शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पूर्वज स्वप्नात आले? जाणून घ्या, यामागील नेमका अर्थ आणि काही मान्यता

By देवेश फडके | Published: January 29, 2021 1:45 PM

1 / 8
माणसाच्या मनातील भावभावना स्वप्नात प्रतिबिंबित होत असतात. झोपल्यानंतर आपल्याला अनेक गोष्टी स्वप्नात दिसतात. बहुतांश वेळा झोपमोड झाली की, आपण स्वप्नात काय पाहात होतो, याचे आपल्याला विस्मरण होते. मात्र, काही स्वप्न कायम लक्षात राहणारी असतात.
2 / 8
झोपल्यानंतर स्वप्नात आपल्याला नेमके काय दिसेल, याचा काही नेम नसतो. किंबहुना ते आपल्या हातात नसते. काही स्वप्न ही भयावह असतात. स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टींमागे काहीतरी विशिष्ट संकेत असल्याचे ज्योतिषशास्त्र मानते. स्वप्नशास्त्र ही ज्योतिषशास्त्राची एक शाखा आहे. स्वप्नशास्त्रात माणसाला पडणाऱ्या स्वप्नांचा अभ्यास केला जातो. व्यक्ती, स्वभाव, मनाची अवस्था, याचा आढावा घेऊन एखाद्या स्वप्नामागे काय अर्थ किंवा संकेत असू शकतात, याचा अंदाज बांधला जातो.
3 / 8
स्वप्न आपल्या मनाची अवस्था स्पष्ट करतात, असे मानले जाते. माणसाला पडणाऱ्या स्वप्नांचा संकेत किंवा अर्थ शुभ किंवा अशुभ दोन्ही प्रकारचा असू शकतो. आपल्या मनात पूर्वजांविषयी खूप जिव्हाळा असतो. अनेक पूर्वजांना आपण पाहिलेले नसते. मात्र, त्यांच्याबद्दल सांगितल्या गेलेल्या गोष्टी, आठवणी आपल्या मनात घर करून राहतात.
4 / 8
आपले पूर्वज स्वप्नात दिसले, तर त्यामागे नेमका काय अर्थ असू शकतो, याचा आपण विचार करतो. पूर्वज स्वप्नात येणे याचे विविध अर्थ असू शकतात, असे सांगितले जाते. स्वप्नात आपल्याला एखादी मृत व्यक्ती दिसली, तर त्या व्यक्तीला आपल्याकडून काहीतरी हवे आहे किंवा त्यांची एखादी इच्छा अपूर्ण राहिली आहे, असा यामागील अर्थ सामान्यपणे घेतला जातो.
5 / 8
एखाद्या व्यक्तीला त्याचे पूर्वज प्रसन्न मुद्रेत स्वप्नात दिसले, तर त्याचा अर्थ ते आपल्याकडून घडलेल्या पुण्यकर्माने आनंदी झाले आहेत, असा याचा अर्थ असल्याचे सांगितले जाते. विशेषतः श्राद्ध कर्म कालावधीत असे स्वप्न पडणे शुभ मानले जाते. सदर व्यक्तीने केलेले श्राद्ध, पिंडदानाने पूर्वज तृप्त झाले आहे, असाही त्यामागील अर्थ असल्याचे सांगितले जाते.
6 / 8
एखाद्या व्यक्तीला पूर्वजांशी तो गप्पा मारताना स्वप्नात दिसल्यास पूर्वजांची एखादी इच्छा अपूर्ण असून, त्यामुळे पूर्वज आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत, असा त्याचा अर्थ मानला जातो. असे स्वप्न पडल्यास पूर्वजांच्या नावाने दानधर्म करावा, असे सांगितले जाते.
7 / 8
एखाद्या व्यक्तीला स्वप्नात पूर्वज आजारी आहे, रडत आहे किंवा वाईट परिस्थितीत आहे, असे दिसल्यात ते शुभ मानले जात नाही. याचा अर्थ आगामी काळात काही अडथळे, आव्हाने, समस्यांचा सामना करावा लागू शकतो, असे मानले जाते. अशा परिस्थितीत पितृदोष आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी, असे सांगितले जाते.
8 / 8
एखाद्या व्यक्तीला स्वप्नात पूर्वजाला खाऊ घालताना दिसल्यास तो शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ आगामी काळात एखादे मोठे काम यशस्वी होणार आहे किंवा आगामी कालावधीत तुमच्यासाठी यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होणार आहे, असे मानले जाते. याउलट पूर्वजांसोबत स्वतःला जेवताना पाहिल्यास तोही शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ पूर्वजांचा तुमच्यावर शुभाशिर्वाद आहेत, असे मानले जाते.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष