know about as per astrology zodiac signs can reveals that what exactly do your kids fear the most
तुमच्या मुलांना सर्वांत जास्त नेमकी कशाची भीती वाटते? काय असू शकेल कारण? ‘असे’ जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2022 7:14 AM1 / 15प्रत्येक पालक आपल्या मुलांची आपापल्या परिने खूप काळजी घेत असतात. लहान मुले खूप निरागस असतात, असे म्हटले जाते. प्रत्येक आई-वडिलांना आपली लेकरे अतिशय प्रिय असतात. त्यांच्या आवडी-निवडी, छंद जोपासण्याचा ते प्रयत्न करत असतात.2 / 15मात्र, काही घटनांमुळे लहान मुलांच्या मनात भीती घर करून राहते. त्यामागील कारणे काहीही असू शकतात. अनेकदा त्यामुळे मुले मागे मागे राहतात. प्रत्येक मुलाचा स्वतःचा एक स्वभाव असतो. त्याचे व्यक्तिमत्त्वही वेगळे असते. 3 / 15मुलामध्ये विविध गुण, शक्ती असतात. मात्र, त्यात काही कमतरताही असू शकते. त्यापैकी काही त्यांच्या भीतीचे कारण असू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार, तुमचे मूल कसे असेल हे तुम्ही केवळ जाणून घेऊ शकत नाही, तर तुमच्या मुलाला सर्वांत जास्त कशाची भीती वाटते हे देखील ओळखू शकता. जाणून घेऊया...4 / 15मेष राशीच्या मुलांसाठी ऐकून घेणे सर्व काही असते. त्यांना अधिकाराची गरज वाटत नाही. अशा मुलाला असे वाटते की लोकांनी त्यांचे ऐकून घ्यावे. या राशीच्या मुलाची सर्वांत मोठी भीती म्हणजे स्वतःला व्यक्त करण्याची संधी न मिळणे. अनेकदा लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करू करतात, असे म्हटले जाते. 5 / 15वृषभ राशीची मुले अंतर्मुख असतात. त्यांच्यासाठी नवीन वातावरण आणि नवीन लोकांशी जुळवून घेणे कठीण जाते. विशिष्ट परिस्थितींशी जुळवून घेण्यासाठी त्यांचा वेळ घेतात. म्हणून, त्यांची सर्वात मोठी भीती परिस्थितीनुसार बदलण्याची गरज आहे, म्हणूनच ते पुढे ढकलणे किंवा त्यांच्या स्वत:च्या निवडी करणे योग्य मानतात.6 / 15मिथुन या राशीच्या मुलांना एकटे पडण्याची भीती वाटते. ते सुंदर संवादक आहेत. ते व्यक्त करण्यातही खूप पटाईत आहेत. मात्र, परिस्थिती पाहता ज्यांच्याशी बोलायला किंवा संवाद साधायला कुणीच नाही, ते अस्वस्थ आणि बेचैन होतात, असे सांगितले जाते. 7 / 15कर्क राशीची मुले भावनिक आणि स्वभावाने अतिशय संवेदनशील असतात. म्हणून, जेव्हा तुम्ही अशा मुलाच्या आसपास असता तेव्हा त्यांच्या भावना दुखावतील असे काहीही बोलू नका किंवा करू नका याची खात्री करा. किंबहुना, अनेकदा काही गोष्टींमुळे त्यांना अपमानित झाल्यासारखे वाटते. 8 / 15सिंह राशीची मुले लक्षवेधक असतात. त्यांचे पालक त्यांच्यावर कितीही प्रेम करतात हे महत्त्वाचे नाही, मात्र आपल्याकडे कोणी दुर्लक्ष तर करत नाही ना, अशी भीती त्यांना वाटत असते. असे करू नका किंवा त्यांच्या भावना दुखावणारे काहीही करू नका, असे झाल्यास ते स्वतः कमी समजतात, असे म्हटले जाते. 9 / 15कन्या राशीच्या मुलाचा विचार केला जातो तेव्हा त्यांची सर्वांत मोठी भीती लोकांच्या, विशेषत: त्यांच्या पालकांच्या अपेक्षा पूर्ण न करणे. जरी ते हुशार आहेत आणि त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी त्यांचे सर्वोत्तम द्यायचे आहे. त्यामुळे अपयश त्यांना नक्कीच त्रास देऊ शकते. त्यामुळे अपयशाची या मुलांना अधिक भीती वाटते, असे सांगितले जाते. 10 / 15तूळ राशीच्या मुलांना त्यांचे पालक आणि प्रियजनांसोबतच्या नातेसंबंधात शांतता राखणे आवडते. म्हणूनच, ते नेहमी त्यांच्या जीवनात संतुलन राखण्याचे मार्ग शोधत असतात. ते कितीही मोठे होत असले तरी. ते सर्व प्रकारे त्यांचे जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करतात.11 / 15वृश्चिक राशीची मुले त्यांच्या उत्कटतेने प्रेरित असतात आणि ते साध्य करण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. तथापि, त्यांना अनिश्चिततेच्या कल्पनेची भीती वाटते. त्यांना भीती वाटते की ते जीवनात त्यांचे ध्येय आणि महत्त्वाकांक्षा गाठू शकतील की नाही.12 / 15धनु राशीची मुले स्वस्थ बसण्याच्या विचार करू शकत नाहीत. लहान असताना ते नेहमी त्यांच्या आयुष्यात उत्साह आणि साहस शोधत असतात. त्यामुळे घरी बसणे किंवा काहीही न करणे त्यांना खूप अस्वस्थ आणि बेचैन करू शकते.13 / 15इतर मुलांप्रमाणे, मकर राशीची मुले अधिक प्रौढ आणि व्यावहारिक असतात. ते नेहमीच आव्हाने आणि स्पर्धेसाठी तयार असतात. मात्र, त्यांना नेहमीच अपयशाची भीती असते. ते जे काही करतात त्यात ते अयशस्वी होतात तेव्हा कधी कधी त्यांच्या विश्वासावर परिणाम होतो.14 / 15कुंभ राशीचे मूल सहसा आपले व्यक्तिमत्व गमावण्याच्या विचाराने हैराण होते. तर मुलाला त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन आणि आधाराची गरज असते. प्रत्येकवेळी कोणीतरी त्यांच्यावर देखरेख ठेवणे नक्कीच आवडत नाही. त्यांना स्वतःची स्पेस आवडते. त्याच वेळी त्यांनी जीवनात केलेल्या निवडीबद्दल त्यांचे कौतुक केले जाणे अपेक्षित आहे.15 / 15मीन राशीची मुले आदर्शवादी असतात ज्यांना नेहमी चांगल्याची इच्छा असते. त्यांना वाटते की त्यांच्या जगात काहीही चुकीचे होऊ शकत नाही. त्यांच्या मनात नेहमीच त्यांच्या प्रियजनांना आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तीला गमावण्याची भीती असते, असे सांगितले जाते. - सदर माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तुमच्या मुलांबाबत अधिक सखोल आणि विस्तृतपणे जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते. आणखी वाचा Subscribe to Notifications