शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१८ महिने केतु कन्या राशीत: ६ राशींना शुभफलदायी, भाग्यवृद्धी; नोकरी-व्यवसायात अपार यश-प्रगती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2023 7:07 AM

1 / 15
ज्योतिषशास्त्रानुसार, ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस दोन अत्यंत महत्त्वाचे राशीपरिवर्तन होत आहे, ते म्हणजे राहु आणि केतुचे. केतु ग्रह शुक्राचे स्वामित्व असलेल्या तूळ राशीतून वक्री चलनाने बुधाचे स्वामित्व असलेल्या कन्या राशीत प्रवेशित झाला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, केतु हा क्रूर आणि छाया ग्रह मानला जातो. केतुचे कन्या राशीतील गोचर देश-दुनियेसह सर्व राशींवर प्रभावकारी मानले जाते.
2 / 15
केतु वक्री चलनाने कन्या राशीत आला असून, राहु ग्रह मंगळाच्या मेष राशीतून गुरुच्या मीन राशीत आला आहे. केतु आणि राहु एकमेकांपासून समसप्तक स्थानी असतात. पुढील सुमारे १८ महिने केतु कन्या राशीत असणार आहे. केतु ग्रह धर्म आणि कर्म प्रधान ग्रह मानला जातो. केतुची शुभ दृष्टी असेल तर रंकाचा राजा होऊ शकतो, असे म्हटले जाते.
3 / 15
केतु ग्रहाने कन्या राशीत प्रवेश केल्यामुळे मंगळ आणि केतुची सुरू असलेली अशुभ युती समाप्त झाली आहे. केतु कुंडलीत शुभ तसेच मजबूत स्थितीत असेल, तर जीवनात कोणत्याही गोष्टींची कमतरता असत नाही. सौभाग्यवृद्धी होऊ शकते. केतुच्या कन्या प्रवेशामुळे ६ राशींना उत्तम लाभ मिळू शकतात, तर याउलट ६ राशींना आगामी काळ काही समस्या, अडचणींचा संमिश्र ठरू शकतो, असे म्हटले जात आहे. तुमच्या राशीवर केतु गोचराचा प्रभाव कसा असेल? जाणून घ्या...
4 / 15
मेष: केतुच्या कन्या प्रवेशाने पराक्रमात वाढ होऊ शकेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगतीची शुभ शक्यता निर्माण होईल. कुटुंबातील सदस्याकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. आगामी काळ शुभ असणार आहे. नशिबाची उत्तम साथ लाभेल. व्यापारी वर्गासाठी चढ-उतार येऊ शकतात. धार्मिक विचार वाढतील. नोकरदारांना केतुचे गोचर शुभ राहणार आहे. आरोग्याची काळजी घ्यावी. योगासने आणि व्यायामाकडे लक्ष द्यावे. नवीन नात्यात फसवणूक होऊ शकते.
5 / 15
वृषभ: केतुचे कन्या गोचर काहीसे संमिश्र ठरू शकेल. खर्चावर नियंत्रण ठेवावे. अन्यथा आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे. व्यवसायात सुरू केलेल्या योजना फायदेशीर ठरतील. कुटुंबात काही शुभ कार्य घडू शकतात. परदेश दौऱ्यावर जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. परदेशातून लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात यश मिळेल. जीवनाच्या इतर क्षेत्रातही प्रभाव वाढेल. वैवाहिक जीवनाविषयी बोलायचे झाले तर तुमच्या जोडीदारासोबत गैरसमज वाढू शकतात. मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो.
6 / 15
मिथुन: केतुचा कन्या प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकतो. कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून दूर राहा.प्रेम जीवनात चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. ही वेळ एकमेकांना समजून घेण्याची आहे. पण गैरसमजांमुळे एकमेकांचे नाते बिघडू शकते. कौटुंबिक जीवन चांगले राहील. अनेक कामे भावंडांच्या सहकार्याने पूर्ण होतील. संघर्षानंतर शाश्वत उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील. परंतु काही ना काही त्रासामुळे मानसिक अस्वस्थता राहील. कामाच्या ठिकाणी स्थिती मजबूत असेल. आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
7 / 15
कर्क: केतुचे कन्या गोचर शुभफलदायी ठरू शकेल. घरगुती कामे पूर्ण करण्यासाठी संयम ठेवून प्रयत्न करावे लागतील. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. कामात यश मिळेल. प्रगतीच्या शुभ संधी मिळतील. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. मित्रांच्या मदतीने काही बिघडलेले काम पूर्ण होईल. मन प्रसन्न राहील. कामाच्या ठिकाणी विरोधक पराभूत होतील. पुढे जाण्याच्या अनेक संधी मिळू शकतील.
8 / 15
सिंह: केतुचा कन्या प्रवेश अनुकूल ठरू शकतो. धाडस वाढेल. कामात जोखीम पत्करून पुढे जाण्याचे काम कराल. सहकारी मदत करतील. प्रभाव आणि स्थान लक्षणीय वाढेल. काम पूर्ण करण्यासाठी खूप धावपळ करावी लागू शकते, त्यामुळे चिंतेत असाल आणि काम पूर्ण होण्याची शक्यताही कमी आहे. खर्च वाढू शकतो. कामे करताना काळजी घ्या, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. वाढत्या घरगुती गुंतागुंतीमुळे तुम्ही त्रस्त राहाल. कुटुंबातील सदस्यांशी संबंधात तेढ निर्माण होऊ शकते.
