुमच्या आईला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. या काळात तुमचे कौटुंबिक जीवनही खूप तणावात राहू शकते. घरातील वातावरण असे असेल की तुम्हाला खूप तणाव जाणवेल. मात्र, हळूहळू परिस्थिती अनुकूल होईल. तोवर संयम बाळगा. 3 / 5केतूच्या या संक्रमणाचा कन्या राशीच्या लोकांच्या वाणीवर परिणाम होईल. या काळात तुमचे बोलणे थोडे धारदार होऊ शकते. ज्यामुळे लोक तुमच्या हेतूचा गैरसमज करू शकतात. या दरम्यान केतू तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून दूर ठेवू शकतो किंवा नातेसंबंधांमध्ये अंतर निर्माण करू शकतो. तसेच तुमच्या कटू व्यवहाराचा परिणाम तुमच्या उत्पन्नावरही होऊ शकतो. जिभेवर आणि मनावर नियंत्रण ठेवा. परिस्थिती बदलेल. 4 / 5केतूच्या संक्रमणामुळे मकर राशीच्या लोकांचे वडीलधाऱ्या लोकांशी वाद होऊ शकतात. या काळात तुम्हाला यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. यासोबतच तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील प्रगतीसाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या काळात एखाद्या गोष्टीबद्दल मानसिक तणाव जाणवू शकतो. तसेच, तुम्हाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा विरोध होऊ शकतो. आपल्या प्रतिष्ठेची काळजी घेणे आवश्यक आहे. जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवा. काही काळातच चित्र बदलेल. 5 / 5मीन राशीच्या लोकांसाठी, केतू आठव्या भावात स्थित आहे आणि चित्रा नक्षत्रात प्रवेश करत असल्याने या व्यक्तींसाठी आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. या काळात तुमच्या आरोग्याशी संबंधित चिंता वाढू शकते. या दरम्यान तुम्हाला आर्थिक बाबतीतही खूप सावध राहण्याची गरज आहे. आरोग्य, आजार आणि आर्थिक प्रश्न एकत्र उद्भवले तर तुम्हाला परिस्थितीचा सामना करणे कठीण जाईल. आरोग्य आणि आर्थिक बाबींकडे बारकाईने लक्ष द्या. आणखी वाचा Subscribe to Notifications