शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

केतु नक्षत्र गोचर: ५ राशींना इच्छापूर्ती काळ, बचत करणे शक्य; नोकरीत लाभ, गुंतवणुकीतून फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2024 2:23 PM

1 / 9
ज्योतिषशास्त्रात राहु आणि केतु हे दोन्ही छाया, क्रूर ग्रह मानले जातात. विद्यमान घडीला राहु आणि केतु अनुक्रमे मीन आणि कन्या राशीत विराजमान आहेत. हे दोन्ही ग्रह कायम वक्री चलनाने गोचर करतात. तसेच हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून समसप्तक स्थानी असतात.
2 / 9
पैकी केतु ग्रह नक्षत्र परिवर्तन करणार आहे. नक्षत्र समुहांची मिळून एक रास तयार होत असते. राशीप्रमाणे ग्रह नक्षत्रातही प्रवेश करत असतात. या नक्षत्रांनाही ग्रहांचे स्वामित्व बहाल केलेले असते. केतु ग्रह हस्त नक्षत्रात विराजमान होत आहे. प्रत्येक नक्षत्र चार चरणात विभागलेले असतात. केतु हस्त नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात गोचर करत असल्याचे सांगितले जात आहे.
3 / 9
केतुच्या या गोचराचा काही राशींना चांगला लाभ मिळू शकतो. मनोकामना पूर्ण होऊ शकते. नोकरीत यश, प्रगती होऊ शकते. व्यापारात, गुंतवणुकीत नफा मिळू शकतो. कोणत्या राशींवर कसा असेल प्रभाव? जाणून घेऊया...
4 / 9
मेष: केतुचे नक्षत्र गोचर फायदेशीर ठरू शकते. नोकरदार लोकांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन चांगले असू शकेल. मालमत्ता, वाहन खरेदीची इच्छा पूर्ण होऊ शकते. पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता आहे. मनोकामना पूर्ण होऊ शकतील.
5 / 9
वृषभ: केतुचे नक्षत्र गोचर अनुकूल ठरू शकते. उत्पन्नात वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. नोकरदार कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती करू शकतील. करिअरमध्ये समाधानाची भावना असेल. पैशांची बचत करण्यात यशस्वी होऊ शकाल. लोकप्रियता वाढू शकेल. सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल. वाहन, मालमत्तेचे सुख मिळू शकते. बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात.
6 / 9
सिंह: केतुचे नक्षत्र गोचर सकारात्मक ठरू शकते. आर्थिक लाभ मिळू शकेल. या काळात तुम्हाला मेहनतीचे यथायोग्य फळ मिळू शकेल. दीर्घकाळ चाललेले वाद संपुष्टात येऊ शकतील. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल.
7 / 9
धनु: प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील. करिअरमध्ये अनेक फायदे मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी यशासह पदोन्नती मिळू शकते. मन कामात व्यस्त राहील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकते. व्यवसायात दुप्पट नफा मिळण्याची शक्यता आहे.
8 / 9
मकर: केतुचे नक्षत्र गोचर शुभ ठरू शकते. वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात. व्यावसायिकांना चांगला नफा होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांशी चांगले संबंध असतील. आर्थिक स्थिती सुधारेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळू शकते.
9 / 9
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य