9 / 15
कन्या: केतु प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकतो. कामे पूर्ण करण्यासाठी अधिक धडपड आणि धावपळ करावी लागणार आहे. काहीही चुकीचे बोलणे टाळावे. काही समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. पैसे वाचवण्याकडे लक्ष द्यावे लागेल. आखलेल्या बजेटचे पालन करावे. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती येऊ शकते. रागावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवा. बोलतांना शब्दांची योग्य निवड करा. आहारावर नियंत्रण ठेवावे. नोकरीतील लोकांना सावधगिरीने आणि स्पष्टतेने काम करावे लागेल. अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
10 / 15
तूळ: केतुचा कन्या प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकतो. लाभाची शक्यता आहे, परंतु योजनेनुसार पुढे जावे लागेल. काही कारणास्तव, पूर्ण झालेल्या कामात अडथळा येऊ शकतो, ज्यामुळे तुम्ही चिंतेत राहाल. कौटुंबिक जीवन चांगले राहील. आरोग्याची काळजी घ्या. वाहन चालवताना काळजी घ्या. संपूर्ण कुटुंबासमवेत धार्मिक स्थळी जाऊ शकता. कोणत्याही प्रकारच्या तणावापासून दूर राहा. मनात सकारात्मक विचार ठेवा. अडकलेले पैसे कोणाकडून तरी वसूल होऊ शकतात. पैसे मिळवण्याचे अनेक मार्ग तयार होतील. परदेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता निर्माण करत आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते.
11 / 15
वृश्चिक: केतुच्या कन्या प्रवेशामुळे आर्थिक लाभाची शुभ शक्यता राहील. आरोग्यही सुधारेल. भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होईल. जमीन, वाहने इत्यादी खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. सामाजिक कार्यासाठी प्रसिद्धी मिळेल. सरकारकडून सन्मानित होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभाची स्थिती सामान्य राहणार आहे. काही कामाच्या संदर्भात संघर्षाची परिस्थिती निर्माण होईल. काही नवीन कामे करून पाहू शकता, ज्यामध्ये चांगले यश मिळेल. वैवाहिक आणि कौटुंबिक जीवन आनंदी आणि शांततामय राहू शकेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम असेल.
12 / 15
धनु: केतुचा कन्या प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकतो. आप्तस्वकीय परक्यांसारखे वागू शकतील. एकटे वाटेल. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. बजेट तयार करणे फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढेल. अभ्यासावर अधिक चांगले लक्ष केंद्रित करू शकतील. कामात रस कमी वाटेल. असे वाटेल की, करत असलेल्या मेहनतीचे चांगले परिणाम मिळत नाहीत. कुटुंबातील सदस्यासोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात. त्याने त्रस्त राहाल. वैयक्तिक संबंधांकडे लक्ष देणे आवश्यक आहे, जेणेकरून सर्वांचे सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यात रस असेल. सेवाकार्यात सक्रिय सहभाग घ्याल.
13 / 15
मकर: केतुच्या कन्या प्रवेशाने मेहनतीचे यथोचित फळ मिळू शकेल. मनातील इच्छा पूर्ण होतील. आत्मविश्वास वाढेल. शॉर्टकटद्वारे पैसे कमवण्यात यशस्वी व्हाल. परंतु काही कारणांमुळे या कामात अडथळे येऊ शकतात. नोकरदारांना अधिकारी आणि सहकाऱ्यांमुळे कामात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे ते कामाची जागा बदलण्याचा विचार करतील. व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल. व्यवसायात फायदा होईल. अत्यंत सावधगिरीने काम करावे लागेल. घाईने निर्णय घेतल्यास समस्यांना सामोरे जावे लागेल.
14 / 15
कुंभ: केतुचा कन्या प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकतो. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्यावी. खूप धावपळ करावी लागेल. शत्रूंमुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कोणत्याही अनैतिक कामांपासून दूर राहा. कामात प्रामाणिकता ठेवा. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काही समस्यांना सामोरे जावे लागेल. सरकारी नोकऱ्यांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करण्याची गरज आहे. कौटुंबिक जीवनात चढ-उतार येतील.
15 / 15
मीन: केतुचा कन्या प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकतो. खर्च अनावश्यकपणे वाढू शकतो, त्यामुळे बजेट बनवा. कामावर लक्ष केंद्रित करा. प्रयत्नांमध्ये यश मिळण्याची शक्यता कमी आहे. कठोर परिश्रम करावे लागतील. घरगुती गुंतागुंत निर्माण होईल. मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. धार्मिक स्थळांच्या प्रवासामुळे मनाला शांती मिळेल. जीवनात स्थिरता जाणवेल. हिंमत वाढल्याने व्यवसायात प्रगती आणि यश मिळेल. नोकरदारांसाठी हा काळ चढ-उतारांनी भरलेला असेल. पण अधिकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य